AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तिसऱ्या लाटेचा धोका? सकाळी टोपेंनी सांगितलं नंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं, पुढचे तीन महिने महत्वाचे, महाराष्ट्रासाठीही अलर्ट

हाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सकाळी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली होती. त्यानंतर आता केंद्र सरकारने महाराष्ट्रासह पाच राज्यांना अलर्ट दिला आहे. (Covid 19)

तिसऱ्या लाटेचा धोका? सकाळी टोपेंनी सांगितलं नंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं, पुढचे तीन महिने महत्वाचे, महाराष्ट्रासाठीही अलर्ट
कोरोना
Follow us
| Updated on: Oct 07, 2021 | 7:02 PM

नवी दिल्ली: महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सकाळी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली होती. त्यानंतर आता केंद्र सरकारने महाराष्ट्रासह पाच राज्यांना अलर्ट दिला आहे. केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, मिझोराम आणि कर्नाटक आदी पाच राज्यात 10 हजाराहून कोरोनाचे सक्रिय रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे या पाच राज्यांनी डोकेदुखी वाढवल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.

कोरोनाचं आव्हा अजूनही संपुष्टात आलेलं नाही. कोरोनाची दुसरी लाट नियंत्रित करण्यात आपण काही प्रमाणात अपयशी ठरल्याचं म्हणू शकतो. आपल्याला निरंतर प्रयत्न करण्याची गरज आहे. केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, मिझोराम आणि कर्नाटकात दहा हजारांपेक्षा अधिक सक्रिय रुग्ण आढळले आहेत, असं आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं.

पॉझिटिव्हीटी रेट वाढला

देशात गेल्या आठवड्यात एकूण पॉझिटिव्हीटी रेट 1.68 टक्के होता. पूर्वी हाच रेट 5.86 टक्के होता. अरुणाचल प्रदेश आणि आसामसह 28 जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के आणि 10 टक्क्यांच्या आत आहे. म्हणजे या ठिकाणी संसर्गाचं प्रमाण अधिक आहे. तर 34 जिल्ह्यांमध्ये 10 टक्क्याहून अधिक विकली पॉझिटिव्हीटी रेट आढळून आला आहे.

8.36 लाख बेड तयार

दरम्यान, यावेळी त्यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या तयारीचीही त्यांनी माहिती दिली. राज्यांमध्ये रुग्णालयांमध्ये एकूण 8.36 लाख बेड तयार करण्यात आले आहेत. त्यात 9.69 लाख आयसोलेशन बेड आहेत. तर देशभरात 4.86 लाख ऑक्सिजन बेड आहेत. अशा प्रकारे 1.35 लाख आयसीयू बेड तयार करण्यात आले आहेत. डॉ. व्हिके पॉल यांच्या म्हणण्यानुसार, रोज 4.5 ते 5 लाख रुग्ण येतील हा अंदाज बांधूनच सरकार तयारी करत आहे. पहिला डोसच्या 71 टक्के व्हॅक्सिनेशनपर्यंत गेल्यावर कोरोना रुग्णांच्या संख्येत कशा पद्धतीने वाढ होणार याची मोजदाद करण्यासाठी आपल्याकडे कोणाताही फॉर्म्युला नाही.

सध्या 2.44 लाख सक्रिय रुग्ण

देशात आतापर्यंत 3.39 कोटी कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर देशभरात सध्या 2.44 लाख सक्रिय रुग्ण आहेत. देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. मात्र, केरळमध्ये अजूनही सर्वाधिक रुग्ण आहेत. कोरोनाच्या रुग्ण संख्येत केरळा नंबर वनवर आहे. केरळात सर्वाधिक 50 टक्के रुग्ण संख्या आढळून येत आहे. तर महाराष्ट्रात 15.06 टक्के, तामिळनाडूत 6.81 टक्के आणि मिझोराममध्ये 6.58 टक्के रुग्ण आढळून येत आहेत. आरोग्य मंत्रालयाच्यानुसार 5 टक्क्याहून अधिक पॉझिटिव्हीटी रेट असलेल्या राज्यांमध्ये मिझोराम सर्वात वर आहे. मिझोराममध्ये 21.64 टक्के आणि केरळमध्ये 13.72 टक्के पॉझिटिव्हीटी रेट आहे. तर सिक्कीम, मणिपूर आणि मेघालयाचा त्यानंतरचा नंबर आहे.

संबंधित बातम्या:

Healthy Heart | हृदयाची निगा राखण्यासाठी वापर करा या 5 औषधी वनस्पती

दसरा, दिवाळीनंतर राज्यात तिसऱ्या लाटेची शक्यता; राजेश टोपेंनी दिली धोक्याची सूचना

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये पुन्हा वाढ, मात्र सक्रिय रुग्णसंख्या अडीच लाखांच्या खाली

(Covid 19 Challenge Not Over Yet Health Ministry Urges All to be Watchful During Festive Season)

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.