लसीचा बूस्टर डोस देण्याच्या पंतप्रधानांच्या घोषणेचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

पंधरा ते अठरा वयोगटातील मुलांचे लसीकरण केल्याने विषाणूचा पुढील संसर्ग रोखण्यासाठी निश्‍चितपणे मदत होईल तसेच सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना देखील बूस्टर डोसमुळे फायदा मिळेल

लसीचा बूस्टर डोस देण्याच्या पंतप्रधानांच्या घोषणेचे मुख्यमंत्र्यांकडून  स्वागत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Dec 25, 2021 | 10:54 PM

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) यांनी डॉक्टर्स तसेच फ्रंट लाइनर्स यांना बूस्टर डोस देण्याची घोषणा केली. या घोषणेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांनी स्वागत केले आहे. बूस्टर डोस देण्यासंदर्भात नुकतीच राज्य मंत्रिमंडळात देखील चर्चा झाली होती आणि आमची ती मागणी होतीच असे मुख्यमंत्री म्हणाले.

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील सात डिसेंबर रोजी पत्र लिहून मुलांचे लसीकरण करण्याची तसेच बूस्टर डोस देण्याची विनंती केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना केली होती

याशिवाय पंधरा ते अठरा वयोगटातील मुलांचे लसीकरण केल्याने विषाणूचा पुढील संसर्ग रोखण्यासाठी निश्‍चितपणे मदत होईल तसेच सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना देखील बूस्टर डोसमुळे फायदा मिळेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मत आहे.

ज्येष्ठांसाठीही प्रीकॉशनरी जोश! 60 वर्षांवरील ज्येष्ठांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रीकॉशनरी डोस दिला जाईल. येत्या 10 जानेवारीपासून हे लसीकरण सुरु केलं जाईल, असं मोदींनी यावेळी म्हटलं. त्याचप्रमाणं फ्रंट लाईन आरोग्य कर्माचाऱ्यांना प्रीकॉशनरी कोरोना लसीचा डोस दिला जाईल, असंही मोदी यावेळी म्हणाले आहेत. गंभीर आजारांपासून पीडित असलेल्या आणि कोमॉर्बिड असलेल्या ज्येष्ठ नागरीकांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रॉकॉशनरी लस दिली जाणार आहे.

15 ते 18 वर्षा दरम्यानच्या मुला मुलींना कोरोना लस देणार 15 ते 18 वर्षा दरम्यानच्या मुला मुलींना कोरोना लस देण्यात येणार असल्याची घोषणा केली. 3 जानेवारी 2022 पासून ह्या लसीकरणाला देशात सुरु होईल असही पंतप्रधान म्हणाले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुसरी मोठी घोषणा ही 60 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्यांसाठी त्यातही जे कोमॉर्बिड आहेत त्यांच्यासाठी केली.

संबंधित बातम्या

Pro Kabaddi League PKL 2021-22: कोल्हापूरच्या सिद्धार्थची अपयशी झुंज, पुण्याचा पहिला विजय Pro Kabaddi League PKL 2021-22: फक्त एका पॉईंटने प्रदीप नरवालच्या यूपी योद्धाची पटनावर मात Video: आधी मोदी आणि आता अमित शाह, सुजय विखे पुन्हा पुन्हा फ्रेममध्ये का येतात? का हटवले जातात?

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....