देशाच्या राजधानीत कोरोनाचा कहर; रुग्णांचा आकडा 1500 पेक्षाही अधिक; मृत्यूचा आकडा वाढला…

दिल्लीत गेल्या 24 तासात 5 हजार 499 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. या दरम्यान 909 कोरोना रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिल्लीत 2 हजार 212 कोरोना रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. तर कोरोनाचे 223 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.

देशाच्या राजधानीत कोरोनाचा कहर; रुग्णांचा आकडा 1500 पेक्षाही अधिक; मृत्यूचा आकडा वाढला...
Follow us
| Updated on: Apr 13, 2023 | 10:37 PM

नवी दिल्ली : देशांवर अनेक संकटं ओढवत असतानाच आता पुन्हा एकदा कोरोनाचे संकट नव्याने उभा राहत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांमधून कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असून मृत्यूचे प्रमाणही वाढल्याने आरोग्य विभागाकडून चिंता व्यक्त केली जात आहे. दिल्लीसह मुंबई, चेन्नई, राजस्थान, तामीळनाडूमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्याने जिल्हा पातळीवर निर्बंध वाढवल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

देशाची राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा कोरोनाने थैमान मांडल्याचे दिसून येत आहे. नवीन प्रकरणं प्रचंड गतिने वाढत असल्याने चिंता व्यक केली जात आहे.

ot

गेल्या 24 तासांमध्ये गुरुवारी दिल्लीत 1 हजार 527 नवीन रुग्णसंख्या आढळली आहे. तर गुरुवारी संध्याकाळी जारी करण्यात आलेल्या दिल्लीच्या आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार, राज्यात कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण 27.77 टक्के असल्याचे सांगण्यात आले.

तसेच गेल्या 24 तासांत दोघांचा मृत्यू झाल्याने आरोग्य विभाग आता अलर्ट मोडवर आला आहे. सध्या दिल्लीत सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 3 हजार 962 वर पोहोचली आहे.

दिल्ली सरकारच्या या आरोग्य विभागाच्या अहवालात पहिल्या रुग्णाच्या मृत्यूचे प्राथमिक कारण हे कोरोनाच असल्याचे सांगण्यात आले आहे. तर दुसऱ्याच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

तर दिल्लीत गेल्या 24 तासात 5 हजार 499 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. या दरम्यान 909 कोरोना रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिल्लीत 2 हजार 212 कोरोना रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. तर कोरोनाचे 223 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.

दिल्लीत मोठ्या प्रमाणात कोरोनाचे पेशंट वाढत असून आरोग्य विभागाकडून योग्य ती काळजी घेत असल्याचेही सांगण्यात आले आहे. तर काही भागात आता निर्बंध वाढवण्याचे संकेत दिले असून मास्क सक्ती करण्याची सूचना देण्यात आली आहे.

वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.