Corona Cases India : देशात 2 लाख 68 हजार नवे कोरोना रुग्ण, वाढत्या मृत्यूच्या संख्येनं टेन्शन वाढलं

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Health Ministry) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या 24 तासांमध्ये 2 लाख 68 हजार 833 कोरोना रुग्ण आढळले आहेत.

Corona Cases India : देशात 2 लाख 68 हजार नवे कोरोना रुग्ण, वाढत्या मृत्यूच्या संख्येनं टेन्शन वाढलं
कोविड
Follow us
| Updated on: Jan 15, 2022 | 10:11 AM

नवी दिल्ली: देशात कोरोना विषाणू (Corona) संसर्गाचं संकट वाढताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Health Ministry) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतात गेल्या 24 तासात 2 लाख 68 हजार 833 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झालीय. गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी 4631 कोरोना रुग्ण वाढले आहेत. दिवसभरात 1 लाख 22 हजार 684 जण कोरोनामुक्त झाले आहेत. ओमिक्रनच्या रुग्णसंख्येनं 6041 चा टप्पा गाठलाय. देशात 14 लाख 17 हजार 820 सक्रिय रुग्ण आहेत. देशाचा कोरोना पॉझिटीव्हीटी रेट 16.66 वर गेला आहे. तर, देशात काल दिवसभरात 402 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात शुक्रवारी दिवसभरात 43 हजार 211 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, 19 जणांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात 1 लाख 22 हजार 684 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी 2 लाख 68 हजार 833 जणांना कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या 24 तासात 402 जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून मृतांचा आकडा 4 लाख 85 हजार 752 पोहोचलाय.

ओमिक्रॉन बाधितांची संख्या 6 हजारांच्या पार

देशातील ओमिक्रॉन (Omicron) बाधितांची संख्या देखील वाढली असून 6 हजार 41 वर पोहोचली आहे. काल राज्यात 238 ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झालीय.सर्वाधिक 197 रुग्णांची पुण्यात नोंद झालीय. आतापर्यंत राज्यात 1605 ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झालीय.859 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज मिळाला आहे.

इतर बातम्या

Nashik Corona | नाशिकमध्ये खुल्या पर्यटनावर बंदी; धार्मिक स्थळांबाबत काय होणार?

पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना ओमिक्रॉनचा कहर, कडक निर्बंध लागणार? अजित पवारांची तातडीची आढावा बैठक

Corona virus Cases india 268333 new cases and 402 deaths reported in the last 24 hours omicron variant cases crosses Six thousand

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.