Corona Updates : कोरोनामुळे एकाच दिवसात 7 जण दगावले; प्रशासन म्हणते…
कोरोना संसर्गाचा दर 22.74 टक्के होता, जो आज 21 टक्क्यांवर आला आहे. 25 एप्रिल रोजी राजधानीत 6 रुग्णांचा मृत्यू झाला असला तरी आरोग्य बुलेटिननुसार, केवळ 1 रुग्णाच्या मृत्यूचे प्राथमिक कारण कोरोना असल्याचे सांगण्यात येत आहे.
नवी दिल्ली : दिल्लीत दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढतानाच दिसून येत आहे. त्यामुळे आता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या 24 तासात 1 हजारांहून अधिक नवीन रुग्ण समोर आले आहेत. त्याचबरोबर कोरोनामुळे 7 जणांचा मृत्यू झाल्याचेही उघड झाले आहे. एका दिवसात सात जणांचा मृत्यू झाल्याने सध्या भीतीदायक वातावरण पसरले आहे. तर संसर्ग दर 21 टक्के असल्याचेही सांगण्यात आले आहे. आज राजधानीत संसर्गाची 1 हजार 40 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
तर 7 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. तथापि, आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटिननुसार, केवळ 3 रुग्णांच्या मृत्यूचे प्राथमिक कारण गे कोरोना संसर्ग असल्याचेही आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
दिल्लीत गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाच्या 4 हजार 915 चाचण्या करण्यात आल्या. यासोबतच 1 हजार 320 रुग्ण या संसर्गातून बरे झाले आहेत, ही एक दिलासादायक बातमी असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
सध्या राजधानीत कोरोनाचे 4 हजार 708 रुग्ण आहेत, त्यापैकी 3 हजार 384 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत आणि 305 रुग्ण आहेत.
25 एप्रिल रोजी दिल्लीत संसर्गाची 1 हजार 95 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्याच वेळी 6 रुग्णांचा मृत्यू झाला होता. कोरोनाचे रुग्ण पूर्वीपेक्षा कमी होत असले तरी मृतांची संख्या भयावह आहे.
रविवार आणि सोमवारी दिल्लीत कोरोनाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय घट झाली. संसर्गाची प्रकरणे एक हजाराच्या खाली आहेत. मात्र मंगळवारी पुन्हा अचानक वर्दळ आली.
मंगळवारी कोरोना संसर्गाचा दर 22.74 टक्के होता, जो आज 21 टक्क्यांवर आला आहे. 25 एप्रिल रोजी राजधानीत 6 रुग्णांचा मृत्यू झाला असला तरी आरोग्य बुलेटिननुसार, केवळ 1 रुग्णाच्या मृत्यूचे प्राथमिक कारण कोरोना असल्याचे सांगण्यात येत आहे.
आजही 7 रुग्णांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे, परंतु आरोग्य बुलेटिननुसार, केवळ 3 रुग्णांच्या मृत्यूचे प्राथमिक कारण कोरोना आहे.