महाराष्ट्रात कोरोना वाढवतोय चिंता, गेल्या 24 तासात इतक्या रुग्णांची वाढ
Corona Update : देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढतच चालले आहे. गेल्या २४ तासात देखील रुग्णांची संख्या वाढली आहे. महाराष्ट्रात देखील नव्या व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. देशात अनेक राज्यात कोरोनाचा जेएन१ व्हेरिएंट दाखल झाला आहे. त्यामुळे मृत्यूंची संख्या देखील वाढत असल्याचं बोललं जात आहे.

Corona Update : देशात कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. दररोज यात भर पडत आहे. आरोग्य मंत्रालयाने सोमवारी माहिती दिली की, भारतात कोविडचे 605 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 4,002 वर पोहोचली आहे. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत संसर्गामुळे चार लोकांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये केरळमधील दोन, कर्नाटक आणि त्रिपुरामधील एकाचा रुग्णाचा समावेश आहे.
महाराष्ट्रात वाढताय रुग्ण
कर्नाटकपाठोपाठ महाराष्ट्रातही रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या चिंता वाढल्य़ा आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात १३९ रुग्ण आढळले आहेत.
कोरोनाचे कुठे किती रुग्ण
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 7 जानेवारीपासून जेएन.1 उप-प्रकारचे एकूण 682 नवीन रुग्ण आढळले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकात 199, केरळमध्ये 148, महाराष्ट्रात 139, गोव्यात 47, गुजरातमध्ये 36, आंध्र प्रदेशात 30, राजस्थानमध्ये 30, तामिळनाडूत 26, दिल्लीत 21, ओडिशात तीन, तेलंगणात एक आणि हरियाणात एक प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. देशात JN.1 चा व्हेरिएंट आढळला आहे. असं असलं तरी लोकं लोक होम क्वारंटाईनमध्ये बरे होत आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने राज्यांना श्वसनाच्या गंभीर आजाराच्या जिल्हावार प्रकरणांवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. जेणेकरून वाढत्या प्रकरणांचा कल लवकर ओळखता येईल.
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची चिंता
अनेक रुग्ण घरीच बरे होत आहेत. JN.1 उप-प्रकारामुळे मृत्युदरात काही प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. 2020 पासून कोरोनाचा संसर्ग वाढू लागला होता. देशभरात 4.5 कोटींहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यामध्ये जवळपास चार वर्षांत 5.3 लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनावर मात करणाऱ्या लोकांची संख्या 4.4 कोटींहून अधिक आहे. आतापर्यंत देशात कोविड लसींचे 220.67 कोटी डोस देण्यात आले आहेत.
कोविडच्या JN.1 उप-प्रकारामुळे केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना यावर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून वेळोवेळी नवीन मार्गदर्शक तत्त्वेही जारी करण्यात येत आहेत. राज्यांना मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.