AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सावध व्हा, असे काही करु नका, मेसेजला क्लिक केले अन् खात्यातून 16 लाख गायब

cyber crime : सायबर फसवणुकीच्या घटना सध्या वाढत आहेत. या वर्षी पहिल्या तिमाहीत सायबर फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये 18 टक्के वाढ झाली आहे. आता फसवणूक करणारी झारखंडमधील जामतारा टोळीने देशभर नवी फंडा शोधला आहे.

सावध व्हा, असे काही करु नका, मेसेजला क्लिक केले अन् खात्यातून 16 लाख गायब
सायबर क्राईम Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: May 09, 2023 | 11:46 AM

नवी दिल्ली : देशभरात सायबर फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. सायबर पोलिसांकडे फसवणुकीच्या रोज हजारो तक्रारी दाखल होत आहे. 2023 च्या पहिल्या तिमाहीत सायबर फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये 18 टक्क्यांनी वाढ झाल्याचे नुकतेच जाहीर झाले आहे. फसवणूक करणारी झारखंडमधील जामतारा टोळीने देशभर आपले पंख पसरवले आहेत. या टोळीकडून लोकांना लुटण्यासाठी रोज नवनवीन पद्धती शोधल्या जात आहेत. आता या जामतारा टोळीने फसवणुकीची नवीन पद्धत समोर आली आहे. ज्यात ते ना तुमच्याशी बोलणार, ना ओटीपी विचारणार ना बँक खात्याचा तपशील…मग काय आहे ही पद्धत.

आता अशी सुरु झाली फसवणूक

व्हॉट्सॲपच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करण्याची नवीन पद्धत आली आहे. चंदीगडमध्ये फसवणुकीचा हा प्रकार उघड झाला आहे. चंदीगडमधील एका व्यक्तीला व्हॉट्सॲपवर मेसेज आला. त्यात म्हटले होते की, इथे क्लिक केल्यावर खात्यात पैसे जमा होतील. मग त्या व्यक्तीला लालसा निर्माण झाली. त्या व्यक्तीने मेसेजवर क्लिक केले अन् त्याच्या खात्यातून 16 लाख 91 हजार रुपये कापले गेले. या व्यक्तीकडून कोणताही OTP किंवा इतर कोणतीही माहिती विचारण्यात आलेली नाही.

हे सुद्धा वाचा

शोधली ही नवीन पद्धत

हल्ली बँकेचे मेसेजही व्हॉट्सॲपवरच येतात. जामतारा टोळीने असा सापळा रचला आहे की तुम्ही त्यांच्या मेसेजवर क्लिक करताच तुमचे व्हॉट्सॲप खाते हॅक होते. तुमचा बँकेचा सर्व तपशील त्यांच्याकडे जातो. त्यानंतर तुमच्या खात्यातून सर्व पैसे काढले जातात.

ही काळजी घ्याच

तुमच्या व्हॉट्सॲप अकाउंटमध्ये इथे क्लिक केल्यावर खात्यात पैसे जमा होतील, असा कोणताही मेसेज आला तरी त्या लिंकवर अजिबात क्लिक करू नका. जोपर्यंत तुम्ही लिंकवर क्लिक करत नाही तोपर्यंत काहीही होणार नाही. ते नंबर ब्लॉक करा. त्यानंतरही तुम्हाला असे मेसेज वारंवार येत असतील तर सायबर क्राइम विभागाकडे तक्रार करा.

पोलिसांचे आवाहन

पोलिसांनी ऑनलाईन चोरट्यांकडून फसवणूक टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. लोकांनी अनोळखी व्यक्तीशी कोणताही व्यवहार करुन नये, आपले ओटीपी व बँक खात्याची माहिती कोणाला देऊ नये, सोशल मीडियावर आपली वैयक्तीक माहिती देऊ नये, असे आवाहन केले आहे.

वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना....
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना.....
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News...
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News....
युद्धाची भिती अन् पाकचा शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांमध्ये धास्ती
युद्धाची भिती अन् पाकचा शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांमध्ये धास्ती.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचं पुनर्गठन
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचं पुनर्गठन.
..त्याशिवाय पर्याय नाही, जरांगे पाटलांकडून इशारा देत चलो मुंबईचा नारा
..त्याशिवाय पर्याय नाही, जरांगे पाटलांकडून इशारा देत चलो मुंबईचा नारा.
'त्या' झिपलाइन ऑपरेटरची NIA कडून चौकशी झाल्यानंतर वडिलांकडून मोठा दावा
'त्या' झिपलाइन ऑपरेटरची NIA कडून चौकशी झाल्यानंतर वडिलांकडून मोठा दावा.
पाकिस्तानकडून युद्धबंदीचं उल्लंघन; आखनूर भागात गोळीबार
पाकिस्तानकडून युद्धबंदीचं उल्लंघन; आखनूर भागात गोळीबार.