Congress Manifesto: स्त्रियांना सरकारी नोकरीत 40 टक्के आरक्षण देणार; प्रियंका गांधींकडून यूपीचा ‘अजेंडा’ जाहीर
आगामी वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने निवडणूक जाहीरनामा जाहीर केला आहे.
लखनऊ: आगामी वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने निवडणूक जाहीरनामा जाहीर केला आहे. या जाहीरनाम्यातून यूपीत सत्तेवर आल्यास महिलांना नोकरीमध्ये 40 टक्के आरक्षण देण्यात येणार असल्याचं जाहीर केलं आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी हा जाहीरनामा आज जाहीर केला.
आम्ही आज निवडणूक जाहीरनामा घोषित केला आहे. हा जाहीरनामा केवळ स्त्रियांचा जाहीरनामा ठरणार नाही. तर या घोषणापत्रामुळे सत्ता आणि प्रशासनातील महिलांच्या भागीदारीला इतर पक्षही गंभीरपणे घेतील ही अपेक्षा आहे, असं प्रियंका गांधी म्हणाल्या.
काँग्रेसने पहिली महिला पंतप्रधान दिली
शक्ती, संकल्प, करुणा, दया आणि साहस हे महिलांचे गुण असतात. हेच गुण राजकारणातही यावेत ही आमची इच्छा आहे. आज केवळ महिलांबाबतची चर्चा केवळ कागदावरच असते. मात्र, काँग्रेसने महिलांना पंचायततीत 33 टक्के आरक्षण देऊन महिलांच्या सक्षमीकरणास सुरुवात केली होती. जेव्हा सत्तेत महिलांचा सहभागच नव्हता. त्याकाळात काँग्रेसने देशाला पहिली महिला पंतप्रधान दिली, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.
तर राजकारणाचा चेहरा बदलेल
या निवडणूक अजेंड्यातून महिला सक्षमीकरणाला मदत मिळेल. बेटी बचाओ, बेटी पढाओचा 60 टक्के खर्च जाहिरातीवर खर्च करण्यात आला. देशातील 60 टक्के महिला राजकारणात आल्या तर राजकारणाचा चेहरामोहरा बदलून जाईल, असंही त्या म्हणाल्या.
जाहीरनाम्यात आणखी काय?
>> महिलांनी सुरू केलेल्या उद्योगातील कर्जात सवलत >> आशा कार्यकर्त्यांना 10 हजार रुपये मानधन देणार >> 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांना स्मार्टफोन देणार >> पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनींना स्कुटी देणार >> महिलांद्वारे संचलित संध्या विद्यालये सुरू करणार >> विद्यार्थ्यांना बसमध्ये मोफत प्रवास देणार >> महिलांना तीन गॅस सिलिंडर मोफत देणार >> नुकत्याच जन्मलेल्या मुलीसाठी एफडी >> कौटुंबीक हिंसाचार आणि मद्यसेवनापासून वाचण्यासाठी मदत करणार >> पोलीस दलात 25 टक्के महिलांची भरती करणार >> महिला सुरक्षेसाठी आयोग स्थापन करणार >> 10 लाखापर्यंत मोफत उपचार देणार >> महिलांसाठी महिलांनी चालवलेला खास पीएचसी डेस्क तयार करणार
LIVE: Release of ‘Women’s Manifesto’ in Lucknow.
उत्तरप्रदेश कांग्रेस का महिला घोषणा पत्र (शक्ति विधान)
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) December 8, 2021
संबंधित बातम्या:
Video: इम्पिरिकल डेटा गोळा करणं हे राज्य सरकारचंच काम: प्रीतम मुंडे
Covishield: केंद्राकडून नवी ऑर्डर नाही, सीरम लसीचं उत्पादन 50 टक्के घटवणार