शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा सोनिया गांधींचा निर्णय

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांचा विरोध करण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरतील. | Congress

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा सोनिया गांधींचा निर्णय
Follow us
| Updated on: Dec 08, 2020 | 7:47 AM

नवी दिल्ली: दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) बुधवारी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस नेते गोविंद सिंह डोटासरा यांच्याकडून ही माहिती देण्यात आली. कोरोना आणि शेतकरी आंदोलन या दोन घटनांच्या पार्श्वभूमीवर सोनियाजी आपला वाढदिवस साजरा करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Congress president Sonia Gandhi will not celebrate her birthday in view of farmers protest)

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांचा विरोध करण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरतील, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे आता काँग्रेस आज देशभरात कृषी कायद्यांविरोधात कशाप्रकारे आंदोलन करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत?

केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावेत, ही शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. त्यासाठी गेल्या 12 दिवसांपासून पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातून आलेले शेतकरी आंदोलन करत आहेत. सध्या हे शेतकरी दिल्लीच्या वेशीवर ठिय्या देऊन बसले आहेत.

आंदोलनात किती संघटनाचा सहभाग?

शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी पुकारण्यात आलेल्या भारत बंद आंदोलनाला अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दिल्याने कडकडीत बंद पाळला जाण्याची शक्यता आहे. या आंदोलनात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, आम आदमी पक्ष, टीआरएस, आरजेडी, टीएमसी, डीएमके, सपा, जेएमएम आणि आयएनएलडी हे पक्ष सहभागी झाले आहेत.

‘आजच्या आंदोलनात फूट पाडण्याचे सत्ताधाऱ्यांचे मनसुबे’

शेतकऱ्यांच्या आंदोलनात फूट पाडण्याचे केंद्र सरकारचे मनसुबे असल्याची टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून करण्यात आली आहे. गेल्या 11-12 दिवसांत तसे फारसे प्रयत्नच सरकारकडून झालेले दिसत नाहीत. उलट आंदोलन लांबवायचे आणि शेतकऱ्यांचा निर्धार डळमळीत होण्याची वाट पाहायची, तशी संधी मिळताच आंदोलन निष्प्रभ करायचे, असा सरकारचा प्रयत्न असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

संबंधित बातम्या:

FARMER PROTEST | कृषी कायद्यावर विरोधी पक्षांची भूमिका दुतोंडी ? केंद्रीय कायदा मंत्र्यांचा हल्लाबोल

क्रीडापटूंची शेतकऱ्यांना साथ, राष्ट्रपती भवनात पुरस्कार वापसीसाठी जाणाऱ्या खेळाडूंची पोलिसांकडून अडवणूक

8 डिसेंबर रोजी भारत बंद! जाणून घ्या; मुंबईसह राज्यात काय सुरू असेल आणि काय बंद?

(Congress president Sonia Gandhi will not celebrate her birthday in view of farmers protest)

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.