Corona Cases India : कोरोना रुग्णसंख्येत घट, 3 लाखांपेक्षा अधिक नव्या रुग्णांची नोंद, 439 जणांचा मृत्यू

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Health Ministry) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या 24 तासांमध्ये 3 लाख 06 हजार 064 कोरोना रुग्ण आढळले आहेत.

Corona Cases India : कोरोना रुग्णसंख्येत घट, 3 लाखांपेक्षा अधिक नव्या रुग्णांची नोंद, 439 जणांचा मृत्यू
कोरोना चाचणी
Follow us
| Updated on: Jan 24, 2022 | 9:53 AM

नवी दिल्ली: कोरोना विषाणू (Corona) संसर्गाचं संकट वाढल्यानं अनेक राज्यांनी निर्बंध लागू केले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून देशात तीन लाखांहून अधिक कोरोना (Covid cases) रुग्ण आढळून येत आहेत. देशात गेल्या चोवीस तासात 3 लाख 6 हजार 64 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. रविवारी आलेल्या आकडेवारीच्या तुलनेत आज 27 हजार 469 रुग्ण घटले आहेत. दिवसभरात 439 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, दिवसभरात 2 लाख 43 हजार 495 रुग्ण बरे झाले आहेत. देशातील पॉझिटिव्हीटी रेट 20.75 टक्क्यांवर पोहोचला आहे. देशात सध्या 22 लाख 49 हजार 335 सक्रिय रुग्ण आहेत. महाराष्ट्र (Maharashtra) आणि कर्नाटकात गेल्या चोवीस तासात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. कर्नाटकात 50210 रुग्ण आढळले आहेत. तर, महाराष्ट्रात 40 हजार 805 रुग्णांची नोंद झाली आहे.

एएनआयचं ट्विट

कोरोना रुग्णांची संख्या घटली

गेल्या 24 तासात 2 लाख 43 हजार 495 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार सोमवारी 3 लाख 6 हजार 064 जणांना कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. शनिवारच्या तुलनेत रविवारी 27 हजार कमी रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या 24 तासात 439 जणांच्या मृत्यूची नोंद झाली.

महाराष्ट्रातील रुग्णांची स्थिती

रविवारी राज्यात 40 हजार 805 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 44 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात 27 हजार 377 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 70 लाख 67 हजार 955 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर,राज्यातील ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 2579 वर पोहोचली आहे. तर, 1225 जण ओमिक्रॉन संसर्गातून मुक्त झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.रविवारी एकाही ओमिक्रॉन रुग्णाची नोंद झाली नाही.

कर्नाटकात सर्वाधिक रुग्णांची नोंद

कर्नाटकात रविवारी 50210 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्णसंख्या 35 लाख 17 हजार 682 वर पोहोचली आहे. तर राज्यातील कोरोना मृत्यूची संख्या 38582 वर पोहोचली आहे. नवी दिल्लीत काल 10 हजार पेक्षा कमी रुग्णांची नोंद झालीय. राजधानीसाठी ही दिलासादायक बाब आहे. तर, केरळमध्ये 45 हजार 449 नव्या रुग्णांचीं नोंद झालीय.

इतर बातम्या:

Rabi Season : खरिपापाठोपाठ रब्बीचेही स्वप्न भंगले, शेतकऱ्याने हरभरा पीकच उपटून बांधावर फेकले

रेल्वे आपलीच म्हणून मोठ्यानं गप्पा मारताना जरा सावध बरं का, नियम वाचा… नाही तर कारवाई होऊ शकते!

Corona virus India 306064 new cases and 439 deaths reported in the last 24 hours omicron variant cases crosses nine thousand

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.