Corona : कोरोनामुळे 5 वर्षांच्या मुलीचा मृत्यू! माईल्ड लक्षणं असूनही मृत्यू झाल्यानं खळबळ

Corona in kids : कोरोनाची हलकी लक्षणं (Corona Mild Symptoms) या मुलीमध्ये दिसून आली होती.

Corona : कोरोनामुळे 5 वर्षांच्या मुलीचा मृत्यू! माईल्ड लक्षणं असूनही मृत्यू झाल्यानं खळबळ
राज्यात आज 121 नव्या रुग्णांची नोंदImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 22, 2022 | 8:54 AM

कोरोनामुळे एका पाच वर्षांच्या मुलीचा मृत्यू (5 year old girl died)  झाला. गुजरातच्या जामनगरमधून (Gujrat Corona) ही घटना समोर आली आहे. या घटनेमुळे लहानग्यांमधील कोरोनाचे परिणाम किती गंभीर असू शकतात, हा प्रश्न उपस्थित झालाय. कोरोनाची हलकी लक्षणं (Corona Mild Symptoms) या मुलीमध्ये दिसून आली होती. त्यानंतर मुलीची तब्बेत अधिकच खालावत गेली. जामनगरच्या गुरु गोविंद रुग्णालयात या मुलीवर उपचार सुरु होता. मात्र उपचारादरम्यान पाच वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. तब्बल 100 दिवसांनंतर कोरोनामुळे बळी गेल्याची नोंद गुजरामध्ये करण्यात आली. दरम्यान, मुलीच्या मृत्यूनंतर या मुलीच्या वडिलांना विलगीकरणात ठेवण्यात आलंय. या मुलीच्या वडिलांना होम आयसोलेट करण्यात आलं. XE वेरीएंट या मुलीमध्ये होता का, यासाठी आता या सॅपल्सही तपासणीसाठी पाठवण्यात आलेत. गांधीनगरच्या लॅबमध्ये या सँपलची तपासणी केली जाईल.

गुजरामध्ये गेल्या 24 तासांत 19 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असल्याचं वृत्त आजतकनं दिलं. दिल्ली एनसीआर, हरियाणा, यूपी या राज्यांमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णवाढ होत असल्याचं चिंता व्यक्त होतेय. अल्प प्रमाणात सुरु झालेली रुग्णवाढ कोरोनाच्या चौथ्या लाटेची नांदी तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

गुजराततेत XE वेरीएंट…

गुरजामध्ये XE वेरीएंटचा एक रुग्ण आधीच आढळून आला होता. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात एक कोरोना रुग्ण आढळून आला होता. या रुग्णामध्ये XE वेरीएंटची लागण झाली असल्याचं एका महिन्यानंतर समोर आलं होतं. कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या रुग्णावर उपचार करण्यात आले. त्यानंतर हा रुग्ण बराही झाला. त्यानंतर महिन्याभरानं या रुग्णाचा रिपोर्ट आला होता. त्या रिपोर्टमध्ये या रुग्णाला XE वेरीएंटची लागण झाली असल्याचं समोर आलं होतं. XE वेरीएंट हा गुजरात आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यात आढळून आला होता.

कोरोनाच्या चौथ्या लाटेची भीती…

दरम्यान, आता सुरु असलेल्या कोरोना रुग्णवाढीच्या पुन्हा सगळे धास्तावले आहे. कोरोनाची चौथी लाट येणार का, असा सवाल उपस्थित केला जातो आहे. दरम्यान IIT कानपूरनं केलेल्या रिपोर्टनुसार 22 जून 2022 मध्ये कोरोनाच्या चौथ्या लाटेला सुरुवा होईल, अशी शक्यता वर्तवली जाते आहे.

प्रिप्रिंट रिपोझिटरी MedRxiv वर शेअर करण्यात आलेल्या आढाव्यानुसार संख्यांचा अभ्यास करुन कोरोनाची चौथी लाट आली तर ती चार महिने राहिल, अशीही शक्यता वर्तवली गेली आहे. आयआयटी कानपूरनं दिलेल्या अहवालानुसार 22 जून रोजी कोरोनाची चौथी लाट सुरु होईल. 23 ऑगस्टपर्यंत ही लाट राहिल आणि 24 ऑक्टोबरला संपले, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आजतकनं याबाबतचं वृत्त दिलंय.

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना रुग्णसंख्येबाबत काय म्हटलं? : पाहा व्हिडीओ

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.