Udhav Thackeray PM Modi Meet Live | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात स्वतंत्र बैठक, अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती

| Updated on: Jun 09, 2021 | 6:31 AM

मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेणार आहेत.

Udhav Thackeray PM Modi Meet Live | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात स्वतंत्र बैठक, अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती
उद्धव ठाकरे पत्रकार परिषद दिल्ली

मुंबई : मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली.   मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पंतप्रधानांची भेट घेतली.  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरेंमधील बैठक पावणे दोन तासानंतर संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद सुरु आहे.  (CM Udhav Thackeray Meet PM Narendra Modi In Delhi Live Updates).

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 08 Jun 2021 01:44 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आम्ही राजकीयदृष्ट्या सोबत नसलो तरी नात तुटलेलं नाही: उद्धव ठाकरे

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आम्ही राजकीयदृष्ट्या सोबत नसलो तरी नात तुटलेलं नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

  • 08 Jun 2021 01:29 PM (IST)

    आम्ही तिघेही समाधानी आहोत, बैठकीत राजकीय अभिनिवेश नव्हता: उद्धव ठाकरे

    आम्ही तिघेही समाधानी आहोत, राजकीय अभिनिवेश नव्हता. सर्व मुद्दे शांततेने मांडले, पत्र दिले, मोदींनी ज्या पद्धतीने ऐकून घेतले, त्यावरुन मला विश्वास आहे, सकारात्मक काही घडेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले

  • 08 Jun 2021 01:25 PM (IST)

    मोफत लस हा अधिकार आणि गरज: उद्धव ठाकरे

    आपल्या देशातील  नागरिकांना लस दिली पाहिजे ही महत्वाची गोष्ट आहे. केंद्र सरकारनं राज्यांवर 18-44 मधील व्यक्तींवर लसीकरणासाठी जबाबदारी दिली होती. देशातील जनेतला मोफत लस मिळावी हा अधिकार असून ती गरज आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीबद्दल आम्ही समाधानी आहोत. आम्ही पत्र त्यांना दिली आहेत.

  • 08 Jun 2021 01:19 PM (IST)

    विधानपरिषदेच्या 12 जागांचा प्रश्न पंतप्रधानांच्या कोर्टात

    विधानपरिषदेच्या 12 राज्यपाल नामनियुक्त जागांसदर्भात पंतप्रधानांनी राज्यपालांना निर्देश द्यावेत, अशी मागणी केली असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. गेल्या आठ महिन्यांपासून या जागांवरील नियुक्त्या रखडल्या आहेत.

  • 08 Jun 2021 01:14 PM (IST)

    महाराष्ट्राचे जीएसटीचे 24 हजार 360 कोटी रुपये मिळावेत: अजित पवार

    ओबीसी आरक्षणाच्या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाच्या 56 हजार जागा कमी झाल्या आहेत. एससी एसटी आरक्षण हे संविधानिक आहे आणि ओबीसी आरक्षण हे वैधानिक आहे. ओबीसी आरक्षण संविधानिक करण्यासाठी केंद्रानं घटनादुरुस्ती करावी. 2011 जनगणनेची माहिती राज्याला मिळावी. 2021 च्या जनगणनेत ओबीसीची जनगणना करण्यात यावी.

    महाराष्ट्र कोरोना संकटात असून राज्याचे जीएसटीचे 24 हजार 360 कोटी रुपये मिळावेत. पीक विम्याचं बीड मॉडेल संपूर्ण राज्यात लागू करावं. सध्या बीडमध्ये ते लागू आहे. एनडीआरएफच्या निकषात बदल करावेत, यापूर्वी 2015 मध्ये नियम बदलण्यात आहेत. आता  2021 मध्ये आहोत त्यामुळे नियम बदलण्यात यावेत, असं अजित पवार म्हणाले.

    14 व्या वित्त आयोगातील निधी महाराष्ट्राला मिळावा. शहरी आणि ग्रामीणसाठीचे केंद्रीय वित्त मंत्रालयाकडे प्रलंबित आहेत. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

  • 08 Jun 2021 01:09 PM (IST)

    मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणासंदर्भात केद्र सरकारनं सकारात्मक भूमिका घ्यावी : अशोक चव्हाण

    मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणासंदर्भात केद्र सरकारनं सकारात्मक भूमिका घ्यावी. केंद्र सरकारकडे 102 व्या घटनादुरुस्तीनंतर अधिकार आलेले आहेत. केंद्र सरकारकडे अधिकार आहेत. त्यांनी निर्णय घ्यावा, अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केल्याचं सांगितलं.

  • 08 Jun 2021 01:05 PM (IST)

    मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदी यांच्याकडे मांडलेले राज्याचे विषय

    मुख्यमंत्र्यांनी मोदींसमोर मांडलेले विषय

    १मराठा आरक्षणाचा विषय आहे २दुसरा महत्त्वाचा विषय इतर मागासवर्ग आरक्षणाबाबतचा हा विषय देशपातळीवरचा आहे. ३मागासवर्गीय बढतीमधील आरक्षण ४चौथा मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गच्या जागेचा विषय ५जीएसटीचा विषय, वेळेवर जीएसटी येणे ६शेतकऱ्यांच्या आयुष्याशी निगडीत प्रस्न – पीक कर्ज असतं तसं पीक विमा आहे, त्याच्या अटीशर्तीबाबत चर्चा, महाराष्ट्रात बीड पॅटर्नची माहिती दिली ७राज्यांमध्ये पाल.. स्पर्धात्मक ८महत्त्वाचा विषय मुंबईमध्ये केली होती – गेली काही वर्षे महाराष्ट्रात किनारपट्टीच्या भागात चक्रीवादळं येत आहेत. मदतीचे निकष जुने झाले आहेत, ते बदलणे ९आवश्यक आहे, राज्य सरकारने गेल्यावर्षी निकष बदलून मदत केली. मुलात NDRF चे निकष बदलणे आवश्यक १० चौदाव्या वित्त आयोगातील थकीत निधी ११ मराठा भाषेला अभिजात दर्जा मिळावा

  • 08 Jun 2021 01:03 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणाचे विषय मांडला

    मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, मागासवर्गीय आरक्षण, पीक विम्याचा बीड पॅटर्न, कांजूरमार्ग कारशेड मंजुरी , तोक्ते चक्रीवादळ, 14 व्या वित्त आयोगातील निधी, मराठी भाषेला अभिजात भाषेला दर्जा मिळावा, या विषयांवर नरेंद्र मोदींकडे मांडणी केली, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

  • 08 Jun 2021 12:59 PM (IST)

    Uddhav Thackeray Live : पंतप्रधान आम्ही मांडलेले विषय सोडवतील: उद्धव ठाकरे

    आपल्या देशाच्या माननीय पंतप्रधानांना भेटण्यासाठी आलो होतो. ही भेट अधिकृत स्वरुपाची होती. कोणत्या विषयासाठी भेटण्यासाठी आलो होतो. पंतप्रधानांनी आमचे विषय ऐकून घेतले आहेत. पंतप्रधान ते  विषय सोडवतील, अशी अपेक्षा आहे.

  • 08 Jun 2021 12:54 PM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्र सदन येथे दाखल

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्र सदन येथे दाखल झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा  आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण देखील महाराष्ट्र सदनात दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेतील.

  • 08 Jun 2021 12:47 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यातील बैठक संपली, मुख्यमंत्री थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार

    मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांची भेट घेतली.  मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पंतप्रधानांची भेट घेतली.  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरेंमधील बैठक जवळपास पावणे दोन तास चालली. मुख्यमंत्र्यांसह इतर नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानावरुन बाहेर पडले आहेत. महाराष्ट्र सदन येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेला संबोधित करतील.

  • 08 Jun 2021 12:17 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीचा फोटो पंतप्रधान कार्यालयाकडून ट्विट

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीचा फोटो पंतप्रधान कार्यालयाकडून ट्विट

  • 08 Jun 2021 12:10 PM (IST)

     कोल्हापूरसाठी 20 व्हेंटिलेटर पक्षाकडून देण्यासाठी आले आहे, उदय सामंत

    कोल्हापूर

    उदय सामंत –

    शासनाच्या पलीकडे शिवसेना पक्षाच काम, 20 व्हेंटिलेटर कोल्हापूरसाठी पक्षाकडून देण्यासाठी आले आहे

    आम्ही फक्त निवडणुका पुरते 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण अस म्हणत नाही तर करून दाखवतो

    कोल्हापूरकरांनी शासनाच्या नियमांचं काटेकोर पालन केले तर हा जिल्हा सुद्धा कोरोना मुक्त होईल

    या जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती अजून ही आटोक्यात आलेली नाही

  • 08 Jun 2021 12:07 PM (IST)

    नरेंद्र मोदी उद्धव ठाकरे भेटीच्या पार्श्वभूमीवर भाजपची महत्वाची बैठक

    नरेंद्र मोदी उद्धव ठाकरे भेटीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं महत्वाची बैठक बोलावली आहे.  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी भाजपच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक होणार आहे.

  • 08 Jun 2021 12:01 PM (IST)

    महाराष्ट्राचा जीएसटी परतावा मिळावा, अजित पवारांचं पंतप्रधानांना निवेदन

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी 24 हजार 500 कोटींचा जीएसटीचा परतावा द्यावा, असं निवदेन दिल्याची माहिती आहे.

  • 08 Jun 2021 11:38 AM (IST)

    विदर्भात 12 ते 14 जूनदरम्यान मॅान्सूनचं आगमन होणार

    – विदर्भात 12 ते 14 जूनदरम्यान मॅान्सूनचं आगमन होणार

    – नागपूर हवामान विभागानं वर्तवला मॅान्सुनचा अंदाज

    – गडचिरोली, गोंदियात जिल्ह्यातून मॅान्सुन विदर्भात प्रवेश करणार

    – विदर्भातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

    – आजपासून विदर्भाच्या बऱ्याच भागात पुर्वमौसमी पावसाची शक्यता

    – ११ तारखेला पूर्व विदर्भात चांगला पाऊस पडणार

    – नागपूर हवामान विभागाचा अंदाज

  • 08 Jun 2021 11:34 AM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी दाखल झाले तो क्षण 

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी दाखल झाले तो क्षण

  • 08 Jun 2021 11:32 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्या अर्धातासांहून अधिक वेळ बैठक सुरु

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्या अर्धातासांहून अधिक वेळ बैठक सुरु आहे. या बैठकीनंतर महाराष्ट्राच्या प्रश्नांवर मार्ग निघणार का याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

  • 08 Jun 2021 11:04 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरेंमधील बैठकीला सुरुवात

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरेंमधील बैठकीला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ही बैठक होत आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, तोक्ते वादळ, जीएसटी परतावा या  मुद्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. शिष्टमंडळाची भेट झाल्यानंतर नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक होणार असल्याची माहिती आहे.

  • 08 Jun 2021 10:54 AM (IST)

    नरेंद्र मोदी उद्धव ठाकरेंची भेट स्वागतार्ह, केंद्राने गुजरातला दाखविलेली उदारता महाराष्ट्राच्या वाट्याला यावी: नाना पटोले

    पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना भेटत आहेत. ही परंपरा आहे ती कायम राहिली पाहिजे.  मनमोहन सिंग सर्वांना भेटत असत. GST परताव्याची 90 हजार कोटीची रक्कम महाराष्ट्राला मिळायची आहे.  केंद्राच्या अखत्यारीत असलेले मराठा-ओबीसीं आरक्षणाचे मुद्दे भेटीत सुकर होतील अशी आशा आहे. वादळ मदतीबाबत केंद्राने गुजरातला दाखविलेली उदारता महाराष्ट्राच्या वाट्याला यावी अशी अपेक्षा आहे.

    चंद्रपूरात असलेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान-मुख्यमंत्री यांच्या आज दिल्लीत होणाऱ्या भेटीवर प्रतिक्रिया नोंदवत ही स्वागतार्ह भेट असल्याचे म्हटले आहे. मोदी विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना भेटत आहे ही परंपरा कायम राहिली पाहिजे असे सांगत मनमोहनसिंग पंतप्रधान असताना सर्वांना भेटत असत याची आठवण त्यांनी करून दिली. GST परताव्याची 90 हजार कोटीची रक्कम महाराष्ट्राला मिळायची आहे. त्याबाबत सकारात्मक निर्णय अपेक्षित असून केंद्राच्या अखत्यारीत असलेले मराठा-ओबीसीं आरक्षणाचे मुद्दे भेटीत सुकर होतील अशी आशा असल्याचे पटोले म्हणाले. वादळ नुकसान मदतीबाबत केंद्राने गुजरातला दाखविलेली उदारता महाराष्ट्राच्या वाट्याला यावी अशी अपेक्षा असल्याचेही ते म्हणाले.

  • 08 Jun 2021 10:42 AM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा ताफा पंतप्रधानांच्या निवासस्थानी दाखल

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा ताफा पंतप्रधानांच्या निवासस्थानी दाखल झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची थोड्यात वेळात पंतप्रधानांसोबत भेट होईल.

  • 08 Jun 2021 10:32 AM (IST)

    भाजपा मानसिक दृष्ट्या थकलेला पक्ष झालाय, अमोल मिटकरींचं प्रविण दरेकरांवर टीकास्त्र

    राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी  विधानपरिषदेचे विरोधी  पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर टीका केली आहे.  अजुन बैठकीला सुरुवात पण झाली नाही आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण जी दरेकर महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकार वर बोलायला लागले.अर्थ स्पष्ट आहे भाजपा मानसिक दृष्ट्या थकलेला पक्ष झालाय.बडबड आणि वायफळ विधाने यापेक्षा दुसर त्यांच्याकडे काही शिल्लक नाही., असं ते म्हणाले.

  • 08 Jun 2021 10:28 AM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्र सदनात न जाता पंतप्रधानांच्या भेटीला रवाना

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नवी दिल्लीत दाखल झाले असून महाराष्ट्रात सदनामध्ये जाण्याऐवजी ते थेट पतंप्रधानांच्या भेटीला रवाना झाले आहेत.  मराठा आरक्षण, कोरोना लसीकरण, जीएसटी परतावा, ओबीसी आरक्षण या मुद्यांवर या भेटीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

  • 08 Jun 2021 10:24 AM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधानांच्या भेटीसाठी दिल्लीत दाखल

  • 08 Jun 2021 10:14 AM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत दाखल, थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे  हे पंतप्रधानांच्या भेटीला थोड्याच वेळात पोहोचणार आहेत.

  • 08 Jun 2021 08:56 AM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर कोणते मुद्दे मांडणार?

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीत पुढील मुद्दे मांडू शकतात –

    1) मराठा आरक्षण

    2) जीएसटी परतावा

    3) नैसर्गिक आपत्तीनंतर मदत व पुनर्वसनातील NDRF च्या निकषात सुधारणा

    4) महाराष्ट्राला केंद्राकडून होणाऱ्या लसींच्या पुरवठ्यात वाढ करण्यात यावी.

  • 08 Jun 2021 07:56 AM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीहून विमानतळासाठी निघाले

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीहून विमानतळासाठी निघाले

    सकाळी  विमानाने दिल्लीकडे रवाना होणार आहे आणि सकाळी पहिल्या दिल्लीत महाराष्ट्र सदन येथे पोहचणार सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी पंतप्रधान बरोबर  बैठक होणार आहे.

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट दिल्लीला होणार आहे.

Published On - Jun 08,2021 8:43 AM

Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.