Cyclone Jawad: चक्रीवादळ, अवकाळी पाऊस… पंतप्रधान मोदींनी घेतला आढावा, किनारी भागांना सतर्कतेचा इशारा

गेल्या दोन दिवसांत देशभरात सर्वत्र हवामान बदलले आहे आणि विविध भागांमध्ये सतत पाऊस, वादळी वारे, काही भागात बर्फवृष्टी अशी परिस्थिती आणि तापमानात घट झाली आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची तीव्रता 3 डिसेंबरपर्यंत वाढू शकते, असा भारतीय हवामान खात्याने इशारा दिला आहे.

Cyclone Jawad: चक्रीवादळ, अवकाळी पाऊस... पंतप्रधान मोदींनी घेतला आढावा, किनारी भागांना सतर्कतेचा इशारा
PM Modi meeting regarding cyclone Jawad
Follow us
| Updated on: Dec 02, 2021 | 4:47 PM

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी गुरुवारी भारतातील सद्य हवामान परिस्थिती, पाऊस आणि चक्रीवादळाचा इशारा यावर महत्त्वपूर्ण बैठक घेतली. बंगालच्या उपसागरात ‘जवाद’ चक्रीवादळाच्या (Rains due to Jawad Cyclone in India) पार्श्वभूमीवर देशातील वादळी पावसाशी संबंधित परिस्थिती व तयारीवर चर्चा करण्यासाठी ही बैठक होती. ओरिसा आणि आंध्र प्रदेश राज्यांना रेड अलर्ट (Red Alert) देण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांत देशभरात सर्वत्र हवामान बदलले आहे आणि विविध भागांमध्ये सतत पाऊस, वादळी वारे, काही भागात बर्फवृष्टी अशी परिस्थिती आणि तापमानात घट झाली आहे.

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची तीव्रता 3 डिसेंबरपर्यंत वाढू शकते, असा भारतीय हवामान खात्याने इशारा दिला आहे. चक्रीवादळाचा जास्त परिणाम आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम, विशाखापट्टणम आणि विजयनगरम जिल्ह्यांवर आणि ओडिशाच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यांवर होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, किनारपट्टी भागात ‘वादळी वाऱ्यांसह मुसळधार ते अति मुसळधार पाऊस’ पडण्याची शक्यता आहे.

कालपासून उत्तर भारत आणि पश्चिम भारतात वाऱ्यासह पाऊस पडत आहे. या अवकाळी पावसामुळे हवामानात कमालीचा बदल झाला आहे. याशिवाय दक्षिण भारतात तर गेल्या महिन्यापासून सतत मुसळधार पाऊस पडत आहे.

NDRF टीम्स सज्ज

कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी बुधवारी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीची (NCMC) बैठक घेतली आणि चक्रीवादळापूर्वी केंद्रीय मंत्रालये आणि एजन्सींच्या तयारीचा आढावा घेतला. गौबा यांनी निर्देश दिले की मच्छीमार आणि समुद्रातील सर्व जहाजे ताबडतोब परत बोलावण्यात याव्यात आणि चक्रीवादळाचा फटका बसू शकणार्‍या भागातील लोकांना खबरदारी म्हणून लवकरात लवकर सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यावे.

IMD (Indian Meteriological department) ने ‘मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा’ अलर्ट देशातील अनेक जिल्ह्यांमध्ये, विशेषत: ओडिशा आणि आंद्रप्रदेशमध्ये जारी केला आहे. नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF) ने आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये 32 टीम्स तैनात केल्या आहेत आणि अतिरिक्त टीम देखील स्टँडबायवर ठेवण्यात आल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीचा निर्माण झाल्यास,  लष्कर आणि नौदलही जहाजे आणि विमानांसह सज्ज आहेत.

हे ही वाचा

Maharashtra Rains and Weather News LIVE : मुंबईतील पावसामुळं पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवेवर परिणाम

Rainfall record in Pune| शहरात पावसाचा नवा विक्रम ; मोडला 1996 चा रेकॉर्ड; येत्या दोन दिवसात हलक्या सरी कोसळणार

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...