Delhi Crime: दिल्लीत भाजप पदाधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या; पोलीस स्टेशनजवळच सहा गोळ्या झाडल्या

जितू चौधरी यांची हत्या झाल्यानंर पोलिसांनी सांगितले की, जितू चौधरी यांच्यावर हल्लेखोरांकडून 6 गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. जितू चौधरी हे भाजपचे मयूर विहार जिल्ह्याचे पदाधिकारी म्हणून कार्यरत होते.

Delhi Crime: दिल्लीत भाजप पदाधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या; पोलीस स्टेशनजवळच सहा गोळ्या झाडल्या
दिल्लीत भाजप नेत्याची गोळी घालून हत्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 21, 2022 | 4:33 AM

नवी दिल्लीः देशाच्या राजधानीत सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे, जहांगीरपुरीमध्ये नुकत्याच झालेल्या हिंसाचारानंतर आता गाझीपूर पोलीस स्टेशन परिसरात झालेल्या गोळीबारात भाजपच्या एका पदाधिकारी ठार झाला आहे. गाझीपूर पोलीस स्टेशन परिसराजवळच भाजपचा पदाधिकारी (BJP leader)जितू चौधरी यांची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. जितू चौधरी (Jitu Chaudhary) यांच्या हत्या (Murder) झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज पोलिसांकडून ताब्यात घेण्याचे काम सुरु केले गेले आहे. या हत्यामागे काय कारण आहे हे अजून पोलिसांनी स्पष्ट केले नाही. मात्र लवकरच गुन्हेगारांना आम्ही अटक करु असे पोलिसांनी पत्रकारांना सांगितले आहे.

जितू चौधरी यांची हत्या झाल्यानंर पोलिसांनी सांगितले की, जितू चौधरी यांच्यावर हल्लेखोरांकडून 6 गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. जितू चौधरी हे भाजपचे मयूर विहार जिल्ह्याचे ते मंत्री म्हणून कार्यरत होते.

भाजप पदाधिकाऱ्यांची घटनास्थळाकडे धाव

जितू चौधरी यांची हत्या झाल्याचे समजताच दिल्लीतील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी आणि घटनास्थळी धाव घेतली आहे. त्यांचा मृतदेह रुग्णालयात ठेवला असून सकाळी त्यांच्या शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे दिल्ली भाजपचे अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी सांगितले.

आर्थिक वादातून गोळीबार

जितू चौधरी हे गाझीपूरमध्ये बांधकाम व्यावसायिक म्हणून ते ओळखले जात होते. काही दिवसांपासून त्यांचा आणि एका ठेकेदारासोबत आर्थिक देवाण घेवाणीवरुन त्यांचे वाद सुरु होते. त्यामुळे या हत्येमागे आर्थिक व्यवहार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बुधवारी रात्रीसव सव्वा आठच्या दरम्यान त्यांच्यावर अज्ञांताकडून सहा गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर पोलिसांनी गोळी झाडणाऱ्यांचा शोध सुरु केला असून आरोपींना लवकरच पकडण्याचा विश्वास पोलिसांनी दिला आहे.

सीसीटीव्हींची पाहणी करणार

जितू चौधरी यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले गेले, मात्र त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर घटनास्थळाची पाहणी केली गेली असून परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

संबंधित बातम्या

Pune Crime : कर्नलकडून पत्नीची गोळ्या झाडून हत्या; त्यानंतर कर्नलचीही आत्महत्या

Maharashtra IPS Transfer : राज्यातील बड्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, मिलिंद भारंबे, कृष्ण प्रकाश, दीपक पांडेंचा समावेश

Sukanya Samrudhi Scheme : मुली होणार आर्थिक स्वावलंबी; सुकन्या समृद्धीचे बदलले नियम;गुंतवणुकीचा मार्ग बनला सोपा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.