लहान मुलांच्या आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी; महिला आयोगाचा थेट ट्विटरलाच दणका…

ट्विटरवर अश्लिल व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याच्या सूचना महिला आयोगाने दिल्या आहेत.

लहान मुलांच्या आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी; महिला आयोगाचा थेट ट्विटरलाच दणका...
Follow us
| Updated on: Sep 20, 2022 | 8:32 PM

नवी दिल्लीः महिलांवरील वाढत्या अत्याचारामुळे देशात संताप व्यक्त केला जात आहे. त्यातच लहान मुले आणि महिलांवर झालेल्या अत्याचाराचे शेकडो व्हिडीओ ट्विटरवर असल्याने दिल्ली महिला आयोगाने (delhi women commission) भारतातील ट्विटरच्या आणि दिल्ली पोलिसांच्या प्रमुखांना समन्स बजावण्यात आले आहे. एवढेच नाही तर गेल्या चार वर्षांत या प्रकरणी संबधितांवर कोणती कारवाई झाली त्याचाही तपशील मागविण्यात आला आहेत. याबरोबरच सोशल मीडियावर असा अश्लील मजकूर उपलब्ध होण्यासाठी ट्विटरलाही जबाबदार धरण्यात आले आहे.

दिल्ली महिला आयोगाने ट्विटरवर महिला आणि मुलांशी संबंधित अश्लिल व्हिडीओ, अत्याचाराचे व्हिडीओ अपलोड आणि शेअर केल्याबद्दल भारतातील ट्विटरच्या हेड व दिल्ली पोलिसांना समन्स जारी करण्यात आले आहे.

ट्विटरवर लहान मुलांचे अश्लिल व्हिडीओ, त्यांचे फोटोंबरोबरच महिलांवर झालेल्या अत्याचाराचेही व्हिडीओ अपलोड केले गेले आहेत. त्यापेक्षा भयानक झोपेत असताना झालेल्या अत्याचाराचे व्हिडीओही अपलोड झाल्याचे दिसून आले आहे.

या गुन्हेगारी कृत्यांमुळे ट्विटरवरील काही अकाऊंट या प्रकारची रॅकेट चालवत असल्याचा ठपकाही ट्विटरवर ठेवण्यात आला आहे. अश्लिल आणि अत्याचाराचे व्हिडीओसाठी यूजर्सकडून पैसे मागितले जातात असाही आरोप केला गेला आहे. त्यामुळे असे पैसे मागणाऱ्यांची यादीही महिला आयोगाने दिल्ली पोलिसांना आणि ट्विटरलाही देण्यात आली आहे.

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, “बलात्कार आणि लहान मुलांचे अश्लिल व्हिडीओ ट्विटरसारख्या प्लॅटफॉर्मवर सहज उपलब्ध असल्याची माहिती बघून आपल्याला धक्का बसला आहे.

त्या व्हिडीओमधून लहान मुलं आणि महिलांवर झोपेतही अत्याचार होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आक्षेपार्ह व्हिडीओ ट्विटरवरून तात्काळ हटवण्याची गरज असल्याचे सांगत दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी कोणताही वेळ न घालवता गुन्हा नोंद करा असंही त्यांनी सांगितले.

महिला आयोगाकडून भारतातील ट्विटरच्या प्रमुखांना ज्या प्रमाणे जबाबदार धरुन सवाल करण्यात आला आहे, त्याच प्रकारे दिल्ली पोलिसांनाही जबाबदार धरले आहे.

याप्रकरणी फक्त अमेरिकेतीलच नाही तर भारतातील महिला आणि मुलीनांही जबाबदार धरले पाहिजे असे ताशेरेगी ओढण्यात आले आहेत. या सगळ्या प्रकरणात ट्विटर जबाबदार आहे असंही त्यांनी सांगितले.

या प्रकरणी लहान मुले आणि महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशा बेकायदेशीर कृत्यांचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून प्रसार केला जात आहे, हे खूपच दुःखद आहे. त्यामुळे हा प्रकार तातडीने थांबवण्याचा प्रयत्न करा असंही त्यांनी सांगितले.

महिला आयोगाने अत्याचार आणि बालकांवरही होणाऱ्या अत्याचाराबाबत कडक धोरण स्वीकारुन ट्विटरकडून अशा प्रकारची सामग्री काढून टाकणे आणि त्याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ट्विटरवर अश्लिल व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याच्या सूचना महिला आयोगाने दिल्या आहेत. याबरोबरच या प्रकरणात अडकलेल्या लहान मुलांना आणि महिलांना मदतीची गरज असल्यास त्यांना मदत करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत.

ट्विटरवरुन या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल झाले असतील तर त्याप्रकरणी ट्विटरने काय कारवाई केली आहे. त्यांच्यावर काय कारवाई झाली आहे असा सवालही महिला आयोगाने केला आहे. अश्लिल आणि अत्याचाराचे व्हिडीओ दाखवणारे ट्विट सुरू राहणार नाहीत याची खात्री करुन घेण्यासाठी केलेल्या कारवाईंचा तपशील देण्याच्या सूचना महिला आयोगाने दिल्या आहेत.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.