Kisan Andolan News: कृषी कायदे रद्द, काँग्रसेचा उद्या जल्लोष, देशभर रॅली, कँडलमार्च काढण्याचे कार्यकर्त्यांना फर्मान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेसने उद्या 20 नोव्हेंबर रोजी देशभर जल्लोष करण्याचा निर्णय घेतला आहे.

Kisan Andolan News: कृषी कायदे रद्द, काँग्रसेचा उद्या जल्लोष, देशभर रॅली, कँडलमार्च काढण्याचे कार्यकर्त्यांना फर्मान
Kisan Vijay Diwas
Follow us
| Updated on: Nov 19, 2021 | 6:35 PM

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेसने उद्या 20 नोव्हेंबर रोजी देशभर जल्लोष करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात उद्या किसान विजय दिवस साजरा करतानाच संपूर्ण देशभर किसान विजय रॅली काढण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत.

काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनी देशभरातील काँग्रेसच्या सर्व ब्लॉक प्रमुखांना पत्रं लिहिलं आहेत. त्यात त्यांनी शेतकऱ्यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्याचे आदेश दिले आहेत. संपूर्ण देशात विजय दिवस साजरा करा. रॅली काढा. तसेच देशाच्या विविध भागात संध्याकाळी कँडल मार्च काढून या संघर्षात बलिदान देणाऱ्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करा, असं आवाहन काँग्रेसने केलं आहे.

काँग्रेसची जोरदार तयारी

शेतकऱ्यांनी कृषी कायद्याविरोधात संघर्ष उभा केला. त्याला काँग्रेससह विरोधी पक्षाने बळ दिलं. त्यामुळे सरकारला झुकावं लागलं असा काँग्रेसचा दावा आहे. पुढील वर्षी पंजाब, गोवा, उत्तर प्रदेशात निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर जनमत आपल्या बाजूने वळवण्यासाठी काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने उद्या देशभर जल्लोष करण्याचा निर्णय घेतला आहे.

असा असेल कार्यक्रम

>> उद्या देशभरात किसान विजय दिवस साजरा होणार >> त्यानिमित्त उद्या देशभरात प्रत्येक जिल्ह्यात रॅलीचं आयोजन केलं जाणार >> प्रत्येक जिल्ह्यात विजयी सभांचं आयोजन केलं जाणार >> मृत शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी देशभरात संध्याकाळी कँडल मार्च काढला जाणार >> ज्या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबीयांची काँग्रेस नेते घरी जाऊन भेट घेणार

प्रियंका गांधींची मागणी

दरम्यान, मोदींनी कायदे मागे घेतल्यानंतर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. शेतकरी शहीद झाले. त्यांच्या कुटुंबीयांना मी भेटले. त्यांचं दु:ख मी समजू शकते. सरकार गंभीर आहे तर त्यांनी लखीमपूर खेरीबाबत योग्य कार्यवाही करावी. केंद्रीय मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी. या देशात शेतकऱ्यांसोबत सर्वांनी उभं राहिलं पाहिजे. त्यांच्या अनेक समस्या आहेत. ते कर्जात बुडाले आहेत. काही शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतकरी ज्या गोष्टी आंदोलन करत आहेत. त्याची दखल घ्यावी. ते प्रश्न सोडावावेत, अशी मागणीही प्रियंका गांधी यांनी केली आहे.

शेतकऱ्यांना आंदोलनजीवी, गुंडे, देशद्रोही आणि दहशतवादी कोण म्हणालं होतं? तुमचेच नेते हे बोलत होते ना? त्यावेळी तुम्ही काय करत होता. तेव्हा मोदी गप्प का होते? मोदींनीच शेतकऱ्यांना आंदोलनजीवी म्हणून हिणवलं होतं, असंही त्यांनी निदर्शनास आणून दिलं.

संबंधित बातम्या:

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.