“एकवाक्यता होईल पण पक्षश्रेष्ठीच निर्णय घेतील”; काँग्रेस नेत्याने आघाडीबाबत स्पष्टच सांगितले…

महाविकास आघाडी म्हणून त्याची तयारी कशी करता येईल त्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाबरोबर चर्चा करुन हा निर्णय घेण्यात येईल असंही अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

एकवाक्यता होईल पण पक्षश्रेष्ठीच निर्णय घेतील; काँग्रेस नेत्याने आघाडीबाबत स्पष्टच सांगितले...
Follow us
| Updated on: Jun 06, 2023 | 10:31 PM

नवी दिल्ली : राज्यातील राजकीय वातावरण सध्या आगामी काळातील होणाऱ्या निवडणुकीच्या विषयावरून ढवळून निघाले आहे. राजकीय पक्षांनी आपापल्या जागांची चाचपणी सुरु केली असून आता राजकीय पक्षांनी लोकसभेच्या जागांवर दावाही केला आहे. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीची तारीख जाहिर झाली नसली तरी आतापासून राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांबरोबर त्याबाबत चर्चा सुरु करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आज माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाण यांनी दिल्ली वारी केल्यानंतर त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली.

यावेळी त्यांनी आपल्या खाजगी कामानिमित्त दिल्लीत होते असं सांगण्यात येत असले तरी त्यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन कर्नाटक निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल त्यांचे त्यांनी अभिनंदन केल्याचेही त्यांनी सांगितले.

माजी मुख्यमंत्र अशोक चव्हाण यांनी दिल्ली वारीविषयी बोलताना सांगितले की, माझे खासगी काम असले तरी, कर्नाटकच्या निवडणुकीनंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याबरोबर फोनवरूनच चर्चा झाली होती.

त्यामुळे त्यामुळे दिल्लात आल्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन त्या विजयाचे त्यांचे अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर आगामा काळात होणाऱ्या निवडणुकीबाबत त्यांच्याबरोबर चर्चाही केली आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याबरोबर आगामी काळातील निवडणुका आणि त्याच बरोबर लोकसभा आणि राज्या राज्यातील विधान सभेच्या निवडणुकांविषयी नेमकी तयारी आणि त्याबाबतची दिशा यावरही त्यांच्याबरोबर चर्चा केली आहे.

त्याचबरोबर येणाऱ्या काळात निवडणुका लढताना स्वतंत्र की आघाडी करुन लढण्याचा पक्ष विचार करत आहे का याचीही खर्गे यांच्याबरोबर चर्चा झाल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

मल्लिकार्जुन खर्गे यांनी राज्यातील राजकीय घडामोडींचाही आढावा घेण्याचा प्रयत्न केला असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

येणाऱ्या निवडणुकीमध्ये राज्यातील आघाडीची गणित काय असतील याची चर्चा मल्लिकार्जुन खर्गे यांच्याबरोबर चर्चा झाली आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडी म्हणून त्याची तयारी कशी करता येईल त्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाबरोबर चर्चा करुन हा निर्णय घेण्यात येईल असंही अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडीबरोबर एकवाक्यत होणारच आहे, मात्र याबाबतचा निर्णय हा पक्षश्रेष्ठीच निर्णय घेतील असंही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी निवडणुका आणि राज्यातील घडामोडींबाबत चर्चा करण्यात आली मात्र अमित शाह यांच्या कोणत्याही दौऱ्यावर आम्ही चर्चा केली नाही असंही अशोक चव्हाण यांनी स्पष्ट सांगितले.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.