Rajya Sabha Election 2022: 18 साल की तपस्या कम पड़ गई इमरान भाई के आगे; राज्यसभेचं तिकीट नाकारल्याने नगमांसह काँग्रेस नेत्यांची खदखद

Rajya Sabha Election 2022: 5 राज्यांतील 57 राज्यसभा जागांसाठी 10 जून रोजी निवडणुका होणार आहेत. उत्तर प्रदेशातील 11 सदस्यांचा कार्यकाळ संपला आहे. तर महाराष्ट्र आणि तमिलनाडूतील प्रत्येकी सहा सदस्यही निवृत्त होत आहेत.

Rajya Sabha Election 2022: 18 साल की तपस्या कम पड़ गई इमरान भाई के आगे; राज्यसभेचं तिकीट नाकारल्याने नगमांसह काँग्रेस नेत्यांची खदखद
राज्यसभेचं तिकीट नाकारल्याने नगमांसह काँग्रेस नेत्यांची खदखदImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 30, 2022 | 9:03 AM

नवी दिल्ली: काँग्रेसने काल राज्यसभेच्या उमेदवारांची (Rajya Sabha Election 2022) नावं जाहीर केली. यात अनेक ज्येष्ठ नेत्यांचा पत्ता कापण्यात आला आहे. यात काँग्रेसचे (congress) ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचाही समावेश आहे. काही ज्येष्ठ नेत्यांना संधी देण्यात आली आहे. तसेच काही नेत्यांना इतर राज्यांतून संधी देण्यात आली आहे. या शिवाय तरुणांनाही संधी देण्यात आली आहे. काँग्रेसने ज्येष्ठ नेते मुकूल वासनिक, पी चिदंबरम, राजीव शुक्ला, रंजीत रंजन, अजय माकन, जयराम रमेश, विवेक तन्खा, इमरान प्रतापगढी, रणदीप सुरजेवाला आणि प्रमोद तिवारी यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, काँग्रेसने राज्यसभेसाठी नेत्यांची नावं जाहीर करताच काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी मनातील खदखद व्यक्त केली आहे. स्वत: काँग्रेस नेत्या आणि अभिनेत्री नगमा (nagma) आणि काँग्रेस नेते पवन खेरा यांनी ट्विट करून मनातील सल बोलून दाखवली आहे. त्यामुळे काँग्रेस हायकमांड या नाराज नेत्यांची कशी समजूत काढणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हे सुद्धा वाचा

काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनी ट्विट करून आपली नाराजी व्यक्त केली. आपल्या तपस्येत काही तरी कसूर राहिली असावी, असं खेरा यांनी म्हटलं आहे. खेरा यांचं हे ट्विट रिट्विट करत नगमा यांनीही मनातील वेदना बोलून दाखवली आहे. ‘हमारी भी 18 साल की तपस्या कम पड़ गई इमरान भाई के आगे.’ असं नगमा यांनी म्हटलं आहे.

या नेत्यांचा कार्यकाळ संपला

राज्यसभेसाठी काँग्रेसच्या सात सदस्यांचा कार्यकाळ संपला होता. यात पी. चिंदबरम, जयराम रमेश, अंबिका सोनी, विवेक तन्खा, प्रदीप टम्टा, कपिल सिब्बल, छाया वर्मा आदींचा समावेश होता. या 16 सदस्यांपैकी 6 जण उत्तर प्रदेशातील आहेत. तर इतरजण कर्नाटक, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, बिहार, राजस्थान, उत्तराखंड आणि हरयाणातील आहेत.

भाजपकडून 18 उमेदवारांची यादी जाहीर

भाजपने राज्यसभा निवडणुकीसाठी रविवारी 9 राज्यातील 18 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, अनिल बोंडे, निर्मला सीतारामन आदींचा समावेश आहे. यात सर्वाधिक उमेदवार उत्तर प्रदेशातून आहेत.

10 जून रोजी मतदान

दरम्यान, 15 राज्यांतील 57 राज्यसभा जागांसाठी 10 जून रोजी निवडणुका होणार आहेत. उत्तर प्रदेशातील 11 सदस्यांचा कार्यकाळ संपला आहे. तर महाराष्ट्र आणि तमिलनाडूतील प्रत्येकी सहा सदस्यही निवृत्त होत आहेत. ज्या सदस्यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यापैकी पाचजण बिहारमधून, चार-चार आंध्र प्रदेश, राजस्थान आणि कर्नाटकातील आहेत. तीन-तीन सदस्य मध्य प्रदेश आणि ओड़िशातील आहेत. तसेच तेलंगाना, छत्तीसगढ़, पंजाब, झारखंड आणि हरियाणाातील दोन सदस्यांचा आणि उत्तराखंडातील एका सदस्याचा यात समावेश आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.