AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्मशानभूमी खचाखच, रहिवाशी कॉलनीतच मृतदेहावर अंत्यसंस्कार, भयावह स्थिती

स्मशानभूमी खचाखच भरल्याने मृतदेहांना अग्नी देण्यासाठीही जागा नाही. त्यामुळे रहिवासी कॉलनीमध्ये मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे.

स्मशानभूमी खचाखच, रहिवाशी कॉलनीतच मृतदेहावर अंत्यसंस्कार, भयावह स्थिती
प्रातिनिधीक फोटो
| Updated on: Apr 17, 2021 | 1:39 PM
Share

भोपाळ : देशभरात कोरोनाने उच्छाद मांडला आहे. दररोज रुग्णवाढीचे नवे विक्रम होत आहेत. रुग्णवाढीसोबतच वाढती मृतांची संख्या भयावह आहे. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 2 लाख 34 हजार 692 नवीन रुग्ण आढळले. तर तब्बल 1341 जण दगावले आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी स्मशानभूमीत रांगा लागल्या असताना, तिकडे मध्य प्रदेशातही तशीच परिस्थिती आहे. (cremation at residential colony due to no space in the cemetery at Madhya Pradesh Bhopal after Maharashtra corona)

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील भयावह चित्र समोर आलं आहे. स्मशानभूमी खचाखच भरल्याने मृतदेहांना अग्नी देण्यासाठीही जागा नाही. त्यामुळे रहिवासी कॉलनीमध्ये मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, “अंत्यसंस्कारानंतर चितेला दिलेल्या अग्नीची राख आसपास असलेल्या घरांजवळ पसरली. या घटनेचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकारानंतर प्रशासनही खडबडून जागं झालं असून, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती कोरोनाबाधित होता, मात्र त्याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.

अनेक मृतदेहांवर एकाच सरणांवर अग्नी

जे चित्र महाराष्ट्रातील उस्मानाबाद, बुलडाण्यात पाहायला मिळालं, तसंच चित्र मध्य प्रदेशातही आहे. स्मशानभूमीमध्ये मृतदेहांची रांग लागली आहे. एकाचवेळी अनेकांना अग्नी द्यावा लागत आहे. त्यामुळेच स्मशानभूमी नेहमीच धगधगती दिसत आहे. 15 एप्रिलला जवळपास 40 मृतदेहांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. भोपाळ गॅस दुर्घटनेवेळीही भीषणता दिसली होती, मात्र जी दाहकता काल दिसली ती भयावह होती, असं स्थानिक पत्रकार सांगतात.

शिवराज सरकारकडून आकड्यांची लपवा-छपवी?

पीटीआयच्या वृत्तानुसार, भोपाळमध्ये विश्रामघाट आणि कब्रिस्तान या दोन ठिकाणी 108 मृतदेहांवर कोव्हिड प्रोटोकॉलनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र सरकारी आकड्यांनुसार 15 तारखेला कोरोनामुळे केवळ 8 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. असं असेल तर 108 जणांवर कोव्हिड नियमांनुसार अंत्यसंस्कार का करण्यात आले, शिवराजसिंग चौहान सरकार आकड्यांची लपवा-छपवी करत आहे, असा आरोप होत आहे.

संबंधित बातम्या   

VIDEO : एकाच वेळी 23 जणांचा अंत्यसंस्कार, अंतिम दर्शनासाठी नातेवाईकांची पायपीट, उस्मानाबादेत मनाला चटका लावणारं दृश्य

Osmanabad | एकाचवेळी 23 जणांवर अंत्यसंस्कार, उस्मानाबादेत स्मशानभूमी गहिवरली

देशात कोरोनाचे 2 लाख 34 हजार 692 नवीन रुग्ण, 1341 जण दगावले

(cremation at residential colony due to no space in the cemetery at Madhya Pradesh Bhopal after Maharashtra corona)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.