2 महिला, 16 पुरुष ‘त्या’ कटात सामील होत्या, हिंदूना मुस्लिम बनवण्याचे रॅकेट, पोलिसांनी केला पर्दाफाश

चिरकीहित गावात हिंदूंना आमिष दाखवून त्यांना मुस्लिम बनवण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी पोहोचला. यावेळी तेथे जनरेटर चालवून ढोल, हार्मोनियम वाजवून कव्वाली गायली जात होती.

2 महिला, 16 पुरुष 'त्या' कटात सामील होत्या, हिंदूना मुस्लिम बनवण्याचे रॅकेट, पोलिसांनी केला पर्दाफाश
UP CRIME NEWSImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: May 26, 2023 | 3:41 PM

उत्तर प्रदेश : आझमगडमध्ये पोलिसांनी एका धार्मिक कार्यक्रमावर छापा टाकला. येथे अनेक आक्षेपार्ह साहित्य सापडले. यावेळी कव्वाली आणि धर्मांतर रॅकेटचा मास्टर माइंडसह 18 लोक उपस्थित होते. यामध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. या सर्वांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर अनेक कलमान्वये गुन्हा दाखल करून सर्वांची रवानगी तुरुंगात केली. हे प्रकरण देवगाव पोलीस ठाण्यांतर्गत चिरकीहित गावातील आहे. 24 मेच्या रात्री आझमगडमध्ये हिंदूंना मुस्लिम बनवण्याचा हा प्रकार सुरू असतानाच पोलिसांनी छापा टाकून या रॅकेटचा पर्दाफाश केला.

चिरकीहित गावात हिंदूंना आमिष दाखवून त्यांना मुस्लिम बनवण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी पोहोचला. यावेळी तेथे जनरेटर चालवून ढोल, हार्मोनियम वाजवून कव्वाली गायली जात होती. यासोबतच मुस्लिम धर्माच्या स्तुतीची बालगीते म्हटली जात होती.

हे सुद्धा वाचा

साध्या वेशातील पोलीस घटनास्थळी

गुप्तचरांकडून धर्मांतर होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. साध्या वेशातील काही पोलिसांना पाठवून त्याची माहिती काढण्यात आली. यानंतर पोलीस ठाण्यातून मोठा फौजफाटा पाठवून 18 जणांना अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीतून हे लोक चिरकीहित गावातील अवधेश पासी यांच्या घरी धर्मांतराच्या उद्देशाने जमले होते, असे स्पष्ट झाले.

मुस्लिम धर्माचे गुणगान करतात, हिंदू धर्माला…

येथे मजारवर त्रिशूल, फुलांच्या माळा आणि हिरवे कापड बांधून कव्वाली गाताना सर्व लोक तकरीरचे पठण करत होते. मुस्लिम धर्माचे गुणगान केले जात होते. त्याचवेळी हिंदू धर्मातील श्रद्धा ढोंगी आणि खोटी असल्याचे वर्णन केले जात होते.

7 त्रिशूल, ढोल, साउंड मिक्सर, हार्मोनियम आणि बरंच काही

धर्मांतर करण्यात येणाऱ्या ठिकाणी पोहोचलेल्या पोलिसांनी मोठ्या प्रमाणात माल जप्त केला. यामध्ये 7 त्रिशूळ, दोन फोटो, दोन ड्रम, दोन साउंड मिक्सर, एक हार्मोनियम, गॅस सिलिंडर, गॅस स्टोव्ह, एक जनरेटर, एक टेम्पो, एक बुलेट आणि एक अर्टिगा यांचा समावेश आहे.

दोन महिलांसह 18 जणांना अटक

पोलिसांनी घटनास्थळावरून हसीना, उषा देवी या दोन महिलांसह अवधेश, पन्नालाल, फरीद मोहम्मद, मोहम्मद शाबरोज, रमजान, रशाद, शहाबुद्दीन, सिकंदर, मोहम्मद जावेद, कुंदन, परवेझ, इरफान, साबीर अली, आकाश, सरोज आणि जावेद अहमद यांना अटक केली आहे.

म्होरक्या सिकंदर मैनपुरीचा रहिवासी

या टोळीचा म्होरक्या सिकंदर हा मैनपुरीचा रहिवासी आहे. त्याला अटकही करण्यात आली आहे. अवधेश पासी याच्या घरी समाधीसारखी जागा तयार करून कव्वाली गात होते. यासोबतच इतर प्रलोभने देऊन रोग बरे करून लोकांचे धर्मांतर करण्याची या टोळक्याची योजना होती. अटक केल्यानतर आरोपींनी आम्हाला हिंदूंना मुस्लिम धर्मांतर करण्यासाठी पैसे मिळतात. आजही आम्ही धर्म बदलण्यासाठी येथे जमलो होतो.

चौकशीसाठी विशेष पथकाची स्थापना

अवधेशने पासी हा चार ते पाच वर्षांपासून बाराबंकी देवा शरीफला जात होता. तिथे त्याची भेट सिकंदरशी झाली. सिकंदर हा देवा शरीफमध्ये भूतबाधा काढण्याचे काम करायचा. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी एक विशेष पथक तयार केले आहे.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.