Corona Vaccine : ‘कोरोना लसीची समान किंमत निश्चित करा’, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गाांधीची पंतप्रधान मोदींकडे मागणी
सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे विनंती केली आहे की, लसीकरणाच्या प्रक्रियेत बदल करण्यात यावा, तसंच संपूर्ण देशात लसीची किंमत समान असावी.
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कोरोना लसीकरणाच्या प्रक्रियेबाबत चिंता व्यक्त केलीय. गुरुवारी सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे विनंती केली आहे की, लसीकरणाच्या प्रक्रियेत बदल करण्यात यावा, तसंच संपूर्ण देशात लसीची किंमत समान असावी. केंद्र सरकारने 18 ते 45 वर्षे वयोगटातील लोकांना मोफत लस देण्याची आपली जबाबदारी झटकल्याची टीकाही सोनिया गांधी यांनी केलीय. सोनियांनी तसं एक पत्रच पंतप्रधान मोदींना लिहिलं आहे. (Congress President Sonia Gandhi’s letter to PM Narendra Modi)
गेल्या वर्षीचा कटू अनुभव गाठीशी असताना आणि लोकांना झालेल्या त्रासाची माहिती असतानाही सरकार सातत्याने मनमानी आणि भेदभावपूर्ण नितीने काम करत आहे, याबाबत आश्चर्य वाटतं, असंही सोनियांनी आपल्या पत्रात म्हटलंय. केंद्र सरकारने 18 ते 45 वर्षे वयोगटातील लोकांना मोफत लस देण्याची आपली जबाबदारी झटकली आहे. केंद्राचं हे काम म्हणजे युवकांप्रति असलेल्या आपल्या उत्तरदायित्वापासून पळ काढणं असल्याची टीकाही सोनियांनी केलीय.
The nation’s goal must be to ensure that everyone over 18 years is given the vaccine, regardless of their economic circumstances. I urge you to intervene immediately & reverse the new Covid19 vaccination policy.
– Congress President Smt. Sonia Gandhi writes to PM Modi pic.twitter.com/lXFmbfULdT
— Congress (@INCIndia) April 22, 2021
केंद्र सरकारनं पुनर्विचार करावा
देशातील नागरिकांना लसीकरणासाठी जास्तीची किंमत मोजावी लागेल. राज्य सरकारांवरही त्याचा बोजा पडेल. देश संकटात असताना कोणतंही सरकार लोकांना त्रास देत नफेखोरीसाठी मोकळं रान कसं काय देऊ शकतं? असा सवालंही सोनिया गांधी यांनी आपल्या पत्रातून विचारलाय. कोरोना लसीकरणाच्या प्रक्रियेचा पुनर्विचार केंद्र सरकारनं करायला हवा. संपूर्ण देशात लसीची समान किंमत असावी, अशी मागणी सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मोदींकडे केलीय.
कोविशील्डची किंमत निश्चित
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (SII) भारत सरकारच्या सूचनेनुसार कोविशील्ड (Covishield Vaccine) लशीची नवीन किंमत निश्चित केली आहे. एसआयआयने राज्य सरकारसाठी 400 रुपये आणि खासगी रुग्णालयांसाठी 600 रुपये प्रति डोस दराची घोषणा केली आहे. एसआयआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “येत्या दोन महिन्यांत लस उत्पादनाचा वेग वाढेल. आमच्या एकूण उत्पादन क्षमतेच्या 50 टक्के लस भारत सरकार लसीकरण मोहिमेला आणि उर्वरित 50 टक्के राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांना देण्यात येईल.”
जगातील इतर कोणत्याही लसींच्या किंमतींपेक्षा आमची लस स्वस्त आहे, असे कंपनीने म्हटले आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या म्हणण्यानुसार अमेरिकेच्या लशीची किंमत प्रति डोस 1500 रुपये आहे, रशियन लसची किंमत 750 रुपये आहे आणि चिनी लशीसाठी प्रति डोस 750 रुपये मोजावे लागत आहे. सीरम संस्थेने असेही म्हटले आहे की, येत्या 4-5 महिन्यांनंतर ही लस मेडिकल दुकानांमध्ये उपलब्ध होऊ शकेल.
संबंधित बातम्या :
कोरोनापासून वाचण्यासाठी कोणता मास्क वापराल, WHO ने जारी केलेल्या ‘या’ सूचना नक्की वाचा
Corona Vaccine : डबल म्यूटेंट व्हायरसवरही भारत बायोटेकची Covaxin लस प्रभावी, ICMRकडून स्पष्ट
Congress President Sonia Gandhi’s letter to PM Narendra Modi