अजून करा स्टंट! अपघाताचा हा व्हिडिओ पाहिल्यावर स्टंटबाजांना असचं म्हणाव लागेल; अपघाताचा थरारक कॅमेऱ्यात कैद
व्हिडिओत दिसणाऱ्या नंबर प्लेटवरुन ही कार चंदीगडची असल्याचे समजते. व्हिडिओत ही वेगवान कार दिसत आहे. या कारमधून दोन ते तीन जण प्रवास करत आहेत. एकजण कार चालवत आहे आणि एकजण कारचा दरवाजा उघडून ड्रायव्हरच्या शेजारी बसलेल्या सीटवर लटकून स्टंट करत आहे. आणि क्षणात भीषण अपघात घडतो. कार चालवणाऱ्या तरुणाचे कारवरील नियंत्रण सुटते. भारधाव कार थेट डिव्हायडरवर जाऊन आदळते. यात दोघेजण जखमी झाले आहेत.

शिमला : एका कार अपघाताचा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. कारमधील तरुण तरुणी स्टंट करताना हा भयानक अपघात(Dangerous accident ) झाला आहे. हिमाचल प्रदेशातील(Himachal Pradesh) सोलन जिल्ह्यातील हा अपघाताचा थरारार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या सर्व तरुणांचे नशीब बलवत्तर म्हणून ते या अपघातातून सुखरुप बचावले आहेत. मात्र, अपघात किती डेंजर होता हे व्हिडिओत दिसत आहे. कारचा दरवाजा उघडा ठेवून हे तरुण स्टंट करत असल्याचे व्हिडिओत दिसते. यानंतर ही भरधाव कार डिव्हायडरवर जाऊन आदळते.
व्हिडिओत दिसणाऱ्या नंबर प्लेटवरुन ही कार चंदीगडची असल्याचे समजते. व्हिडिओत ही वेगवान कार दिसत आहे. या कारमधून दोन ते तीन जण प्रवास करत आहेत. एकजण कार चालवत आहे आणि एकजण कारचा दरवाजा उघडून ड्रायव्हरच्या शेजारी बसलेल्या सीटवर लटकून स्टंट करत आहे. आणि क्षणात भीषण अपघात घडतो. कार चालवणाऱ्या तरुणाचे कारवरील नियंत्रण सुटते. भारधाव कार थेट डिव्हायडरवर जाऊन आदळते. यात दोघेजण जखमी झाले आहेत.
NH-5 वर झाला अपघात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सोलनच्या राष्ट्रीय महामार्ग-5 वर हा अपघात झाला. कार दुभाजकाला जोरदार धडकली मात्र कोणालाही दुखापत झाली नाही. कार चालक अमृतसरचा रहिवासी आहे. कार चालकाविरोधात आयपीसी कलम 279 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
#WATCH | HP: A video went viral showing a car jumping over a divider & colliding with railing on NH-5 in Solan; a resident from Amritsar tried performing stunts while rash driving. Vehicle damaged but driver safe. Case filed u/s 279 of IPC in Dharampur PS: Solan Police (25.07) pic.twitter.com/o5ajWRJuiG
— ANI (@ANI) July 25, 2022
इतर कार चालकांनी रेकॉर्ड केला व्हिडिओ
अपघातग्रस्त कारच्या मागून येणाऱ्या वाहनात बसलेल्या लोकांनी या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी उशिरा परवानूहून सोलनकडे जाणाऱ्या चंदीगड क्रमांकाच्या कारमधून प्रवास करणारी तरुणी सुसाट वेगाने कार चालवत होती. त्यात दोन तरुणही बसले होते. गाडीचा दरवाजा उघडून ते आवाज करत होते.