काँग्रेस वर्किंग कमिटीची घोषणा, काँग्रेसच्या या वरिष्ठ नेत्यांचा समावेश
काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी मल्लीकार्जुन खर्गे यांच्या विरोधात अध्यक्षपदाची निवडणूक लढली होती. यात खर्गे यांचा विजय झाला होता.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक २०२४ च्या आधी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मल्लीकार्जुन खर्गे यांनी काँग्रेस वर्किंग कमिटीची घोषणा केली. काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये पहिल्यांदा सचिन पायलट, शशी थरूर, आनंद शर्मा, अशोक चव्हाण आणि चरणजित सिंह चन्नी हे सहभागी झालेत. अध्यक्ष झाल्यानंतर दहा महिन्यांनी खर्गे यांनी सीव्हीसीची स्थापना केली. काँग्रेसच्या वर्किंग कमिटीमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह ३९ नेत्यांचा समावेश आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये सचिन पायलट, शशी थरूर, आनंद शर्मा, अशोक चव्हाण आणि चरणजित सिंह चन्नी यांचा समावेश करण्यात आलाय.
प्रियंका गांधी वाड्रा, ए. के. अँटनी, मीरा कुमार, दिग्वीजय सिंह, पी. चिदंबरम आणि काही वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे. काँग्रेस कार्यसमितीमध्ये ३२ स्थायी आमंत्रित सदस्य तर ९ विशेष आमंत्रित सदस्य सहभागी आहेत.
शशी थरूर यांनी लढली होती अध्यक्षपदाची निवडणूक
काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी मल्लीकार्जुन खर्गे यांच्या विरोधात अध्यक्षपदाची निवडणूक लढली होती. यात खर्गे यांचा विजय झाला होता. तरीही खर्गे यांनी आपल्या टीममध्ये शशी थरूर यांची निवड केली. सीव्हीसी लिस्टमध्ये महत्त्वाच्या नेत्यांमध्ये सोनिया गांधी, मनमोहन सिंह, राहुल गांधी, अधीर रंजन चौधरी, ए. के. अँटनी, अंबिका सोनी, मीरा कुमार, दिग्वीजग सिंह आणि पी. चिदंबरम यांचा समावेश आहे.
दहा महिन्यानंतर तयार केली समिती
काँग्रेसचे चारही महत्त्वाचे संघटन युवक काँग्रेस, नॅशनल स्टुडन्ट युनियन ऑफ इंडिया, महिला काँग्रेस आणि सेवा दल या चारही महत्त्वाच्या संघटनांचे प्रमुख वर्किंग कमिटीचे सदस्य असतील. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लीकार्जुन खर्गे यांनी मागील ऑक्टोबर महिन्यात पदभार सांभाळला. त्यानंतर दहा महिन्यांनी त्यांनी काँग्रेस वर्किंग कमिटीची स्थापना केली.
येत्या काही काळात विधानसभा निवडणुका होणार आहेत. शिवाय पुढच्या वर्षी लोकसभा निवडणुका होतील. यासाठी भाजपने आधीच तयारी सुरू केली आहे. काँग्रेसही यात मागे नाही, हे यातून दाखवून देण्यात आले.