‘ही’ निवडणूक दोघा भावांमध्ये होणार; भांडण नाही मत मांडणार…

काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक ही अंतर्गत आहे, त्यामुळे एका घरातील दोन भावांची ज्या प्रमाणे ही लढत आहे, तशीच होणार आहे.

'ही' निवडणूक दोघा भावांमध्ये होणार; भांडण नाही मत मांडणार...
Follow us
| Updated on: Oct 09, 2022 | 6:53 PM

नवी दिल्लीः काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी (Congress President Election 2022) काही दिवसच उरलेले आहेत, त्यामुळे आता निवडणुकीसाठी उभा राहिलेल्या उमेदवारांनी आपापली जोरदार तयारी केली आहे. काँग्रेसचे दोन ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) आणि शशी थरूर (Shashi Tharoor) यांच्यामध्ये लढत होत आहे. काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीविषयी बोलताना मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, पक्षाच्या अध्यक्षपदासाठी शशी थरूर यांच्याशी लढत असली तरी ती पक्षासाठी आहे. आणि ही लढत असताना आपले विचार मांडणे गरजेचे आहे असंही ते म्हणाले.

मल्लिकार्जुन खरगे यांनी येथील काँग्रेस कार्यालयामध्ये पक्षाच्या प्रतिनिधींबरोबर संवाद साधताना त्यांनी सांगितले की, काँग्रेससाठी मी पक्षातील नेत्यांचा पाठिंबा मागितला आहे. त्यामुळे वाद वगैरे आमच्यामध्ये नसल्याचेही त्यांनी सांगितले.

काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक ही अंतर्गत आहे, त्यामुळे एका घरातील दोन भावांची ज्या प्रमाणे ही लढत आहे, तशीच होणार आहे.

आम्ही भांडत नाही तर मांडणी करत आहोत असंही त्यांनी यावेळी बोलताना आपले मत मांडले. या निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही एकमेकांना पटवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

कांग्रेस अध्यक्ष पदासाठी मी निवडणूक लढवत आहे ते एकाच कारणासाठी ते म्हणजे मी पक्षासाठी काय करु शकतो. त्यामुळे पक्षाध्यक्ष झाल्यानंतर मी देशासाठी आणि पक्षासाठी आपण एकत्रित काय करणार यासाठी आपण निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे सांगितले.

याबरोबर मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, आज देशात एक वेगळ्या प्रकारचे वातावरण निर्माण झाल्याने ते वातावरण बिघडत आहे.

त्यामुळे देशातील शांतता आणि एकता बळकट करण्याची जबाबदारी असल्याचे म्हटले आहे. या सगळ्यासाठी भारत जोडो यात्रा काढण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अध्यक्षपदी निवड झाल्यास पक्षाचा उदयपूर जाहीरनामा राबवणार असल्याचे सांगत, काँग्रेसला जर बळकट आणि मजबूत बनवायचे असेल तर आगामी काळात राहुल गांधींशिवाय पर्याय नसल्याचेही त्यांनी सांगितले.

मल्लिकार्जुन खर्गे यांनी राहुल गांधींविषयी बोलताना म्हणाले की, आपण सोनिया गांधींना भेटून विनंती केली आहे की, जर काँग्रेसला मजबूत करायचे असेल, पक्षाला शक्तीशाली बनवायचे असेल तर राहुल गांधींशिवाय पर्याय नाही.

कारण संसदेपासून ते अगदी रस्त्यावरची लढई लढण्यापर्यंत राहुल गांधी यांच्यासारखा लढवू नेत्याची आपल्याला गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

सध्या राहुल गांधींनी ज्या प्रकारे भारत जोडो यात्रा सुरु केली आहे, त्यातून जनता एकत्र येत आहे. त्यामुळे देशातील काँग्रेसची ही विचारसरणी तोडण्यासाठी नाही तर जोडण्यासाठी असल्याचेही त्यांनी सांगितले.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.