Chhattisgarh Naxal Attack : नक्षलवादी हल्ल्यानंतर अमित शाहांची उच्च स्तरीय बैठक, शहीदांचा आकडा 22 वर
वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत शाह यांच्या निवासस्थानी उच्च स्तरीय बैठक पार पडली. या बैठकीला गृहसचिव अजय भल्ला, IBचे डायरेक्टर अरविंद कुमार, वरिष्ठ सीआरपीएफ अधिकारीही उपस्थित होते.
नवी दिल्ली : छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सुरक्षा दलाचे 22 जवान शहीद झाले आहेत. त्यामुळे देशात मोठी खळबळ उडाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या आसाम दौरा अर्धवट सोडून राजधानी दिल्ली गाठली. वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत शाह यांच्या निवासस्थानी उच्च स्तरीय बैठक पार पडली. या बैठकीला गृहसचिव अजय भल्ला, IBचे डायरेक्टर अरविंद कुमार, वरिष्ठ सीआरपीएफ अधिकारीही उपस्थित होते. (Amit Shah taking top-level meeting with senior officers on Bijapur encounter at his residence)
नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई होणार?
मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत MHA आणि CRPF चे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. त्याचबरोबर स्पेशल डीजी संजय चंदरही उपस्थित होते, असं सांगण्यात येत आहे. या बैठकीत नक्षलवाद्यांविरोधात एका मोठ्या कारवाईची रणनिती ठरण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर सध्या या प्रकरणाचा तपास NIAकडे सोपवला जाईल, असंही सांगण्यात येतंय.
#WATCH | Delhi: Home Minister Amit Shah taking top-level meeting with senior officers on Bijapur encounter at his residence.
Home Secretary Ajay Bhalla, Director IB Arvinda Kumar and senior CRPF officers are attending the meeting. pic.twitter.com/3opzROJC7g
— ANI (@ANI) April 4, 2021
शहीद जवानांची संख्या 22 वर
गृहमंत्री अमित शाह आज आसाम विधानसभा निवडणूक प्रचारासाठी गेले होते. तिथे त्यांच्या 3 प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, नक्षलवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एक प्रचार रॅली केल्यानंतरच अमित शाह यांनी दिल्ली गाठली. छत्तीसगडमध्ये बीजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या जंगलात नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत शनिवारी सुरक्षा दलाचे 5 जवान शहीद झाले होते. तर 30 जवान जखमी होते. पोलिसांनी सांगितलं की चकमकीनंतर बेपत्ता झालेल्या 18 जवानांपैकी 17 जवानांचे मृतदेह आज आढळून आले. त्यामुळे नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या जवानांची संख्या 22 झाली आहे.
25 ते 30 नक्षलवाद्यांचाही खात्मा- सीआरपीएफ
बीजापूरमध्ये नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 25 ते 30 नक्षलवादी ठार झाल्याचा दावा CRPFचे DG कुलदीप सिंह यांनी केलाय. त्याचबरोबर ही कारवाई म्हणजे कुठलं ऑपरेशनल किंवा गुप्तचर विभागाचं अपयश नसल्याचंही सिंह म्हणालेत. जर या कारवाईत काही ऑपरेशनल अपयश असेल तर एवढ्या मोठ्या संख्येत नक्षलवादी मारले गेले नसते, असंही सिंह यांनी म्हटलंय.
There’s no point in saying that there was some kind of intelligence or operational failure. Had it been some intelligence failure, forces would haven’t gone for operation. If there was some operational failure, so many Naxals would haven’t been killed:DG CRPF Kuldiep Singh to ANI pic.twitter.com/3Bopg8Tec7
— ANI (@ANI) April 4, 2021
संबंधित बातम्या :
Chhattisgarh Naxal Attack : छत्तीसगडमधील नक्षलवादी हल्ल्यानंतर अमित शाहांचा आसाम दौरा रद्द
Amit Shah taking top-level meeting with senior officers on Bijapur encounter at his residence