तलवार, लाठी-काठ्यांचा प्रहार, सिंघु बॉर्डरवर घमासान, स्थानिक विरुद्ध आंदोलक, पोलीस अधिकारी जखमी
प्रजासत्ताक दिनी दिल्ली धुमसल्यानंतर आता दिल्लीच्या सिंघू बॉर्डर येथील स्थानिक आक्रमक झाले आहेत (clash between protesters farmers and local peoples at Singhu Border).
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी दिल्ली धुमसल्यानंतर आता दिल्लीच्या सिंघू बॉर्डर येथील स्थानिक आक्रमक झाले आहेत. सिंघू बॉर्डरवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी जागा खाली करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. याच मुद्द्यावरुन आज स्थानिक आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये हिंसक झडप झाली. यावेळी स्थानिक तलवारी-काठ्या घेऊन आले होते. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रचंड प्रयत्न केला. अखेर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करावा लागला. या घमासानमध्ये अलीपूरचे SHO जखमी झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयातस दाखल करण्यात आलं आहे (clash between protesters farmers and local peoples at Singhu Border).
#WATCH | Delhi: Group of people claiming to be locals gather at Singhu border (Delhi-Haryana border) demanding that the area be vacated. pic.twitter.com/AHGBc2AuXO
— ANI (@ANI) January 29, 2021
स्थानिक आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये झडप सुरु असताना दोन्ही बाजूने दगडफेक देखील झाली. याशिवाय काही लोकांच्या हातात काठ्या तर काहींच्या हातात तलवारी बघायला मिळाल्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. याशिवाय हल्कासा लाठीचार्ज करावा लागला. त्यानंतर पोलिसांनी दोन जणांना अटक केली.
“आम्ही या आंदोलकांप्रती सहानुभूती दाखवली होती. मात्र, ज्याप्रकारे लाल किल्ल्यावर धुडगुस घालण्यात आला, त्यामुळे हे शेतकरी नाहीत, आंदोलक आहेत. देशाच्या अस्तित्वावर जाऊन यांनी आंदोलन केलं, त्यामुळे आता यांना सिंघू बॉर्डरवरुन हाकलून लावा”, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे (clash between protesters farmers and local peoples at Singhu Border).
दरम्यान, सिंघू बॉर्डरनंतर टीकरी बॉर्डरवरही आंदोलकांनी जागा खाली करावी, अशी मागणी करत स्थानिकांनी प्रदर्शने दिली.
#WATCH | Delhi: A group of people gather at Tikri border demanding that the area be vacated. pic.twitter.com/llBC6Q7g5f
— ANI (@ANI) January 29, 2021
सिंघु बॉर्डरवर आणखी एक प्रकार समोर आला. एक आंदोलक कंबरेला तलवार बांधून एका पोलिसावर हल्ला करण्यासाठी आला. सुरुवातीला पोलिसांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांठी त्याला लाठ्यांनी चोप दिला.
#WATCH: Delhi Police hit a protesting farmer after he attacked a Police personnel, dragging him to the ground along with him. Visuals from Singhu border.
(Note: Abusive language) pic.twitter.com/gILDF9OPA1
— ANI (@ANI) January 29, 2021
हेही वाचा : बायको गावी जायला तयार होईना, पतीकडून सपासप वार, डोंबिवलीतून हादरवणारी बातमी