Chemical factory blast : बॉयलरचा स्फोट होऊन तब्बल 13 कामगार ठार! मृतांचा आकडा वाढण्याची भीती, यूपीच्या हापुडमध्ये हाहाकार
हापुडमध्ये एका फटाक्याच्या आणि केमिकल कारखान्याचा बॉयलरचा स्फोट झालाय. या दुर्घटनेत 12 लोकांचा मृत्यू झालाय. तर 19 लोक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
लखनऊ : उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) हापुडमध्ये एका फटाक्याच्या आणि केमिकल कारखान्याचा बॉयलरचा स्फोट झालाय. या दुर्घटनेत 13 लोकांचा मृत्यू झालाय. तर 19 लोक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही दुर्घटना धौलाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यूपीएसआयडीसीमधील आहे. या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह सरकारमधील अनेक मंत्र्यांना शोक व्यक्त केलाय. दुर्घटनेनंतर तातडीने फॉरेन्सिक टीम (Forensic team) घटनास्थळावर दाखल झाली आणि त्यांनी तपासाला सुरुवात केली.
हापुडच्या जिल्हाधिकारी मेधा रुपम यांनी दिलेल्या माहितीनुसार धौलानामधील या कंपनीला इलेक्ट्रॉनिक सामान बनवण्याचं लायसन्स मिळालं होतं. असं असताना स्फोटक पदार्थांची निर्मिती कशी केली जात होती, याचा तपास केला जाईल आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. औद्योगिक क्षेत्रातील सर्वच कारखान्यांचा तपास केला जाईल. दिलेल्या परवानगीनुसार कारखाने चालवले जात आहेत की याचा तपास होईल. तपासात कुणी अधिकारी किंवा अन्य व्यक्ती दोषी आढळल्यास त्याच्याविरोधात कठोर कारवाईचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलाय. तसंच जिल्हाधिकारी रुपम यांनी सांगितलं की जमखींना योग्य उपचार मिळावे यासाठी आमचे प्रयत्न आहेत. काहींना सफदरगंज रुग्णालयात नेण्यात आलं आहे.
जवळपासच्या अनेक कारखान्यांचंही नुकसान
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार हा स्फोट इतका भीषण होता की जवळपासच्या अनेक कारखान्यांचे छत उडाले. अनेक कारखान्यांचे मोठे नुकसान झाले आहेत. दुर्घटनेनंतर पोलीस, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचावकार्याला सुरुवात केली. अनेक लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आलीय.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शोक व्यक्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केलाय. त्यांनी ट्वीट करत ‘उत्तर प्रदेशच्या हापुडमध्ये केमिकल कारखाण्यात झालेली दुर्घटना हृदयद्रावक आहे. यात ज्या लोकांना आपले प्राण गमवावे लागले, त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. जखमीवर उपचार आणि अन्य मदतीसाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे’, असं म्हटलंय.
उत्तर प्रदेश के हापुड़ की केमिकल फैक्ट्री में हुआ हादसा हृदयविदारक है। इसमें जिन लोगों को जान गंवानी पड़ी है, उनके परिजनों के प्रति मैं अपनी संवेदनाएं व्यक्त करता हूं। घायलों के इलाज और दूसरी हर संभव सहायता में राज्य सरकार तत्परता से जुटी है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) June 4, 2022
योगी आदित्यनाथ यांच्याकडून सर्वतोपरी मदतीचे आदेश
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुर्घटनेबाबत ट्विट करत शोक व्यक्त केलाय. तसंच मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. योगी आदित्यनाथ यांनी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना घटनास्थळावर जात बचावकार्य आणि मृत, तसंच जखमींच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मतदीचे आदेश दिले आहेत.
जनपद हापुड़ स्थित फैक्ट्री में बॉयलर फटने की दुर्भाग्यपूर्ण घटना में हुई जनहानि अत्यंत हृदय विदारक है।
मेरी संवेदनाएं शोक संतप्त परिजनों के साथ हैं।
संबंधित अधिकारियों को त्वरित गति से राहत-बचाव कार्य संचालित करने एवं घायलों का समुचित उपचार कराने हेतु निर्देश दिए गए हैं।
— Yogi Adityanath (@myogiadityanath) June 4, 2022