Covid Vaccine: 2-18 वर्षे वयोगटातील मुलांना Covaxin च्या मंजुरीसाठी DCGI कडून वेळ लागण्याची शक्यता

कोवॅक्सिन (COVAXIN) ला DCGI कडून मंजुरी मिळण्यासाठी आणखी काही वेळ लागू शकतो. सूत्रांचे म्हणणे आहे की, कोवॅक्सीनच्या डेटाचे मूल्यांकन केले जात असल्याने लसीला DCGI कडून मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा करावी लागू शकते.

Covid Vaccine: 2-18 वर्षे वयोगटातील मुलांना Covaxin च्या मंजुरीसाठी DCGI कडून वेळ लागण्याची शक्यता
Bharat Biotech covaxin
Follow us
| Updated on: Nov 08, 2021 | 6:25 PM

लहान मुलांसाठी भारत बायोटेकच्या (Bharat Biotech) कोरोना लस कोवॅक्सिन (COVAXIN) ला DCGI कडून मंजुरी मिळण्यासाठी आणखी काही वेळ लागू शकतो. सूत्रांचे म्हणणे आहे की, कोवॅक्सीनच्या डेटाचे मूल्यांकन केले जात असल्याने लसीला DCGI कडून मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा करावी लागू शकते. (Covaxin approval for children can take time in India meanwhile Canada and USA may give approval for children 2-18 years use)

दरम्यान, भारत बायोटेकची लस कॅनडा आणि अमेरिकेत 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना दिली जाऊ शकते अशी बातमी देखील आहे. यासाठी भारत बायोटेकची सहयागी कंपनी ऑक्युजेन इंक.ने कॅनेडियन आणि अमेरिकेन अधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली आहे. अमेरिका आणि कॅनडाने परवानगी दिल्यास भारत बायोटेकचे कोवॅक्सिन या दोन देशांमध्येही वापरण्यास सुरुवात होईल.

WHO कडून Covaxin ला मान्याता

मागच्या आठवड्यात जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) तांत्रिक सल्लागार टीमने (TAG) Covaxin ला आपत्कालीन वापराच्या यादीत (EUL) समाविष्ट केले होते. WHO ने 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी Covaxin च्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली. WHO ची मंजुरी मिळाल्यानंतर आता ज्या लोकांना ही लस देण्यात आली आहे ते कोणत्याही निर्बंधाशिवाय परदेशात जाऊ शकतील. WHO ने आतापर्यंत 6 कोरोना प्रतिबंधक लसींना मान्यता दिली आहे. यामध्ये Pfizer/BioNtech, AstraZeneca Covishield, Johnson & Johnson, Moderna, Sinopharm आणि Sinova यांच्या लसींचा समावेश आहे.

यासोबत, सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ने लसीची शेल्फ लाइफ 12 महिन्यांनी वाढवली आहे. याचा अर्थ आता ही लस निर्माणकेल्याच्या तारखेपासून 12 महिन्यांपर्यंत वापरली जाऊ शकते. कंपनीने या लसीचा डेटा सीडीएससीओला पाठवला होता, त्यानंतर त्याला मान्यता देण्यात आली आहे.

Other News

Narendra Modi LIVE in Pandharpur : देशात हायवे, रेल्वेरुळ, मेट्रोलाईन, नवे एअरपोर्ट उभारण्याचे काम- मोदी

Chhath Puja 2021: दिल्लीत यमुना नदीच्या विषारी फेसाच्या पाण्यात भाविकांनी केली छठ पुजा ! बघा फोटो

VIDEO: उखडायचंच असेल तर अरुणाचलमधून चीन आणि काश्मीरमधून अतिरेक्यांना उखडून फेका; राऊतांचा भाजपवर घणाघाती हल्ला

'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.