VIDEO : कोस्ट गार्डच शौर्य, समुद्रातला थरार, पाकिस्तानच्या ताब्यातून सात भारतीयांची अशी केली सुटका

VIDEO : भारतीय तटरक्षक दल म्हणजे कोस्ट गार्डने सिग्नल मिळताच क्षणाचाही विलंब न लावता लगेच Action घेतली. गुजरात किनारपट्टीपासून खोल समुद्रात हा सर्व थरार रंगला. भारत-पाकिस्तान सागरी सीमेजवळ मासेमारी प्रतिबंधित क्षेत्राच्या आसपास ही बोट होती.

VIDEO : कोस्ट गार्डच शौर्य, समुद्रातला थरार, पाकिस्तानच्या ताब्यातून सात भारतीयांची अशी केली सुटका
Coast Guard Rescues 7 Indian Fishermen
Follow us
| Updated on: Nov 19, 2024 | 9:03 AM

कोस्ट गार्ड म्हणजे भारतीय तटरक्षक दलाने पुन्हा एकदा आपल्या शौर्याचा परिचय दिला आहे. कोस्ट गार्डने सात भारतीय मच्छीमारांना पाकिस्तानी तुरुंगात जाण्यापासून वाचवलं. कोस्ट गार्डने पाकिस्तान मेरीटाइम सिक्युरिटी एजन्सीच्या ताब्यातून सात भारतीय मच्छीमारांची सुटका केली. गुजरात किनारपट्टीपासून खोल समुद्रात हा सर्व थरार रंगला. रविवारी दुपारी कोस्ट गार्डला भारतीय नौकेकडून ते अडचणीत असल्याचा सिग्नल मिळाला. भारत-पाकिस्तान सागरी सीमेजवळ मासेमारी प्रतिबंधित क्षेत्राच्या आसपास ही बोट होती.

“रविवारी दुपारी 3.30 च्या सुमारास नो फिशिंग झोन जवळ असलेल्या भारतीय मच्छीमारी नौकेकडून ते अडचणीत असल्याचा ICG ला सिग्नल मिळाला. कालभैरव नौकेला पाकिस्तानच्या PMSA जहाजाने रोखलं. या नौकेवरील सात भारतीय मच्छीमारांना अटक केली होती” अशी माहिती कोस्ट गार्डने दिली आहे.

सिग्नल मिळताच लगेच Action

कोस्ट गार्डला सिग्नल मिळताच त्यांनी लगेच कारवाई सुरु केली. आपली नौका भारत-पाकिस्तान सागरी सीमेजवळ पाठवली. कोस्ट गार्डने मागे हटावं यासाठी पाकिस्तानी नौकेने प्रयत्न केले. पण भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजाने पाकिस्तानी बोटीला सागरी सीमेजवळ रोखून धरलं. त्यांना भारतीय मच्छीमारांना सोडण्यासाठी भाग पाडलं. भारतीय तटरक्षक दलाने पाकिस्तानी जहाजाला भारतीय मच्छीमारांची सुखरुप सुटका करण्यासाठी भाग पाडलं. त्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. या सगळ्या कारवाई दरम्यान कालभैरव बोटीच नुकसान झालं आहे.

आता चौकशी का?

भारतीय मच्छीमारांना घेऊन कोस्ट गार्डचं जहाज सोमवारी ओखा बंदरात पोहोचलं. आता ICG, गुजरात पोलीस, गुप्तचर यंत्रणा आणि मच्छीमार खात्याकडून चौकशी सुरु आहे. पाकिस्तान मेरीटाइम सिक्युरिटी एजन्सी आणि कालभैरव नौका आमने-सामने कशी आली? त्याचा तपास केला जात आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.