Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

45 वर्षांवरील प्रत्येकाला कोरोनाची लस, केंद्रीय कॅबिनेटची घोषणा

येत्या एक एप्रिलपासून 45 वर्ष वयोगटावरील प्रत्येकाला कोरोनाची लस मिळणार आहे (Corona vaccine above 45 years )

45 वर्षांवरील प्रत्येकाला कोरोनाची लस, केंद्रीय कॅबिनेटची घोषणा
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर
Follow us
| Updated on: Mar 23, 2021 | 3:31 PM

नवी दिल्ली : येत्या एक एप्रिलपासून 45 वर्ष वयोगटावरील प्रत्येकाला कोरोनाची लस मिळणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात घोषणा केली. 45 वर्षांवरील प्रत्येकाने लसीकरणासाठी नोंदणी करावी, असं आवाहन जावडेकरांनी केलं. आतापर्यंत केवळ सहव्याधी असलेल्या 45 वर्षांवरील व्यक्तींनाच कोरोना लस दिली जात होती. (Corona vaccine for everybody above 45 years of age says Prakash Javadekar)

वयाचे निकष काय?

वयाची 60 वर्षे पूर्ण केलेल्या सर्व व्यक्तींचे सध्या लसीकरण करण्यात येत आहे. 45 ते 59 या वयोगटातील सहव्याधी असलेल्या व्यक्तींचेही तूर्तास लसीकरण सुरु आहे. या दोन्ही वयोगटांतील व्यक्तींचे लसीकरण करण्यासाठी 1 जानेवारी 2022 रोजीचे वय विचारात घेतले जात आहे. यानुसार आज ज्यांचे वय 59 वर्षे 3 महिने किंवा सहव्याधी असणाऱ्या गटातील व्यक्तीचे वय 44 वर्षे 3 महिने असले तरीही त्यांची लसीकरणासाठी नोंदणी करणे व नंतर लसीकरण करणे शक्य आहे.

लसीकरण केंद्र 24 तास करण्याचे प्रयत्न

मुंबईत सध्या सुरु असणारी कोरोना लसीकरण केंद्रे ही 8 ते 12 तास या कालावधीसाठी कार्यरत आहेत. ती 24 तास कार्यरत झाल्यास दिवसाला एक लाख व्यक्तींचे लसीकरण करणे सहज शक्य होईल, असा विश्वास मुंबई महापालिकेने व्यक्त केला आहे. आणखी 29 रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्रे सुरु करण्याचा प्रस्ताव महानगरपालिकेद्वारे यापूर्वीच शासनाकडे पाठवण्यात आला आहे. खासगी रुग्णालयातील कोविड लसीकरण केंद्रे 24 तास सुरु ठेवण्यास नुकतीच मुभा मिळाली आहे. (Corona vaccine for everybody above 45 years of age says Prakash Javadekar)

एका महिन्यात सर्वच ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण

मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांची संख्या सुमारे 30 लाखांच्या घरात आहे. ही बाब लक्षात घेतल्यास तसेच दिवसाला 1 लाख व्यक्तींचे लसीकरण झाल्यास साधारणपणे महिनाभरात मुंबईतील बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण झालेले असेल.

त्या केंद्रांची मान्यता रद्द करणार

ज्या रुग्णालयांना लसीकरण केंद्रे सुरु करण्यास यापूर्वीच केंद्र सरकारद्वारे परवानगी मिळाली आहे. परंतु ज्यांनी अद्याप लसीकरण केंद्र सुरू केले नाही, अशा रुग्णालयातील लसीकरण केंद्रांची मान्यता रद्द करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या :

पुण्यात 18 वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोरोना लस द्या, अजितदादांची मोदी सरकारकडे मागणी

तुमचं वय 59 वर्षे 3 महिन्यांहून अधिक आहे? तरीही तुम्ही कोरोना लसीकरणास पात्र

(Corona vaccine for everybody above 45 years of age says Prakash Javadekar)

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.