विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी, खासगी कोचिंग क्लासच्या बेफाम वाढीला लगाम, घेतला हा निर्णय

Education | राजस्थानातील कोटापासून कोचिंग क्लासचे सुरु झालेले पेव शहराशहरात पसरले आहे. कोचिंग क्लासेस देशभरात विद्यार्थ्यांना भरघोस गुणांचे आमिष दाखवतात. या कोचिंग क्लासमुळे विद्यार्थ्यांवर भयावह परिणाम दिसू लागले आहे.

विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी, खासगी कोचिंग क्लासच्या बेफाम वाढीला लगाम, घेतला हा निर्णय
coaching classes
Follow us
| Updated on: Jan 19, 2024 | 2:26 PM

रमेश शर्मा, नवी दिल्ली, दि.19 जानेवारी 2024 | मुलगा बालवाडीत असला तरी आपल्याकडे शिकवणीचे फॅड आलेले आहे. शाळेपेक्षा शिकवणी आणि कोचिंग क्लास आवश्यक झाले आहे. यामुळे मुलांमध्ये ताणतणाव निर्माण होत आहे. राजस्थानातील कोटापासून कोचिंग क्लासचे सुरु झालेले पेव शहराशहरात पसरले आहे. कोचिंग क्लासेस देशभरात विद्यार्थ्यांना भरघोस गुणांचे आमिष दाखवतात. या कोचिंग क्लासमुळे विद्यार्थ्यांवर भयावह परिणाम दिसू लागले आहे. यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने कडक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. आता १६ वर्षांखालील मुलांना कोचिंग क्लासमध्ये प्रवेश देता येणार नाही. तसेच उत्तम रँक तसेच भरघोस गुणांचे आश्वासने देण्यासही मनाई करण्यात आली आहे.

एक लाख दंड अन्…

खासगी कोचिंग क्लासच्या बेफाम वाढीला लगाम घालण्यासाठी केंद्रीय मंत्रालयाने पावले उचलली आहेत. त्यासाठी एक नियमावली तयार केली आहे. या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांना एक लाख रुपयांपर्यंत दंड किंवा जास्त शुल्क आकारल्यास नोंदणी रद्द करण्यात येणार आहे.

समुपदेशन प्रणाली विकसित करा

कठीण स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक तणाव येतो. या ताणतणापासून वाचविण्यासाठी कोंचिंग संस्थांनी समुपदेशन प्रणाली विकसित करण्यात यावी. ही प्रणाली विकसित केल्याशिवाय संस्थेची नोंदणी करता येणार नाही. प्रत्येक कोचिंग संस्थेकडे एक वेबसाईट असावी. त्या वेबसाईटमध्ये शिक्षकांचे शिक्षण, पात्रता, कोणता अभ्यासक्रम शिकवतात, अभ्यासक्रम पूर्ण होण्याचा कालावधी, इतर सुविधा आणि शुल्काची माहिती असावी.

हे सुद्धा वाचा

हे आहेत नियम

पदवीपेक्षा कमी पात्रतेचे शिक्षकांची नियुक्त करता येणार नाही. १६ वर्षांखालील विद्यार्थ्यांना कोचिंगमध्ये प्रवेश देता येणार नाही. कोचिंगमधील विद्यार्थ्यांना चांगल्या गुणांची हमी देता येणार नाही. माध्यमिक शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यास कोचिंगमध्ये प्रवेश दिला जावा. विद्यार्थ्यांना शुल्काच्या पावत्या द्यावा, तसेच हे शुल्क वाजवी असावे. विद्यार्थ्यांनी मध्येच अभ्यासक्रम सोडल्यास उर्वरित कालावधीचे शुल्क परत देण्याचा नियम करण्यात आला आहे.

हे ही वाचा शिक्षणाची दुर्दशा, दहावीत आले पण दुसरीचे मातृभाषेचे पुस्तक वाचता येईना

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.