Covid Cases in India: देशात पाच राज्यात कोरोना वाढला, चोवीस तासात 12,847 रुग्णांची नोंद

मागच्या 24 तासात देशात सक्रिय रुग्णांची संख्या 4,848 ने वाढली आहे. गेल्या 24 तासांत देशात 15,27,365 लोकांना लसीकरण करण्यात आले आहे. त्यानंतर आतापर्यंत लस घेतलेल्या लोकांची एकूण संख्या 1,95,84,03,471 झाली आहे.

Covid Cases in India: देशात पाच राज्यात कोरोना वाढला, चोवीस तासात 12,847 रुग्णांची नोंद
देशात पाच राज्यात कोरोना वाढला, चोवीस तासात 12,847 रुग्णांची नोंदImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 12:20 PM

मुंबई – देशात कोरोनाची (Corona) रूग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे चौथ्या लाटेची (Fourth Wave) शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे. मागच्या 24 तासात संपुर्ण देशात कोरोनाचे 12,847 नवीन रुग्ण आढळले आहेत. हे रुग्ण गुरूवारच्या तुलनेत 5.2 टक्के अधिक आहे. मे महिन्यापासून महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. सध्या मुंबई दिवसाला दोन हजार रुग्ण दररोज सापडत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने देखील चिंता व्यक्त केली आहे. कोरोना रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात 4,255 कोरोना बाधित रुग्ण आहेत. दुसऱ्या क्रमांकावर केरळ आहे, तिथं 3,419 रुग्ण आहेत. दिल्लीत 1,323, कर्नाटकात 833 आणि हरियाणामध्ये 625 कोरोना रुग्ण आहेत. विशेष म्हणजे मागच्या चोवीस तासात देशात 14 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 63,063 असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली आहे.

एकट्या महाराष्ट्रात 33.12 कोरोनाची प्रकरणं नोंदवली गेली

देशात कोरोनामुळे मरण पावलेल्यांची एकूण कोरोना रुग्णांची संख्या 5,24,817 झाली आहे. सध्या एकट्या महाराष्ट्रात 33.12 कोरोनाची प्रकरणं नोंदवली गेली आहेत. देशातल्या पाच राज्यातून 81.37 टक्के कोरोनाची प्रकरण असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तसेच रुग्ण बरे होण्याची टक्केवारी दर सुध्दा 98.64 टक्के आहे. गेल्या 24 तासांत एकूण 7,985 रुग्ण बरे झाले असून, देशभरातील एकूण बरे झालेल्यांची संख्या 4,26,82,697 झाली आहे.

कोरोनाच्या सक्रीय रुग्ण संख्येत वाढ

मागच्या 24 तासात देशात सक्रिय रुग्णांची संख्या 4,848 ने वाढली आहे. गेल्या 24 तासांत देशात 15,27,365 लोकांना लसीकरण करण्यात आले आहे. त्यानंतर आतापर्यंत लस घेतलेल्या लोकांची एकूण संख्या 1,95,84,03,471 झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात एकूण 5,19,903 कोरोना संशयास्पद लोकांची तपासणी करण्यात आली. गुरुवारी भारतात कोरोनाचे 12,213 नवीन रुग्ण आढळले त्यापैकी 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 7,624 रुग्ण कोरोना आजारातून बरे झाले आहेत.

हे सुद्धा वाचा

दिल्लीत कोरोनाची 1300 नवी प्रकरणं

मागच्या चोवीस तासात 1300 कोरोना रूग्णांची नव्याने नोंद झाली आहे. त्यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. सलग तिसऱ्या दिवशी 1 हजार पेक्षा अधिक रूग्ण आढळून आले आहेत. एका दिवसात 19776 संशयास्पद रूग्णांची चाचणी करण्यात आली.

सध्या दिल्लीत 3948 कोरोना रुग्णांची संख्या आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.