हैदराबाद विमानतळावर मिठाईच्या डब्यांची करामत, कोट्यावधीचं घबाड पाहून जवानही चकीत
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (CISF) हैदराबाद विमानतळावर (Hyderabad Airport) 1 कोटी 3 लाख रुपये मुल्याचं परकीय चलन (Foreign Currency) जप्त केलं आहे.
हैदराबाद : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (CISF) हैदराबाद विमानतळावर (Hyderabad Airport) 1 कोटी 3 लाख रुपये मुल्याचं परकीय चलन (Foreign Currency) जप्त केलं आहे. सीआयएसएफच्या नियमित एक्स रे तपासणीत इतक्या मोठ्या प्रमाणात हे परदेशी चलन जप्त करण्यात आले. विशेष म्हणजे तस्करांनी ज्या पद्धतीने या नोटा लपवल्या होत्या ते पाहून जवानही काही वेळ चकीत झाले. हे चलन दुबईला नेण्याचा डाव होता. या प्रकरणी सीआयएसएफने एका भारतीय नागरिकाला अटक केली आहे. त्याला आता कस्टम विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे (CISF seize crores of Foreign Currency on Hyderabad Airport in Sweet packets).
आरोपीने अद्याप जप्त केलेल्या पैशांबाबत कोणतेही अधिकृत कागदपत्रं सादर केलेले नाही. त्यामुळे कस्टम विभाग या आरोपीची सखोल चौकशी करत आहे. टीवी 9 ला दिल्लीतील सीआयएसएफ मुख्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव मोहम्मद मुस्तफा असं आहे. त्याने विमानतळ परिसरात प्रवेश केल्यानंतर त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. हे पाहून सीआयएसएफचे सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक अजीत कुमार यादव आणि हवलदार जितेंद्र कुमार यांनी त्याची तपासणी केली. तसेच आरोपीकडील संशयित सामान पुन्हा एकदा एक्स-रे मशिनमधून तपासण्यात आले.
मिठाईच्या डब्यांमध्ये कोट्यावधींचं घबाड
सीआयएसएफच्या जवानांनी संशयावरुन आरोपीचं सामान व्यवस्थित तपासलं. त्यात मिठाईचे डबे असल्याचं दिसलं. मात्र आरोपीच्या हालचालींचा संशय आल्याने जवानांनी हे डबे अधिक बारकाईने तपासले असता त्या डब्यांमध्ये परदेशी चलन सापडले. जप्त करण्यात आलेल्या या परदेशी चलनाची किंमत जवळपास 1 कोटी 3 लाख रुपये आहे. या प्रकरणी आरोपी मोहम्मद मुस्तफाला (37) कोणतंही समाधानकारक उत्तर देता आलेलं नाही. सीआयएसएफने यानंतर तातडीने घटनास्थळावर कस्टम विभागाला पाचारण केलं. संयुक्त तपासणीत आरोपी हैदराबादचाच रहिवासी असल्याचं उघड झालंय. तो हैदराबादहून दुबईला जात होता. आरोपीकडे भारतीय पासपोर्ट होता.
आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या नोटांमध्ये अनेक देशांमधील चलनाचा समावेश आहे. या नोटा पकडल्या जाऊ नये म्हणून आरोपीने त्या खूप चलाखीने लपवल्या होत्या. यासाठी त्याने मिठाईच्या डब्यांचा वापर केला होता. नोटा लपवून चालवल्याने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांचा संशय बळावला आहे. हे पैसे कोठून आले आणि कुणाकडे देण्यात येणार होते असे अनेक अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरं कस्टम विभाग शोधत आहे. अशा पद्धतीने लपवून नेल्या जाणाऱ्या नोटा पकडणं तसं कठिण काम असल्याचंही सुरक्षा दलाने सांगितलंय.
हेही वाचा :
1 रुपयाच्या नोटेवर कमवू शकता 45 हजार रुपये, वाचा नेमके कसे?
तुमच्याकडे फाटलेल्या नोटेचा अर्धाच तुकडा आहे, तरीही मिळणार पैसे, जाणून घ्या काय करावे लागेल?
हे आहेत ते 5 देश, तिथे गेल्यानंतर तुम्ही स्व:ताला श्रीमंत समजाल!
व्हिडीओ पाहा :
CISF seize crores of Foreign Currency on Hyderabad Airport in Sweet packets