Coronavirus Cases Today : गेल्या 24 तासात 3805 नवे कोरोनाबाधित रूग्ण, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 20 हजारांहून अधिक

शुक्रवारी देशात कोरोनाचे 3,545 नवीन रुग्ण आढळले. तसेच 27 कोरोना बाधिक रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. 24 तासांत नवीन रुग्णांमध्ये सुमारे 300 ने वाढ झाली आहे. परंतु गुरूवारच्या तुलनेत मृत्यू 5 ने कमी झाले आहेत.

Coronavirus Cases Today : गेल्या 24 तासात 3805 नवे कोरोनाबाधित रूग्ण, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 20 हजारांहून अधिक
पुण्यात दोन दिवसात कोरोनाच्या रूग्ण संख्येत वाढImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 07, 2022 | 3:25 PM

नवी दिल्ली – भारतात कोरोना (Corona) विषाणू संसर्गाच्या नवीन प्रकरणांमध्ये किंचित वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या (Union Health Ministry) ताज्या आकडेवारीनुसार, देशात कोविड-19 संसर्गाची 3,805 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. गेल्या 24 तासात 22 मृत्यू झाले आहेत. तसेच 3,168 कोरोना रूग्णांनी संसर्गावर मात केली आहे. भारतात कोरोना विषाणू संसर्गाच्या सक्रिय प्रकरणांची संख्या आता 20,303 च्या आसपास पोहोचली आहे. भारतातल्या (India) एकूण संसर्गाच्या 0.05 टक्के असं हे प्रमाण आहे.

दिल्ली हे देशाचे कोरोना हॉटस्पॉट राहिले आहे

शुक्रवारी देशात कोरोनाचे 3,545 नवीन रुग्ण आढळले. तसेच 27 कोरोना बाधिक रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. 24 तासांत नवीन रुग्णांमध्ये सुमारे 300 ने वाढ झाली आहे. परंतु गुरूवारच्या तुलनेत मृत्यू 5 ने कमी झाले आहेत. राजधानी दिल्ली हे देशाचे कोरोना हॉटस्पॉट राहिले आहे. गेल्या 24 तासात दिल्लीत 1656 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. मात्र,चोवीस तासात एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही. विशेष म्हणजे दिल्लीत 24 तासांत 1306 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या दिल्लीत सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 6096 वर पोहोचली आहे. सध्याचा संसर्ग दर 5.39 टक्के झाला आहे.

कोरोना रूग्णांचा बरा होण्याचा दर 98.74 टक्के

भारतातील कोरोना रूग्णांचा बरा होण्याचा दर 98.74 टक्के आहे. तर दिवसाला रूग्ण बरे होण्याचा दर ०.७८% आहे. देशात आतापर्यंत 84.03 कोटी कोरोनाच्या चाचण्या झाल्या आहेत. गेल्या 24 तासांत 4,87,544 नमुने तपासण्यात आले आहेत. देशात कोरोना संसर्गातून बरे झालेल्या लोकांची संख्या आता 4,25,54,416 झाली आहे. त्याचबरोबर आज 7 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत भारतात 190 कोटी लोकांना लस देण्यात आली आहे. 12-14 वर्षे वयोगटातील 3.01 कोटी पेक्षा जास्त मुलांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.