काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांच्या निकटवर्तीयाला सीबीआयची अटक, चीनशी संबंधित केसमध्ये छापेमारी

मंगळवारी सीबीआयच्या पथकाने कार्ती चिदंबरम यांच्या घर आणि कार्यालयासह 9 ठिकाणी छापे टाकले. चेन्नई, दिल्ली आदी ठिकाणी हे छापे टाकण्यात आले. सीबीआयने मुंबईतील तीन, कर्नाटकातील एक आणि पंजाब-ओडिशातील प्रत्येकी एका ठिकाणीही धाडी टाकल्या होत्या.

काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांच्या निकटवर्तीयाला सीबीआयची अटक, चीनशी संबंधित केसमध्ये छापेमारी
Karti ChidambaramImage Credit source: टीव्ही 9
Follow us
| Updated on: May 18, 2022 | 10:23 AM

नवी दिल्ली : काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम (Karti Chidambaram) यांच्या निकटवर्तीयाला सीबीआयने (CBI) अटक केली आहे. कालच्या छाप्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कार्ती चिदंबरम यांचा निकटवर्तीय भास्कर रमण याला सीबीआयने अटक केली आहे. त्याच्यावर लाचखोरी आणि भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. कार्ती चिदंबरम यांच्या 9 मालमत्तांवर काल छापे टाकण्यात आले होते. चीनशी (China Visa Case) संबंधित एका प्रकरणावरून ही कारवाई करण्यात आली. यामध्ये भास्कर रमण यालाही अटक करण्यात आली आहे.

चीनशी संबंधित प्रकरण काय आहे?

सीबीआयने मंगळवारी लोकसभा खासदार कार्ती चिदंबरम यांच्याविरोधात नवीन गुन्हा दाखल केला. माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांचे सुपुत्र कार्ती यांच्यावर 250 चिनी नागरिकांना भारतीय व्हिसा मिळवून दिल्याचा आरोप आहे, त्या बदल्यात त्यांनी 50 लाख रुपयांची लाच घेतल्याचा दावा केला जातो.

हे सुद्धा वाचा

मंगळवारी सीबीआयच्या पथकाने कार्ती चिदंबरम यांच्या घर आणि कार्यालयासह 9 ठिकाणी छापे टाकले. चेन्नई, दिल्ली आदी ठिकाणी हे छापे टाकण्यात आले. सीबीआयने मुंबईतील तीन, कर्नाटकातील एक आणि पंजाब-ओडिशातील प्रत्येकी एका ठिकाणीही धाडी टाकल्या होत्या.

सीबीआयचा आरोप काय?

ज्या प्रकरणात सीबीआयने नवीन गुन्हा दाखल केला आहे, त्या प्रकरणाचा तपास आधीच सुरू होता. यूपीए सरकारच्या काळात कार्ती चिदंबरम यांनी 250 चिनी नागरिकांना व्हिसा मिळवून दिला, त्या बदल्यात त्यांनी 50 लाख रुपयांची लाच घेतल्याचा सीबीआयचा आरोप आहे. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, या चिनी नागरिकांना भारतात येऊन काही वीज प्रकल्पासाठी काम करायचे होते. 2010 ते 2014 दरम्यान हा प्रकार घडल्याचा आरोप आहे. प्राथमिक तपासानंतर सीबीआयने या प्रकरणी एफआयआर नोंदवला होता.

कार्ती चिदंबरम यांच्यावर अतिरिक्त चीनी कामगारांना बेकायदेशीरपणे व्हिसा मिळवून देण्यासाठी मदत केल्याचा आरोप आहे. हे लोक पंजाबमधील मानसा येथील थर्मल पॉवर प्लांटमध्ये (तलवंडी साबो पॉवर प्लांट) काम करण्यासाठी आले होते. चीनी कंपनी शेंडोंग इलेक्ट्रिक पॉवर कन्स्ट्रक्शन कॉर्प (सेपको) त्याचे काम पाहत होती.

मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकल्प नियोजित वेळेपेक्षा दिरंगाईने सुरू होता. कारवाई टाळण्यासाठी, तलवंडी साबो पॉवर लिमिटेडला अतिरिक्त चीनी कामगार आणायचे होते. मात्र व्हिसा सील झाल्यामुळे हे कर्मचारी येऊ शकले नाहीत.

महिनाभरात व्हिसा

त्यानंतर कंपनीने कार्ती यांच्याशी बातचित केली आणि त्यांनी कथितरित्या मागील दाराने प्रवेश करण्याची पद्धत सांगितली. कार्ती यांच्या सांगण्यावरून तत्कालीन गृह मंत्रालयाने अर्ज केल्यानंतर महिनाभरात व्हिसा मिळाला होता. त्यासाठी बनावट पावत्यांद्वारे कार्ती यांना कोट्यवधी रुपये देण्यात आल्याचा आरोप आहे.

आयएनएक्स मीडिया प्रकरणाच्या तपासादरम्यान सीबीआयला याची माहिती मिळाली. कार्ती यांचे नाव INX मीडिया प्रकरणातही असून त्याचा तपास सुरू आहे. फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड (FIPB) च्या मंजुरीबाबत ही चौकशी सुरू आहे. तपासादरम्यान सीबीआयला 50 लाखांच्या व्यवहाराची माहिती मिळाली. चिनी कर्मचाऱ्यांना व्हिसाच्या बदल्यात बेकायदेशीरपणे मिळालेले हेच पैसे होते, असा आरोप आहे.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.