Corona Cases India : देशात 2 लाख 58 हजार नवे रुग्ण, मृत्यूसंख्येत वाढ झाल्यानं टेन्शन वाढलं
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Health Ministry) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या 24 तासांमध्ये 2 लाख 58 हजार 89 कोरोना रुग्ण आढळले आहेत.
नवी दिल्ली: कोरोना विषाणू (Corona) संसर्गाचं संकट वाढल्यानं अनेक राज्यांनी निर्बंध लागू केले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून देशात अडीच लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या चोवीस तासात कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट झाल्याचं दिसून आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Health Ministry) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या 24 तासात 2 लाख 58 हजार 89 कोरोना रुग्णांची नोंद झालीय. ओमिक्रॉन (Omicron) बाधितांची संख्या देखील आठ हजारांच्या वर गेली आहे. गेल्या चोवीस तासात 1 लाख 51 हजार 740 जण कोरोनामुक्त झाले असून 385 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. देशातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 8209 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात 8 नव्या ओमिक्रॉन बाधित रुग्णांची नोंद रविवारी झाल्याचं समोर आलं आहे.
India reports 2,58,089 COVID cases (13,113 less than yesterday), 385 deaths, and 1,51,740 recoveries in the last 24 hours.
Active case: 16,56,341 Daily positivity rate: 119.65%
Confirmed cases of Omicron: 8,209 pic.twitter.com/Fi345RsMuw
— ANI (@ANI) January 17, 2022
मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात 1 लाख 51 हजार 740 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार रविवारी 2 लाख 58 हजार 89 जणांना कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या 24 तासात 385 जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून मृतांचा आकडा 4 लाख 86 हजार 451 वर पोहोचलाय.
ओमिक्रॉन बाधितांची संख्या 8 हजारांच्या पार
देशातील ओमिक्रॉन (Omicron) बाधितांची संख्या देखील वाढली असून 8 हजार 209वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात काल 8 ओमिक्रॉन बाधित रुग्णाची नोंद झालीय.
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची स्थिती काय?
राज्यात रविवारी 41 हजार 327 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 29 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात 40 हजार 386 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. तर राज्यात रविवारी 8 ओमिक्रॉनबाधितांची नोंद झालीय. महाराष्ट्रातील एकूण ओमिक्रॉन रुग्णांचा आकडा 1 हजार 738 वर पोहोचला आहे. त्यातले 932 रुग्ण ओमिक्रॉनमुक्त झाले आहेत.
इतर बातम्या:
Corona Vaccination : 12 ते 14 वयोगटातील मुलांचे लसीकरण फेब्रुवारी अखेरीस सुरू होण्याचे संकेत!
School Reopen : इंग्रजी माध्यमाच्या शाळा आजपासून सुरु, मेस्टाचा निर्णय, इस्मा संघटनेची वेगळी भूमिका
Corona virus India 258089 new cases and 385 deaths reported in the last 24 hours omicron variant cases crosses eight thousand