नारायण राणे, भावना गवळी ते यशवंत जाधव… भाजपची क्लीनचिट कुणाकुणाला?; काँग्रेसच्या बड्या नेत्याने व्हायरल केली लिस्ट

थरूर यांनी शेअर केलेल्या यादीत राज्यसभेतील खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं नाव आहे. याशिवाय कर्नाटकातील माजी मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा आणि पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते शुभेंदु अधिकारी यांचंही नाव आहे.

नारायण राणे, भावना गवळी ते यशवंत जाधव... भाजपची क्लीनचिट कुणाकुणाला?; काँग्रेसच्या बड्या नेत्याने व्हायरल केली लिस्ट
narayan raneImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 28, 2023 | 6:46 PM

नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदिया यांना सीबीआयने अटक केली आहे. सीबीआयच्या अटकेनंतर सिसोदिया यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामाही दिला आहे. अबकारी धोरण घोटाळ्यात सिसोदिया यांना तुरुंगात जावं लागलं आहे. सिसोदिया यांच्या अटकेनंतर सर्वच विरोधी पक्षांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी तर भाजपकडून क्लीनचिट मिळालेल्या नेत्यांची यादीच जारी करून भाजपला कोंडीत पकडलं आहे.

हे सुद्धा वाचा

ज्या नेत्यांना भाजपने क्लीनचिट दिली आहे. त्यातील काही लोक सध्या केंद्रात मंत्री आहेत. तर काही लोक मुख्यमंत्री आहेत. ही यादी ट्विटरवर जाहीर केल्यानंतर शशी थरूर यांनी एक पोस्टही लिहिली आहे. चर्चा होत आहे. त्यामुळे जे माझ्याकडे आलं ते शेअर करत आहे. नेहमीच ना खाऊंगा, ना खाने दुंगा या घोषणेचं आश्चर्य वाटतं. मला वाटतं ही घोषणा केवळ बीफच्या अनुषंगानेच असावी, असा चिमटा शशी थरूर यांनी काढला आहे.

यामिनी जाधव, प्रताप सरनाईकही

थरूर यांनी शेअर केलेल्या यादीत राज्यसभेतील खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं नाव आहे. याशिवाय कर्नाटकातील माजी मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा आणि पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते शुभेंदु अधिकारी यांचंही नाव आहे. आसामचे सीएम हिमंता बिस्वा सरमा, लोकसभेतील शिवसेनेच्या (शिंदे गट) खासदार भावना गवळी, शिवसेनेचे माजी नगरसेवक यशवंत जाधव, शिवसेनेच्या आमदार यामिनी जाधव आणि प्रताप सरनाईक यांचीही नावे आहेत. कायद्यासमोरील हीच काय समानता आहे? असा सवालही त्यांनी या पोस्टमधून केला आहे.

300 कोटींचा आरोप

भाजपमध्ये येण्यापूर्वी नारायण राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली होती. राणेंवर 300 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगचा आरोप होता. 2016मध्ये अविघ्न ग्रुपसोबत मिळून 300 कोटी रुपयांची मनी लाँड्रिंग केल्याचा राणेंवर ईडीने आरोप ठेवला होता. मात्र, 2017मध्ये राणेंनी काँग्रेस सोडली. त्यानंतर स्वत:चा पक्ष स्थापन केला. त्यानंतर राणेंनी 2019मध्ये आपला पक्ष भाजपमध्ये विलीन केला. त्यानंतर ते राज्यसभेत खासदार झाले आणि केंद्रात मंत्रीही झाले, अशी माहिती ट्विटमध्ये दिली आहे.

खासदार भावना गवळी या आता शिंदे गटात आहेत. ईडीचे 5 समन्स आल्यानंतर त्यांनी शिवसेना सोडली होती. आता त्या शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या लोकसभेत मुख्य प्रतोद आहेत.

त्या केसचं काय झालं?

यशवंत जाधव हे शिवसेनेचे माजी नगरसेवक आहेत. ते मुंबई महापालिकेत स्थायी समितीचे अध्यक्ष होते. त्यांच्या पत्नी यामिनी जाधव शिवसेनेच्या आमदार आहेत. जाधव कुटुंबाच्या घरावर आयकर विभागाच्या धाडी पडल्या होत्या. त्यानंतर ते शिंदे गटात गेले. त्यानंतर या केसचं काय झालं? असा सवाल थरूर यांनी विचारला आहे.

आता केस बंद

प्रताप सरनाईकही आमदार आहेत. ते शिवसेनेत असताना त्यांच्या घरावर ईडीची धाड पडली होती. त्यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. आता शिंदे गटात आहेत. त्यांची केस बंद आहे, असं थरूर यांनी म्हटलं आहे.

'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, हे राज्य कोणाच्या भरवशावर?'
'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, हे राज्य कोणाच्या भरवशावर?'.
मोठी बातमी, ... तरच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार, एकनाथ शिंदे अडून बसले
मोठी बातमी, ... तरच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार, एकनाथ शिंदे अडून बसले.
... अशी होणार मुख्यमंत्र्यांच्या नवाची घोषणा, शपथविधीचा मुहूर्त ठरलं!
... अशी होणार मुख्यमंत्र्यांच्या नवाची घोषणा, शपथविधीचा मुहूर्त ठरलं!.
'ते' पुन्हा येणार! नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच मुहूर्त-ठिकाण ठरल
'ते' पुन्हा येणार! नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच मुहूर्त-ठिकाण ठरल.
गोंदियात 'शिवशाही'चा भीषण अपघात, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
गोंदियात 'शिवशाही'चा भीषण अपघात, मृतांचा आकडा वाढण्याची भीती.
'... त्यांना सत्तेत ठेवले हेच मोठं',बच्चू कडू यांचा नेमका कोणाला टोला?
'... त्यांना सत्तेत ठेवले हेच मोठं',बच्चू कडू यांचा नेमका कोणाला टोला?.
भाजपचं पारडं जडच...फडणवीस CM, मुख्यमंत्रिपदासह 'ही' मोठी खाती BJP कडे?
भाजपचं पारडं जडच...फडणवीस CM, मुख्यमंत्रिपदासह 'ही' मोठी खाती BJP कडे?.
मागणी केलेल्या खात्यांपैकी कोणती खाती शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार?
मागणी केलेल्या खात्यांपैकी कोणती खाती शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार?.
नव्या सरकारमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या पारड्यात कोणती खाती?
नव्या सरकारमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या पारड्यात कोणती खाती?.
मतांचा टक्का वाढला, विरोधकांच्या आरोपांवर काय म्हणाले निवडणूक अधिकारी?
मतांचा टक्का वाढला, विरोधकांच्या आरोपांवर काय म्हणाले निवडणूक अधिकारी?.