फडणवीसांना फक्त उद्धव ठाकरेंचीच नाही तर ममतांचीही टक्कर, गोव्यात काँग्रेसचं मोठं नुकसान, माजी मुख्यमंत्र्यानं पक्ष सोडला

विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते लुईजिन्हो फलेरो (Luizinho Faleiro) यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. लुईजिन्हो फलेरो ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

फडणवीसांना फक्त उद्धव ठाकरेंचीच नाही तर ममतांचीही टक्कर, गोव्यात काँग्रेसचं मोठं नुकसान, माजी मुख्यमंत्र्यानं पक्ष सोडला
ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल
Follow us
| Updated on: Sep 27, 2021 | 4:27 PM

पणजी: गोव्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते लुईजिन्हो फलेरो (Luizinho Faleiro) यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. लुईजिन्हो फलेरो ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. फलेरो यांनी यापूर्वी ममतांचे कौतुक केले होते. यामुळं ते टीएमसीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. फलेरो यांनी पक्षाचा राजीनाम्यानंतर समर्थकांना संबोधित करताना ‘मी काँग्रेसमध्ये पीडित होतो. जर, माझी वेदना एवढी होती, तर सत्तेसाठी काँग्रेसला मतदान करणाऱ्या गोवांच्या दुर्दशेची कल्पना करा, असं फलेरो म्हणाले. मला गोव्याचा हा त्रास संपवायचा आहे, असंही लूईजिन्हो फलेरो म्हणाले आहेत. फलेरो यांनी टीएमसीमध्ये प्रवेश केल्यास महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुढं ममता बॅनर्जींचं आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गोव्याची जबाबदारी देण्यात आलीय, तर शिवसेनेनं देखील निवडणूक लढवण्याची घोषणा केलीय.

माझं रक्त तरुण

लुईजिन्हो फलेरो म्हणाले, ‘आपण हे दुःख संपवू आणि गोव्यात एक नवी पहाट आणू. मी म्हातारा आहे पण माझे रक्त तरुण आहे. ‘नावेलीम विधानसभेतील लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि भविष्यातील वाटचालीत नावेलीममधील जनेतेनं समर्थन द्यावं, अशी अपेक्षा लुईजिन्हो फलेरो यांनी केली.

ममता बॅनर्जींचं कौतुक

2019 मध्ये त्रिपुराचे काँग्रेस प्रभारी असलेले फलेरो टीएमसीला फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. त्रिपुरामध्ये टीएमसीसाठी त्यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनवलं जाऊ शकतं, अशी सूत्रांची माहिती आहे. फलेरो यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे वर्णन ‘स्ट्रीट फाइटर’ असे केले होते. ममता बॅनर्जी फुटीरतावादी शक्तींशी एकट्या लढत आहेत, असं लुईजिन्हो फलेरो म्हणाले होते.

गोवा विधानसभा निवडणूक टीएमसी लढवणार

तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनी त्यांचा पक्ष गोव्यातील विधानसभा निवडणुकीत आपला उमेदवार उभा करेल, असं म्हटलं होतं. पक्ष लवकरच मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करेल, असंही ते म्हणाले होते. गोव्यातील सत्ताधारी भाजप आमचा मोठा प्रतिस्पर्धी आहे, असे डेरेक ओब्रायन म्हणाले होते. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील पक्षात “हाय कमांड संस्कृती” नाही, असं ओब्रायन म्हणाले होते. गोव्यात टीएमसी स्थानिक नेत्यांना उभं करेल, असं डेरेक ओब्रायनं म्हणाले आहेत. जर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सामना करू शकणारा एक नेता असेल तर तो ममता बॅनर्जी आहे.

इतर बातम्या :

Bhawanipur By-Election: भवानीपूर पोटनिवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला, TMC म्हणाली, दिलीप घोष यांच्या गार्डने बंदुक दाखवली

Ayushman Bharat Digital Mission: देशभरातील सर्व रुग्णालये जोडणार, प्रत्येकाला हेल्थ आयडी देणार, जाणून घ्या मोदींच्या भाषणातील 10 प्रमुख गोष्टी

Congress leader Luizinho Faleiro left party will be join TMC said by sources

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.