Chandrayaan-3 update | ‘स्वागत नही करोगे हमारा’, नेटीझन्स न्यूयॉर्क टाइम्सची उडवतायत खिल्ली
Chandrayaan-3 update | 9 वर्षापूर्वीचा तो अपमान आजही आम्ही विसरलेलो नाही. न्यूयॉर्क टाइम्सच्या त्या कार्टुनमध्ये असं काय होतं?. चांद्रयान-3 चंद्राच्या ज्या भागवर शानमध्ये फिरतय, तिथे अजूनपर्यंत कुठलाही देश जाऊ शकलेला नाही.
बंगळुरु : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ‘चांद्रयान 3’ च यशस्वी लँडिंग झालय. त्यानंतर सोशल मीडियावर शुभेच्छा संदेशांचा पाऊस सुरु झालाय. लोक ऐतिहासिक मून मिशनबद्दल आपला आनंद व्यक्त करतायत. स्पेस टेक्नोलॉजीमध्ये इस्रोने खूप प्रगती केल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. भारताने हा यशाचा टप्पा गाठलेला असताना इंटरनेटवर एक वर्ग न्यूयॉर्क टाइम्सची खिल्ली उडवतोय. या वर्तमानपत्राची प्रतिष्ठीत न्यूज पेपर्समध्ये गणना होते. NYT मध्ये पब्लिश झालेल्या एक वर्णद्नेषी कार्टुनवरुन टीका सुरु आहे.
काही लोकांना या कार्टुनबद्दल माहित नाहीय. 2014 साली हेन्ग किम सॉन्गने बनवलेल्या एका कार्टुनवरुन मोठा वाद निर्माण झाला होता. या कार्टुनमध्ये एक शेतकऱ्यासोबत गाय दाखवली होती. ‘एलीट स्पेस क्लब’ नावाच्या खोलीबाहेर त्याला दरवाजावर टकटक करताना दाखवलं होतं. खोलीत दोन लोक भारताच्या यशाबद्दल न्यूज पेपरवर वाचताना दिसत होते.
NYT ची खिल्ली
कार्टुनमध्ये दोघांच्या हातात जो पेपर आहे, त्यावर भारताच्या मिशन मंगळची बातमी होती. लोक आता हे कार्टुन शेअर करुन NYT ची खिल्ली उडवत आहेत. भारत आता खऱ्या अर्थाने विश्वगुरु आहे. कारण चांद्रयान-3 चंद्राच्या ज्या भागवर शानमध्ये फिरतय, तिथे अजूनपर्यंत कुठलाही देश जाऊ शकलेला नाही.
Thank you New York Times. Thank you for the racial jibe & the ridicule. Thank you for doubting our abilities. Thank you for laughing at us.
Today we did not knock on the door. Today, we kicked the door down.
Now, go and draw a new cartoon. Go…#Chandrayaan3 pic.twitter.com/hxbwwNeRSD
— Major Gaurav Arya (Retd) (@majorgauravarya) August 23, 2023
न्यूयॉर्क टाइम्सच्या संपादकाने काय स्पष्टीकरण दिलेलं?
न्यूयॉर्क टाइम्सने नंतर आपल्या कार्टुनबद्दल माफी मागितली होती. संपादकीय पेजचे एडिटर एंड्रयू रोसेन्थल यांनी या कार्टुनवर स्पष्टीकरण देताना सांगितलं होतं की, “कार्टुनिस्टला हे सांगायच होतं की, स्पेस इन्वेस्टिगेशनमध्ये आता फक्त श्रीमंत आणि पाश्चिमात्य देशांची मक्तेदारी राहिलेली नाही” भारतीयांचा अपमान करणं हा या कार्टुनचा उद्देश नव्हता, असं या संपादकाने तेव्हा सांगितलं होतं. मंगळावरही भारत पहिल्याच प्रयत्नात यशस्वी
‘मंगळयान’ हे भारताच मंगळ ग्रहावरील आंतरग्रहीय मिशन होतं. 5 नोव्हेंबर 2013 रोजी हे मिशन लॉन्च केलं होतं. 24 सप्टेंबर 2014 रोजी भारताच्या मंगळयानाने यशस्वीरित्या मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला होता. याआधी फक्त अमेरिका, रशिया आणि युरोपने मंगळ ग्रहाच्या मोहीमा केल्या होत्या. भारताने पहिल्याच प्रयत्नात यश मिळवलं होतं. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग सोपी नव्हती. इस्रोच्या वैज्ञानिकांच कौशल्य आणि देशवासियांच्या प्रार्थनने चांद्रयान-3 यशस्वीरित्या चंद्रावर उतरलं.