दोन नव्या लक्षणांमुळे कोरोनाबाधितांचं टेन्शन वाढलं, तोंड तर कोरडं पडत नाहीय ना?
तर दुसरीकडे कोरोना रुग्णांची नवनवीन लक्षण समोर येत आहे. त्यामुळे धोका वाढला आहे. (New Corona symptoms)
नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात बाधितांची संख्या वाढली आहे. एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ होत आहे, तर दुसरीकडे कोरोना रुग्णांची नवनवीन लक्षण समोर येत आहे. त्यामुळे धोका वाढला आहे. (New Corona symptoms have been reported in patient)
कोरोनाची नवी लक्षणं काय?
राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आढळणाऱ्या रुग्णांमध्ये काही नवी लक्षण पाहायला मिळत आहे. यात तोंड कोरडे होणे, घसा दुखणे, जीभ कोरडी पडणे, जीभ पांढरी पडणे किंवा त्यावर पांढरे डाग दिसणे या लक्षणांचा समावेश आहे.
कोरोना रुग्णांना संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात ही लक्षण दिसू लागतात. यातील तोंड कोरडं पडणे हे प्रमुख लक्षण आहे. याला जेरोस्टोमिया असे म्हटलं जाते. यानंतर त्या रुग्णाला ताप आणि घसा दुखण्यासारखी लक्षणे जाणवू लागतात. तसेच कोरोनाच्या संसर्गाच्या नव्या लक्षणांमध्ये जीभ कोरडी पडू शकते. यामुळे तोंडात लाळ निर्माण होण्यावर परिणाम होतो.
ज्या रुग्णांमध्ये अशी लक्षणं दिसून येतात, त्यांना जेवताना त्रास होतो. लाळ नसल्याने जेवण नीट चावता येत नाही. तसेच बोलण्यामध्येसुद्धा अडचणी येतात. त्यामुळे जर तुम्हाला ही लक्षण जाणवत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
कोरोनाची दुसरी लाट मुलांसाठी धोकादायक
कोरोनाची नव्याने आलेली लाट ही नव्या स्ट्रेनमुळे आल्याचे दावे केले जातायत. कारण या नव्या कोरोनामध्ये जुन्या कोरोनाच्या लक्षणांसोबतच काही नवीन लक्षणं सुद्धा दिसून येतायत. ताप, थकवा, अशक्तपणा, खोकला या जुन्या लक्षणांसोबतच अतिसार किंवा जुलाब, उलट्यासद्धा या नव्या कोरोनाची नवी लक्षणं आहेत. हीच लक्षणं लहान मुलांसाठी घातक ठरतायत. यापूर्वीही लहान मुलांना कोरोनाची लागण होत होती, मात्र लहान मुलांमध्ये अँटीबॉडीज तयार करण्याची क्षमता मोठ्यांपेक्षा असल्यामुळे ती लवकर बरी व्हायची. मात्र नव्या कोरोनाची जुलाब, उलट्या अशा प्रकारची लक्षणं ही लहान मुलासांठी धोकादायक असू शकतात असं आरोग्य तज्ज्ञांचं मत आहे.
कोरोनाग्रस्तांची आकडेवारी
गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 2 लाख 34 हजार 692 नवीन रुग्ण गेल्या 24 तासात कोरोनामुळे 1 हजार 341 जणांचा मृत्यू गेल्या 24 तासात 1 लाख 23 हजार 354 जणांना डिस्चार्ज देण्यात आला
एकूण कोरोना बाधित 1 कोटी 45 लाख 26 हजार 609 वर आतापर्यंत 1 कोटी 26 लाख 71 हजार 220 जणांना देण्यात आला डिसचार्ज देशात 16 लाख 79 हजार 740 जणांवर उपचार सुरु आतापर्यंत कोरोनामुळे 1 लाख 75 हजार 649 जणांचा मृत्यू आतापर्यंत देशात 11 कोटी 99 लाख 37 हजार 641 लसीकरण
(New Corona symptoms have been reported in patient)
संबंधित बातम्या :
देशात कोरोनाचे 2 लाख 34 हजार 692 नवीन रुग्ण, 1341 जण दगावले
Mumbai Corona | मुंबईत 10 हजार 797 मजले सील, सर्वाधिक मायक्रो कंटेनमेंट झोन कोणत्या वॉर्डमध्ये?