AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या 90 लाखांच्या पार; देशभरात 1 लाख 32 हजारांहून अधिक मृत्यू : आरोग्य मंत्रालय

देशात गेल्या 24 तासात 46 हजार 232 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या 90 लाखांच्या पार; देशभरात 1 लाख 32 हजारांहून अधिक मृत्यू : आरोग्य मंत्रालय
| Updated on: Nov 21, 2020 | 11:35 AM
Share

नवी दिल्ली : भारतात गेल्या 24 तासांमध्ये 46 हजार 232 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची (corona patients) नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे काल रात्री देशभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 90.5 लाखांच्या पुढे गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या नव्या माहितीनुसार गेल्या 24 तासात देशात 46 हजार 232 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत, तर 546 बाधितांचा उपचारांरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 90,50,598 इतकी झाली आहे. (Covid19 cases in india crossed 90.5 lakh and 132726 total deaths)

देशात 4 लाख 39 हजार 747 सक्रीय रुग्ण

देशात आज सकाळपर्यंत 4 लाख 39 हजार 747 सक्रीय कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर आतापर्यंत देशात 84 लाख 78 हजार 124 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर आतापर्यंत देशात 13 कोटी 6 लाख 57 हजार 808 कोव्हिड चाचण्या करण्यात आल्या आहेत. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने दिलेल्या माहितीनुसार 20 नोव्हेंबर रोजी संपूर्ण देशात 10 लाख 66 हजार 22 कोव्हिड चाचण्या करण्यात आल्या. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात 28 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 20 हजारांपेक्षा कमी सक्रीय रुग्ण आहेत.

मुंबई सावरतेय, दिल्लीत कोरोनाचा कहर

आतापर्यंत देशात सर्वाधित रुग्ण मुंबईत होते. परंतु हिवाळा सुरू होताच दिल्लीत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून मुंबई मात्र सावरल्याचं दिसून येत आहे. दिल्लीतील नागरिकांचा निष्काळजीपणा आणि सरकारचा हलगर्जीपणा कोरोनाचा प्रादूर्भाव वाढण्यास कारणीभूत असल्याचं एका सर्व्हेतून आढळून आलं आहे. सणांमध्ये वाढलेली नागरिकांची गर्दी, मेट्रो आणि बससेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा घाईने घेतलेला निर्णय, लॉकडाऊनमध्ये दिलेली सवलत, कोविड सेंटरची कमतरता आणि मोहिमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आलेलं अपयश या पाच कारणांमुळे दिल्लीतील कोरोना नियंत्रणाचा कार्यक्रम फसल्याचं या अहवालातून पुढे आलं आहे.

हिवाळा सुरू झाला असून दिल्लीमध्ये कोविड बाधितांची संख्या वाढण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. तथापि, याबाबत एका डॉक्टराने तपमान व कोविड याचा थेट संबंध नसल्याचे सांगितले आहे. मात्र, हिवाळ्यात लोकांचे हात धुण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचबरोबर दिल्लीकरांकडून सतत कपडे बदलण्याचे टाळले जात आहे. त्यामुळे संसर्गात वाढ होऊ शकते, असे या डॉक्टराने नमूद केल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

28 ऑक्टोबरपासून दिल्लीतली परिस्थिती बिघडली

दिल्लीमध्ये 28 ऑक्टोबरपासून कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली. 28 ऑक्टोबरला दिल्लीत 5 हजारांहून अधिक कोरोना रुग्णसंख्या आढळली.11 नोव्हेंबरला 8 हजार कोरोना रुग्ण आढळले होते. कोरोना संसर्गाचे प्रमाण दिल्लीत वाढत असून बुधवारी 7486 कोरोना केसेस समोर आल्या आहेत तर 131 जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत कोरोनामुळे झालेल्या मृतांची संख्या 7943 वर पोहोचली आहे. यासोबत दिल्लीतील कोरोना रुग्णसंख्येंने 5 लाखांचा टप्पा पार केला आहे. 4 लाख 52 हजार 683 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 42 हजार 458 जणांवर उपचार सुरु आहेत.

संबंधित बातम्या

दिल्लीत कोरोनाचा कहर, अरविंद केजरीवालांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

कोरोनाची लस देताना सामान्य-व्हीआयपी असा भेदभाव करु नका, प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा : अरविंद केजरीवाल

देशातली पहिली कोरोना लस ‘कोव्हॅक्सिन’ची तिसऱ्या टप्प्यात चाचणी सुरू, 26 हजार स्वयंसेवकांचा समावेश

(Covid19 cases in india crossed 90.5 lakh and 132726 total deaths)

दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.