ISRO चे यश चीनला खुपू लागले, भारताचे चंद्रयान-3 दक्षिण ध्रुवावर उतरले नसल्याचा चीनी संशोधकाचा दावा

एकीकडे इस्रो चंद्रयान-3 च्या लॅंडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान यांना पुन्हा संपर्क करुन सक्रीय करण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यातच चीनच्या प्रमुख संशोधकाने नवा वाद निर्माण केला आहे.

ISRO चे यश चीनला खुपू लागले, भारताचे चंद्रयान-3 दक्षिण ध्रुवावर उतरले नसल्याचा चीनी संशोधकाचा दावा
chandrayaan 3Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Sep 28, 2023 | 9:51 PM

नवी दिल्ली | 28 सप्टेंबर 2023 : भारताचे महत्वाकांक्षी चंद्रयान-3 गेल्या 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लॅंड झाले. यानंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरविणारा भारत पहिला देश बनला. तर चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लॅंडींग करणारा चौथा देश बनला. परंतू चीन यावर आता नवीन खुसपट काढली आहे. चीन चंद्रमोहिमेचे संस्थापकाने म्हटले आहे की चंद्रयान-3 चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लॅंड झाल्याचा दावा खोटा आहे.

एक प्रमुख चीनी संशोधक आणि चीनच्या चंद्रयान मोहिमेचे संस्थापक ओयांग जियुआन यांनी भारताचा दक्षिण ध्रुवावर चंद्रयान उतरविल्याचा दावा अयोग्य आहे. चंद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुव किंवा त्याच्या आसपास उतरलेले नाही असे ओयांग यांनी म्हटले आहे. ओयांग जियुआन चीनच्या पहिल्या चंद्र मोहिमेचे मुख्य संशोधक होते.

जेव्हा भारतीय शास्रज्ञ दोन आठवडे स्लीप मोडवर ठेवलेल्या चंद्रयान-3 च्या लॅंडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान यांना पुन्हा संपर्क करुन सक्रीय करण्याचा प्रयत्न करीत आहेत अशावेळी चीनच्या प्रमुख संशोधकाने नवा वाद निर्माण केला आहे. चायनीज एकेडमी ऑफ सायन्सेसचे सदस्य ओयांग यांनी म्हटले की चंद्रयान-3 लॅंडींग चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर नाही झाली. तसेच ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले नाही. त्यांनी मिडीयाला सांगितले की भारताचा रोव्हर सुमारे 69 डीग्री दक्षिणच्या अक्षांशवर लॅंड केले आहे. ते चंद्राच्या दक्षिण गोलार्धात उतरले आहे. ते दक्षिण ध्रुव क्षेत्रात मोडत नाही. ते 88.5 आणि 90 डीग्रीच्या अक्षांशा दरम्यान आहे.

ध्रुवीय क्षेत्र खूपच कमी

वास्तविक पृथ्वी ज्या तिरप्या कक्षेतून सुर्याभोवती फिरते ती 23.5 डीग्री झुकलेली आहे. त्यामुळे दक्षिण ध्रुवाला 66.5 आणि 90 डीग्री दक्षिण दरम्यान मानले आहे. ओयांग यांचे म्हणणे आहे चंद्र केवळ 1.5 डीग्री झुकलेला आहे. त्यामुळे त्याचे ध्रुवीय क्षेत्र खूपच कमी ( 88.5 आणि 90 डीग्री अक्षांशा दरम्यान आहे ) नासा चंद्राच्या दक्षिण ध्रुवाला 80 ते 90 डीग्री मानते. ओयांग यांनी म्हटले की ते याला 88.5 ते 90 डीग्रीवर आणखी छोटे मानतात. जो चंद्राचा 1.5 डीग्री तिरप्या कक्षाने तयार झाला आहे.

भारताला कमी लेखू नका

युरोपीय अंतराळ संस्थेने देखील चंद्रयान-3 जेथे लॅंड झाले ते दक्षिण ध्रुव नाही. चंद्राचा दक्षिण ध्रुव शेकलटन क्रेटरच्या किनाऱ्यावर आहे. ज्याच्यामुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्टलॅंडींग करणे कठीण म्हटले जाते. अंतराळ संशोधन एचकेयूच्या प्रयोगशाळेचे संचालक क्वेंटीन पार्कर यांनी म्हटले की चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणे खूपच मोठी उपलब्धी आहे. परंतू भारताने केले त्याला कमी लेखू शकत नाही.

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.