AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना लसीकरणाचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार उचलणार , आगामी अर्थसंकल्पात 500 अब्ज रुपयांची तरतूद?

देशातील प्रत्येक नागरिकाला कोरोना लस देण्यासाठी 6-7 डॉलरपेक्षा जास्त खर्च येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

कोरोना लसीकरणाचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार उचलणार , आगामी अर्थसंकल्पात 500 अब्ज रुपयांची तरतूद?
Follow us
| Updated on: Jan 11, 2021 | 6:31 PM

नवी दिल्ली : कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी केंद्र सरकारने लसीकरणासाठी एक रोडमॅप तयार केला आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, कोरोना लसीकरणाचा संपूर्ण खर्च (Covid-19 Vaccine plan) केंद्र सरकार उचलणार आहे. इतकंच नाही तर आगामी बजेट 2021 (Budget 2021) मध्ये हा रोडमॅप जाहीर केला जाऊ शकतो. सरकारने यासंदर्भात संपूर्ण आराखडा तयार केला असल्याची माहिती देण्यात आली आहे. (corona vaccine roadmap entire cost of the corona vaccination will be borne by central government )

अधिक माहितीनुसार, अ‍ॅस्ट्रजेनिकामधून सरकार मोठ्या प्रमाणात लस घेण्याच्या तयारीत आहे. तर देशातील प्रत्येक नागरिकाला कोरोना लस देण्यासाठी 6-7 डॉलरपेक्षा जास्त खर्च येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यामुळेच सरकारने 130 कोटी लोकांना कोरोना लस देण्यासाठी 500 अब्ज रुपयांचे बजेट ठरवलं आहे. चालू आर्थिक वर्षाच्या शेवटी या अर्थसंकल्पाची मांडणी केली जाईल. यामुळे लसीचा पुरवाठा करताना निधीची कमतरता भासणार नाही अशी माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.

फेब्रुवारीअखेरपर्यंत लसीकरण सुरू करण्याचे लक्ष्य

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, कोरोनाच्या लसीकरणाचा संपूर्ण खर्च सरकार उचलण्याची तयारी करत असून या संदर्भात अर्थसंकल्प जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे. तर फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत लसीकरण सुरू केलं जाऊ शकतं अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. (corona vaccine roadmap entire cost of the corona vaccination will be borne by central government )

खरंतर, कोरोनासारख्या जीवघेण्या संसर्गाचा धोका हा वाढतच चालला आहे. यामुळे केंद्र सरकार चिंतेत आहे. म्हणून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. कोरोना विषाणूनाचा नाश करण्यासाठी प्रत्येक देश लसीच्या प्रतिक्षेत आहे. कोविडच्या 150 हून अधिक लसींवर जगभरात संशोधन आणि चाचण्या सुरू आहेत. पण जागतिक पातळीवर अद्याप कोणत्याही लसीला परवानगी देण्यात आलेली नाही.

इतर बातम्या – 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर, कोरोना लस निर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूला भेट देणार

कोरोना लसीकरणासाठी राज्यात टास्क फोर्सची निर्मिती, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती

(corona vaccine roadmap entire cost of the corona vaccination will be borne by central government )

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.