Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वेगाने पसरतोय कोरोनाचा नवीन व्हेरिएंट, एका दिवसात इतक्या रुग्णांची वाढ

कोरोनाचा नवा व्हेरिएंट वेगाने पसरत आहे. कारण आता रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या या वाढत्या संसर्गामुळे प्रशासनापुढचे आव्हान देखील वाढले आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट हळूहळू देशभरात पोहोचत आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटबाबत प्रशासन सतर्क असून योग्य ती पावले उचलण्यात येत आहेत.

वेगाने पसरतोय कोरोनाचा नवीन व्हेरिएंट, एका दिवसात इतक्या रुग्णांची वाढ
Follow us
| Updated on: Jan 04, 2024 | 3:00 PM

Covid 19 Update : भारतात कोरोना पुन्हा एकदा पाय पसरु लागला आहे. रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 760 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. नवीन व्हेरिएंटमुळे सक्रिय रुग्णांची संख्या 4,423 वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत केरळ आणि कर्नाटकमधील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

नवीन व्हेरिएंट वेगाने पसरतोय

कोरोनाच्या नवीन प्रकरणे वेगाने वाढत आहेत. कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1 च्या आतापर्यंत 541 प्रकरणांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी 5 डिसेंबरपर्यंत, दररोज वाढणाऱ्या रुग्णांची संख्या दुहेरी आकड्यांवर आली होती. पण कोरोनाचा नवा व्हेरिएंट भारतात आल्यानंतर कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वेगाने वाढू लागले आहेत.

याआधी जेव्हा कोरोना विषाणू आपल्या शिखरावर होता, तेव्हा दररोज लाखो रुग्णांची नोंद होत होती. 2020 पासून, भारतात 4.5 कोटींहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे आणि 5.3 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर ही 4.4 कोटी लोकांनी त्यावर मात केली आहे. तर देशात आतापर्यंत कोविड लसींचे 220.67 कोटी डोस देण्यात आले आहेत.

देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.
कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा
कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा.
'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट
'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट.
2 दिवस महिलेच्या मृतदेहासोबतच राहीला, मृतदेहा शेजारी बसून जेवणही केलं
2 दिवस महिलेच्या मृतदेहासोबतच राहीला, मृतदेहा शेजारी बसून जेवणही केलं.
धनंजय देशमुख आज केज पोलिसांना भेटणार; जेल प्रशासनावर उपस्थित केली शंका
धनंजय देशमुख आज केज पोलिसांना भेटणार; जेल प्रशासनावर उपस्थित केली शंका.
31 एप्रिलला कामराकडून पलावा पुलाचे उद्घाटन',मनसे नेत्याचा सरकारला टोला
31 एप्रिलला कामराकडून पलावा पुलाचे उद्घाटन',मनसे नेत्याचा सरकारला टोला.
हत्येच्या कटाचे धसांचे गंभीर आरोप; मुंडेंची प्रतिक्रिया
हत्येच्या कटाचे धसांचे गंभीर आरोप; मुंडेंची प्रतिक्रिया.
दम नाही, त्यांनी हिंदी सिनेमे पाहणं कमी करावं, दमानियांचा धसांना सल्ला
दम नाही, त्यांनी हिंदी सिनेमे पाहणं कमी करावं, दमानियांचा धसांना सल्ला.
खोक्याच्या बायकोने धसांना फसवलं जात असल्याचा केला दावा
खोक्याच्या बायकोने धसांना फसवलं जात असल्याचा केला दावा.