नड्डा, संबित पात्रा, स्मृती ईराणींवर एफआयआर दाखल करा; काँग्रेसची दिल्लीच्या पोलीस आयुक्तांकडे मागणी

टूलकिट प्रकरणी भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार वाद रंगला आहे. या प्रकरणी भाजपने सोशल मीडियावरून काँग्रेसविरोधात खोटी माहिती पसरवली आहे. (Congress to file FIR against Nadda, smriti irani over ‘toolkit’ allegation)

नड्डा, संबित पात्रा, स्मृती ईराणींवर एफआयआर दाखल करा; काँग्रेसची दिल्लीच्या पोलीस आयुक्तांकडे मागणी
jp nadda
Follow us
| Updated on: May 18, 2021 | 6:52 PM

नवी दिल्ली: टूलकिट प्रकरणी भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार वाद रंगला आहे. या प्रकरणी भाजपने सोशल मीडियावरून काँग्रेसविरोधात खोटी माहिती पसरवली आहे. काँग्रेसची बदनामी करून भाजपने देशात अशांतता निर्माण करण्याचं काम केलं आहे. त्यामुळे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, भाजप नेत्या स्मृती ईराणी, संबित पात्रा आणि बी. एल. संतोष यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेसने दिल्लीच्या पोलीस आयुक्तांना तशी चिठ्ठीच लिहिली आहे. (Congress to file FIR against Nadda, smriti irani over ‘toolkit’ allegation)

काँग्रेसने दिल्लीच्या पोलीस आयुक्तांना एक चिठ्ठी लिहिली आहे. त्यात जेपी नड्डा, संबित पात्रा, स्मृती ईराणी, बीएल संतोष यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. या लोकांनी देशात अशांतता निर्माण करण्याचा आणि जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी सोशल मीडियातून चुकीची आणि खोटी माहिती पसरवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे, असं काँग्रेसने या चिठ्ठीत म्हटलं आहे.

बनावट लेटरहेड

संबित पात्रा आणि बीएल संतोष यांनी नड्डा यांच्या सांगण्यावरून खोटे दस्ताऐवज तयार केले आहेत. एवढंच नव्हे तर यासाठी त्यांनी एआयसीसी रिसर्च डिपार्टमेंटचे लेटरहेडही तयार केले आहे, असा दावाही काँग्रेसने केला आहे.

मोदींना बदनाम करण्याचं षडयंत्र

दरम्यान, संकटाच्या काळात टूलकिटच्या माध्यमातून काँग्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यावर काँग्रेस रिसर्च डिपार्टमेंटचे प्रमुख राजीव गौडा यांनी खुलासा केला आहे. एआयसीसी रिसर्च डिपार्टमेंटच्या नावाने भाजप खोटे टूलकिट दस्ताऐवज प्रसारित करत आहे. आम्ही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि प्रवक्ते संबित पात्रा यांच्या विरोधात एफआयआर दाखल करणार आहोत, असं गौडा यांनी सांगितलं.

राहुल गांधींची टीका

केंद्रातील मोदी सरकारने कोरोना महामारी रोखण्यासाठी रणनीती तयार केली आहे. त्यावर राहुल गांधी यांनी सातत्याने प्रश्नचिन्हं उपस्थित केले आहेत. या पूर्वीही त्यांनी पीएम केअर्स फंड आणि पीएम मोदी खोटारडे असून काम करण्यात अपयशी ठरल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर त्यांनी आता पुन्हा एकदा ट्विट करून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. येणाऱ्या काळात लहान मुलांना सुरक्षित ठेवण्याची आवश्यकता असेल. अशावेळी पेडियाट्रिक सर्व्हिसेस आणि व्हॅक्सिन ट्रिटमेंट प्रोटोकॉल आधीच तयार करावा लागेल. मोदी सिस्टिमला झोपेतून उठावं लागणार आहे. ही भविष्यातील गरज आहे, असं राहुल म्हणाले. (Congress to file FIR against Nadda, smriti irani over ‘toolkit’ allegation)

संबंधित बातम्या:

येणाऱ्या काळात लहान मुलांना कोरोनाचा धोका, मोदी सिस्टिमला झोपेतून जागं व्हावं लागेल: राहुल गांधी

मोदीजी, आमच्या मुलांची व्हॅक्सिन परदेशात का पाठवली?, राहुल गांधी म्हणाले, मलाही अटक करा!

सराईत गुन्हेगाराच्या अंत्यविधीला मोठी बाईक रॅली, कोरोना काळात पुण्यातील धक्कादायक प्रकार

(Congress to file FIR against Nadda, smriti irani over ‘toolkit’ allegation)

Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....