Cyclone Yaas West Bengal Live: ओडिशा राज्यासाठी केंद्राकडून 641 कोटी रुपयांचा निधी

| Updated on: May 27, 2021 | 12:52 AM

Cyclone Yaas West Bengal Live: यास चक्रीवादळामुळं पश्चिम बंगालमध्ये किनारपट्टीच्या परिसरात मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहत आहेत.

Cyclone Yaas West Bengal Live: ओडिशा राज्यासाठी केंद्राकडून 641 कोटी रुपयांचा निधी
cyclone yaas live updates

कोलकाता: यास चक्रीवादळामुळं (Yass Cyclone) पश्चिम बंगालमध्ये किनारपट्टीच्या परिसरात मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहत आहेत. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून त्यामध्ये लोकांच्या कार बुडताना दिसत आहेत. सध्या किनारपट्टीच्या भागात जवळपास 180 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. दक्षिण 24 परगण्यातही लोकांच्या मदतीसाठी आणलेला एक जेसीबी पाण्यात बुडाल्याची घटना समोर आली. ओडिशामध्ये देखील मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून झारखंडमध्ये वादळ उद्या पोहोचेल असा अंदाज आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 26 May 2021 09:53 PM (IST)

    ओडिशा राज्यासाठी केंद्राकडून 641 कोटी रुपयांचा निधी

    यास चक्रीवादळामुळे ओडिशा राज्यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान लक्षात घेता केंद्र सरकारने ओडिशा राज्यासाठी 641 कोटी रुपयांचा निधी तत्काळ मंजूर केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या शिफारशीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या मदतीची घोषणा केली.

  • 26 May 2021 09:48 PM (IST)

    ओडिशामध्ये बालासोर तसेच क्योंझर येथे दोघांचा मृत्यू

    ओडिशा : यास चक्रीवादळामुळे ओडिशा राज्यात मोठे नुकसान झाल्याची शक्यता आहे. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार बालासोर आणि भद्रकी हे दोन जिल्हे जास्त प्रभावित झाले आहेत. बालासोर तसेच क्योंझर येथे दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. या चक्रीवादळामुळे राज्यात किती नुकसान झाले हे गुरुवारी सकाळपर्यंत समजेल. तशी माहिती ओडिशाचे स्पेशल रिलीफ कमिश्नर यांनी दिली आहे.

  • 26 May 2021 09:44 PM (IST)

    ओडिशामध्ये प्रभावित झालेल्या 128 गावांना पुढील 7 दिवस मदत मिळणार, वेगवेगळे साहित्य दिले जाणार

    ओडिशा : यास चक्रीवादळामुळे ओडिशा राज्यात मोठे नुकसान झाल्याची शक्यता आहे. यावषयी माहिती घेण्यासाठी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी बैठक बोलावली. यामध्ये त्यांनी या चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या 128 गावांना आगामी सात दिवसांसाठी मदत मिळणार आहे. यामध्ये वेगवेगळे सामान या ग्रामस्थांना दिले जाईल.

  • 26 May 2021 08:21 PM (IST)

    भुवनेश्वर येथील बीजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरु

    यास चक्रीवादळामुळे भुवनेश्वर येथील बीजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळ काही काळासाठी बंद करण्यात आले होते. ते आता पुन्हा सुरु करण्यात आले आहे. संध्याकाळी सात वाजता हे विमानतळ सुरु करण्यात आले. यास चक्रीवादळामुळे या विमानतळाला 27 मे रोजी सकाळी पाच वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

  • 26 May 2021 08:16 PM (IST)

    यास चक्रीवादळाची तीव्रता घटली, हवामान विभागाची माहिती

    यास चक्रीवादळामुळं (Yass Cyclone) पश्चिम बंगालमध्ये किनारपट्टीच्या परिसरात मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहत होते. तसेच ओडिशामध्ये देखील मुसळधार पाऊस पडत होता. मात्र आता यास चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्याचे वृत्त आहे. हवामान विभागाने तशी माहिती दिली आहे. पुढील तीन ते चार तासांत  यास चक्रीवादळाची तीव्रता आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

  • 26 May 2021 06:59 PM (IST)

    इंडियन कोस्टगार्डनं पश्चिम बंगालच्या नयाचारमधील 100 लोकांना वाचवलं

    इंडियन कोस्टगार्ड विभागानं यास चक्रीवादळात पश्चिम बंगालच्या नयाचार भागात अडकलेल्या 100 व्यक्तींना वाचवलं आहे. इंडियन कोस्टगार्ड विभागाकडून मदत आणि बचावकार्य सुरु आहे. दुसरीकडे यास चक्रीवादळाचा प्रभाव हळूहळू कमी होत असल्याची माहिती आहे.

  • 26 May 2021 06:04 PM (IST)

    यास चक्रीवादळात अडकलेल्यांसाठी इंडियन आर्मी धावली, वैद्यकीय मदत पोहोचवण्याचं काम सुरु

    भारतीय सेनादलाकडून पश्चिम बंगालमधील पूर्व मिदनापूर मध्ये मदतकार्य सुरु आहे. वैद्यकीय आणि इतर मदत पोहोचवण्याचं भारतीय सेनादल करत आहे. स्थानिक लोकांना यास चक्रीवादळात मदत करण्याचं काम सुरु आहे.

  • 26 May 2021 05:19 PM (IST)

    ओडिशाच्या निलगिरी आणि मयूरभंजमध्ये वाऱ्याचा वेग वाढला

    ओडिशामधील विशेष मदत पथकाचे आयुक्त प्रदीपकुमार यांनी यास चक्रीवादळाचं लँडफॉल पूर्ण झाल्याचं सांगितलं आहे. ओडिशातील बालासोर भागात वाऱ्याचा वेग कमी होत आहे. निलगीरी आणि मयूरभंजमध्ये वाऱ्याचा वेग वाढला आहे.

  • 26 May 2021 05:10 PM (IST)

    पश्चिम बंगालमध्ये तीन लाख घरांचं नुकसान, 15 लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यास चक्रीवादळामुळे राज्यातील तीन लाख घरांचं नुकसान झाल्याची माहिती दिली. याशिवाय 15 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याचं देखली त्यांनी सांगितलं आहे.

  • 26 May 2021 04:04 PM (IST)

    Cyclone Yaas in Odisha :ओडिशामध्ये बोटी,दुकानं , पोलिसांची बॅरिकेटसचं नुकसान

    ओडिशामध्ये किनाऱ्यावरील बोटी, दुकानं, पोलिसांची बॅरिकेटसयांच उदयपूरजवळ नुकसान झालं आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या बार्डरवरील पोलिसांचे बॅरिकेटस उडून गेली आहेत.

  • 26 May 2021 03:35 PM (IST)

    ममता बॅनर्जींकडून चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यास चक्रिवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, जिल्हा दक्षता समित्या आणि अन्य अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली.

  • 26 May 2021 03:19 PM (IST)

    ओडिशाच्या धामरा जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती, NDRF कडून मदतकार्य सुरु

    ओडिशात यास चक्रीवादळामुळे भद्रक जिल्ह्यातील धामरामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुले धामरा जिल्ह्यात मोठं नुकसान झालेलं आहे. NDRF च्या टीम्स बचावकार्य करत आहेत. वादळामुळे कोसळलेली झाड हटवण्याचं काम सुरु करण्यात आलेलं आहे.

  • 26 May 2021 02:52 PM (IST)

    यास चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे 1 कोटी जनता प्रभावित: ममता बॅनर्जी

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यास चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे 1कोटी जनता प्रभावित झाल्याचं म्हटलं आहे. याबाबत पीटीआयनं ट्विट केलं आहे.

  • 26 May 2021 02:04 PM (IST)

    यास चक्रीवादळामुळे झारखंडमध्ये आज आणि उद्या मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज

    यास चक्रीवादळामुळे झारखंडमध्ये आज आणि उद्या मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागनं वर्तवला आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

  • 26 May 2021 01:48 PM (IST)

    यास चक्रीवादळामुळे ओडिशातील पराद्वीप येथील मासेमारीच्या बोटींचं नुकसान

    यास चक्रीवादळामुळे ओडिशातील पराद्वीप येथील मासेमारीच्या बोटींचं नुकसान झालं आहे.

  • 26 May 2021 01:21 PM (IST)

    ओडिशामध्ये यास चक्रिवादळामुळे वारं 130 ते 140 किमी वेगानं

    यास चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीवरील बालासोरच्या 20 किमी दक्षिणेला सकाळी 10.30 वाजता पोहोचले होते. साडे अकरा वाजता वाऱ्याचा वेग 130 ते 140 किमी ताशी असा होता.यास चक्रीवादळ ओडिशातील उत्तर पूर्व भागाकडे वळलं असल्याचं हवामान विभागनं सांगितलं आहे.

  • 26 May 2021 01:07 PM (IST)

    यास चक्रीवादळामुळं पश्चिम बंगाल, आसाम, सिक्कीम मेघालयात पाऊस

    यास चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमधील विविध भागात मुसळधार पावसाला सुरुवात झालीय. ठिकठिकाणी वाऱ्याच्या वेगानं पडझड झालेली आहे. झारखडंमध्ये आज आणि उद्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुसरीकडे सिक्कीम, आसाम, मेघालय आणि बिहारमध्ये पावसाचा अंदाज आहे.

  • 26 May 2021 01:03 PM (IST)

    8 मीटर उंचीच्या लाटा, पश्चिम बंगालच्या दिघी भागात समुद्राचं पाणी घुसलं

    पश्चिम बंगालच्या दिघी भागात समुद्राचं पाणी घुसलं आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 8 मीटर उंचीच्या लाटा उसळल्या आहेत.

  • 26 May 2021 01:02 PM (IST)

    मुंबईहून कोलकाताला जाणारी विमानं रद्द, सहा उड्डाणं रद्द

    यास चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईहून कोलकाताला जाणारी विमान रद्द करण्यात आली आहेत. आतापर्यंत सहा उड्डाणं रद्द केल्याची माहिती आहे.

  • 26 May 2021 12:54 PM (IST)

    हवाई दलाची मोठी कामगिरी, 100 प्रवाशांना एअरलिफ्ट केलं

    यास चक्रीवादळ पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये पोहोचलं आहे. वादळामुळं मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. भारतीय हवाई दलानं एनडीआरएफच्या मदतीनं 100 हून अधिक प्रवाशांना सुरक्षित स्थळी पोहोचलवं आहे. ऑपरेशन को C-130 आणि दोन An-32 विमानांनी प्रावशांना सुरक्षित स्थळी पोहोचवलं.

Published On - May 26,2021 9:53 PM

Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.