Corona Update : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून नवी नियमावली, 30 एप्रिलपर्यंत लागू राहणार

गृह मंत्रालयाने कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. ही नियमावली 1 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंत लागू असणार आहे.

Corona Update : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून नवी नियमावली, 30 एप्रिलपर्यंत लागू राहणार
प्रातिनिधिक छायाचित्रं
Follow us
| Updated on: Mar 23, 2021 | 6:17 PM

नवी दिल्ली : महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशास्थितीत गृह मंत्रालयाने कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. ही नियमावली 1 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंत लागू असणार आहे. सरकारने दिलेल्या निर्देशानुसार केंद्रशासित प्रदेशात आणि राज्यांमध्ये टेस्ट-ट्रॅक-ट्रीट प्रोटोकॉल अमलात आणला जाणार आहे.(New Guidelines issued by the Union Home Ministry against the growing backdrop of corona)

सरकारने घालून दिलेल्या नियमावलीनुसार राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात जिथे आरटीपीसीआर टेस्टची संख्या कमी आहे, तिथे टेस्टची संख्या वाढवण्यात येईल आणि हे प्रमाण 70 टक्क्यांवर नेलं जाणार आहे. तपासणीनंतर पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांवर लवकरात लवकर आणि योग्य वेळी उपचार प्रदान करण्यासाठी आयसोलेट करण्याची आवश्यकता असल्याचं गृह विभागाचं म्हणणं आहे.

सरकारने दिलेल्या निर्देशांनुसार कंटेन्मेंट झोनबाहेर प्रवासी रेल्वेगाड्या, विमान सेवा, मेट्रो रेल्वे सेवा, शाळा, महाविद्यालय, हॉटेल, रेस्टॉरंट्स, शॉपिंग मॉल्स, मल्टिप्लेक्स, एन्टरटेन्मेंट पार्क, योगा सेंटर, एक्सिबिशन आदी कार्यक्रम सुरु राहतील. या कार्यक्रमांमध्ये मात्र घालून दिलेल्या नियमांचं पालन करावं लागणार आहे.

45 वर्षांवरील प्रत्येकाला कोरोनाची लस

येत्या एक एप्रिलपासून 45 वर्ष वयोगटावरील प्रत्येकाला कोरोनाची लस मिळणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात घोषणा केली. 45 वर्षांवरील प्रत्येकाने लसीकरणासाठी नोंदणी करावी, असं आवाहन जावडेकरांनी केलं. आतापर्यंत केवळ सहव्याधी असलेल्या 45 वर्षांवरील व्यक्तींनाच कोरोना लस दिली जात होती.

वयाचे निकष काय?

वयाची 60 वर्षे पूर्ण केलेल्या सर्व व्यक्तींचे सध्या लसीकरण करण्यात येत आहे. 45 ते 59 या वयोगटातील सहव्याधी असलेल्या व्यक्तींचेही तूर्तास लसीकरण सुरु आहे. या दोन्ही वयोगटांतील व्यक्तींचे लसीकरण करण्यासाठी 1 जानेवारी 2022 रोजीचे वय विचारात घेतले जात आहे. यानुसार आज ज्यांचे वय 59 वर्षे 3 महिने किंवा सहव्याधी असणाऱ्या गटातील व्यक्तीचे वय 44 वर्षे 3 महिने असले तरीही त्यांची लसीकरणासाठी नोंदणी करणे व नंतर लसीकरण करणे शक्य आहे.

संबंधित बातम्या :

Corona Virus : पंजाबमध्ये 81 टक्के रुग्णांमध्ये UK व्हेरिएंट!, युवकांनाही लसीकरणाची परवानगी द्या – अमरिंदर सिंग

45 वर्षांवरील प्रत्येकाला कोरोनाची लस, केंद्रीय कॅबिनेटची घोषणा

New Guidelines issued by the Union Home Ministry against the growing backdrop of corona

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.