राहुल गांधी यांनी पूनम कौरचा का पकडला होता हात, त्याचं उत्तर तिनेच दिलंय, तेही सडेतोड…
राहुल गांधी आणि अभिनेत्री पूनम कौर यांच्या फोटोची भाजप नेत्या प्रीती गांधी यांनी खिल्ली उडवली. त्यामुळे प्रीती गांधींना शनिवारी ट्रोल करण्यात आले.
नवी दिल्लीः सध्या काँग्रेसने काढलेल्या भारत जोडो यात्रेला नागरिकांमधून उदंड प्रतिसाद मिळत आहे. या भारत जोडो यात्रेचं नेतृत्त्व राहुल गांधी करत असले तरी हजारो नागरिक राहुल गांधींची भेट घेऊन त्यांच्याबरोबर आपल्या भावना शेअर करत आहेत. या भारत जोडो यात्रेचे अनेक फोटोही सोशल मीडियाव प्रचंड व्हायरल होत आहेत. कालही या यात्रेतील पूनम कौर आणि राहुल गांधींचा फोटो व्हायरल झाला, कारण तो फोटो प्रीती गांधींनी शेअर केला आणि राहुल गांधी यांच्यावर टीका करता करता प्रीती गांधीच त्यामुळे ट्रोल झाल्या. अनेक यूजर्सनी त्यांना अनेक सवाल उपस्थित तर केलेच पण भाजप समर्थक यूजर्सनीही त्यांना चुकीचे ठरवले आहे.
This is absolutely demeaning of you , remember prime minister spoke about #narishakti – I almost slipped and toppled that’s how sir held my hand . https://t.co/keIyMEeqr6
— पूनम कौर ❤️ poonam kaur (@poonamkaurlal) October 29, 2022
राहुल गांधी आणि अभिनेत्री पूनम कौर यांच्या फोटोची भाजप नेत्या प्रीती गांधी यांनी खिल्ली उडवली. त्यामुळे प्रीती गांधींना शनिवारी ट्रोल करण्यात आले.
Following the footsteps of his great grand father!!? pic.twitter.com/iAFMrOyg6w
— Priti Gandhi – प्रीति गांधी (@MrsGandhi) October 29, 2022
राहुल गांधी आणि पूनम कौर या दोघांच्या छायाचित्रावर चुकीच्या पद्धतीने कमेंट केल्याने प्रीती गांधी यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. त्यामध्ये ज्या प्रमाणे काँग्रेस समर्थन, नेते होते त्याच प्रमाणे भाजपचे समर्थकांनीही त्यांचा हा मुद्दा चुकीचा असल्याचे सांगितले.
सोशल मीडिया यूजर्सनी त्यांच्यावर प्रचंड टीका केली आहे तर दुसरीकडे काँग्रेसनेही त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवत आहे. सोशल मीडियाच्या या गदारोळानंतर अखेर अभिनेत्री पूनम कौर यांनी पुढे येत भाजप नेत्या प्रीती गांधी यांना चोख प्रत्युत्तर दिले. भारत जोडो यात्रेत राहुल गांधींनी हात का धरला होता हे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
अभिनेत्री पूनम कौर आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा भारत जोडो यात्रेदरम्यानचा एक फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. त्या फोटोमध्ये राहुल गांधी आणि पूनम कौर यांनी एकमेकांचा हात धरला आहे.
हाच फोटो प्रीती गांधी यांनी ट्विटरवर पोस्ट करत कर्नाटकच्या भाजप नेत्या प्रीती गांधी यांनी खिल्ली उडवली. त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरुन फोटो शेअर करत लिहिले आहे की, पणजोबांच्या पावलावर पाऊल” या त्यांच्या ट्विटवरुन त्यांच्यावर प्रचंड टीका करण्यात येत आहे.
प्रीती गांधींच्या या ट्विटवर पूनम कौरनेही सडेतोड उत्तर देत रिट्विट केले आहे. हे खरोखर तुमचा अपमान आहे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
त्या म्हणाल्या की, नरेंद्र मोदी नारी शक्तीबद्दल बोलतात, आणि तुम्ही या प्रकारचे ट्विट करत आहेत. मी पाय घसरून पडणार होता, त्यावेळी राहुल सरांनी माझ्या हाताला धरुन मला सावरण्याचा प्रयत्न केला म्हणत त्यांनी राहुल गांधींचेही आभार मानले आहेत.
राहुल गांधी आणि पूनम कौर यांचा प्रीती गांधींनी फोटो शेअर केल्या नंतर त्या प्रचंड ट्रोल झाल्या. त्यानंतर काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेट यांनीही प्रीती गांधी यांच्या ट्विटला उत्तर दिले. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, “होय, तो आपल्या पणजोबांच्या पावलावर पाऊल ठेवत आपल्या देशाला एकत्र करत आहे.