नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावर ‘हे’ पक्ष घालणार बहिष्कार; विरोधकांनी का घेतली आहे टोकाची भूमिका…

लोकसभा सचिवालयातून समोर आले की, 18 मे रोजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. बिर्ला यांनी पंतप्रधान मोदींना नवीन संसद भवनाच्या उद्घाटनासाठी आमंत्रित केले आहे.

नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावर 'हे' पक्ष घालणार बहिष्कार; विरोधकांनी का घेतली आहे टोकाची भूमिका...
Follow us
| Updated on: May 24, 2023 | 8:12 PM

नवी दिल्ली : देशाच्या नव्या संसद भवनाचे उद्घाटन होत असताना पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसच्या बहिष्काराच्या घोषणेनंतर आता 28 मे रोजी होणाऱ्या नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभातून काँग्रेसह 19 राजकीय पक्ष बहिष्कार टाकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षाचे नेते पक्षांतर्गत चर्चा करत असून लवकरच त्याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता असल्याची माहितीही देण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमावर काँग्रेस बहिष्कार टाकू शकते. असे झाले तर उद्घाटन सोहळ्यात काँग्रेसचा एकही नेता उपस्थित राहणार नाही.

उद्घाटनाच्या घोषणेपासून विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, तृणमूल काँग्रेस, द्रविड मुनेत्र कळघम,जनता दल (संयुक्त),आम आदमी पक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी), समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, इंडियन युनियन मुस्लीम लीग,झारखंड मुक्ती मोर्चा,नॅशनल कॉन्फरन्स, केरळ काँग्रेस (मणि), रिव्हल्यूशनरी सोशलिस्ट पार्टी,विदुथलाई चिरुथैगल कच्छी,मारूमलार्ची द्रविड मुनेत्र कळघम, राष्ट्रीय लोक दल या 19 राजकीय पक्षांनी बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.

आम आदमी पक्षाकडूनही मंगळवारी संध्याकाळी नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभावर बहिष्कार टाकणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

पक्षाच्यावतीने अधिकृत निवेदन जारी करून ही माहिती देण्यात आली आहे. राष्ट्रपतींना उद्घाटन समारंभाला का बोलावले जात नाही, असा सवाल उपस्थित करुन विरोधकांनी हा निर्णय घेतला आहे.

तृणमूल काँग्रेसच्या वतीने राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन यांनी सोशल मीडियावरुन सांगितले आहे की, तृणमूल नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभात सहभागी होणार नाही.

यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सर्व काही ‘मी’, माझे आणि मी एवढ्यावरच त्यांनी जोर लावला आहे.

त्यामुळे तृणमूल काँग्रेसने म्हटले आहे की, संसद भवन ही केवळ इमारत नसून ती परंपरा, मूल्ये, आदर्श आणि नियम यांची स्थापना असल्याचेही मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

लोकसभा सचिवालयातून समोर आले की, 18 मे रोजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. बिर्ला यांनी पंतप्रधान मोदींना नवीन संसद भवनाच्या उद्घाटनासाठी आमंत्रित केले आहे.

हे वृत्त समोर आल्यापासून विरोधी पक्षनेते सातत्याने मोदींवरून विरोध केला जात आहे. उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याऐवजी राष्ट्रपतींना का बोलावण्यात आले नाही? असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....