सर्वोच्च न्यायालयात गुरुवारपासून फक्त तातडीच्या सुनावण्या, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

गेल्या काही दिवसांत न्यायालयातील बर्‍याच कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. निम्म्याहून अधिक कर्मचारी कोरोनावर उपचार घेत आहेत. (Corona raised tension; Only emergency hearings in the Supreme Court from Thursday)

सर्वोच्च न्यायालयात गुरुवारपासून फक्त तातडीच्या सुनावण्या, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
सर्वोच्च न्यायालय
Follow us
| Updated on: Apr 20, 2021 | 11:02 PM

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा संसर्ग भलत्याच वेगाने वाढू लागला आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी आता सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करण्याची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर विविध राज्यांकडून लॉकडाऊनची घोषणा केली जात असतानाच सर्वोच्च न्यायालयानेही कठोर पाऊल उचलले आहे. सर्वोच्च न्यायालयात येत्या गुरुवारपासून म्हणजेच 22 एप्रिलपासून केवळ तातडीच्या सुनावणी केली जाणार आहे. (Corona raised tension; Only emergency hearings in the Supreme Court from Thursday)

गेल्या काही दिवसात न्यायालयातील बरेच कर्मचारी बाधित

देशभरात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना सर्वोच्च न्यायालयातही कोरोना संसर्गाने टेन्शन वाढवले आहे. गेल्या काही दिवसांत न्यायालयातील बर्‍याच कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. निम्म्याहून अधिक कर्मचारी कोरोनावर उपचार घेत आहेत. हा संसर्ग वेळीच रोखण्याच्या हेतूने न्यायालयाकडून विविध पावले उचलली जात आहेत. त्याच अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाने आता 22 एप्रिलपासून केवळ तातडीची सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात आज परिपत्रक जारी करण्यात आले.

कोरोना नियंत्रणात आल्यानंतर नियमित सुनावणीबाबत निर्णय घेणार

संबंधित वकिल किंवा पक्षकारांना त्यांच्या खटल्यांची तातडीने सुनावणी घ्यायची असेल तर स्वाक्षरी केलेला अर्ज आणि संबंधित कागदपत्रे न्यायालय रजिस्ट्रींकडे पाठवावी लागणार आहे. त्यानुसार न्यायालयाकडून त्यावर तातडीची सुनावणी घ्यायची की नाही, हे ठरवले जाईल. आवश्यकता असेल अशाच प्रकरणांत न्यायालय तातडीची सुनावणी घेणार आहे. कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालय नियमित सुनावणीबाबत निर्णय घेणार असल्याची शक्यता आहे.

उच्च न्यायालये संकटाच्या स्थितीत

सध्या उच्च न्यायालये संकटाच्या स्थितीत आहे, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने आज चिंता व्यक्त केली आहे. उच्च न्यायालयांमधील न्यायाधीशांची बरीच पदे रिक्त आहेत. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने ही टिप्पणी केली. सर्वोच्च न्यायालय कॉलेजियमची मंजुरी मिळाल्यानंतर केंद्र सरकारने न्यायाधीश नियुक्ती प्रक्रियेला गती द्यावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. जर सरकारला कॉलेजियमने शिफारस केलेल्या नावावर आक्षेप असेल तर सरकारने त्यामागील कारणे स्पष्ट करावीत आणि सुधारीत नावे पाठवावीत, असेही न्यायालयाने सूचवले आहेत. सरन्यायाधीश शरद बोबडे, न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती सुर्यकांत यांच्या खंडपीठाने उच्च न्यायालयांतील न्यायाधीशांच्या जवळपास 40 टक्के रिक्त पदांवर ही चिंता व्यक्त केली.

देशभरातील सर्वच उच्च न्यायालयात खटले प्रलंबित

देशभरातील जवळपास सर्वच उच्च न्यायालयांत मोठ्या प्रमाणावर खटले वर्षानुवर्षे रेंगाळले आहेत. या खटल्यांचा वेळीच निपटारा करून नागरिकांना न्याय देण्याची नितांत गरज आहे. याच अनुषंगाने न्यायाधीश नियुक्तीची प्रक्रिया वेळीच पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून वेळेची मर्यादा तसेच इतर मुद्यांवर निर्देश दिले आहेत. (Corona raised tension; Only emergency hearings in the Supreme Court from Thursday)

इतर बातम्या

राज्यात लॉकडाऊन लागणार, बियाणे, खताच्या दुकानाचं काय?; शेतमाल शेतातच पडून राहणार का ?

UPSC Interview Postponed | युपीएससीकडून नागरी सेवा आणि इतर परीक्षांच्या मुलाखती स्थगित, जाणून घ्या सर्व तपशील

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.